आदर्शवाद आता बदलला होता. वय वाढले होते. जग पाहिले होते, अनुभवले होते, सैन्य पाहिले, युद्ध पाहिले, फाळणी पाहिली, अनेक नोकऱ्या करून पाहिल्या, चळवळी चालवल्या, देशद्रोहाचा आरोप झाला, कोर्टात मुकदमा झाला, काही वर्ष तुरुंगात डांबून झाले. आदर्शवाद बदलला. तेव्हा कविता लिहित होते –
मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग.
और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा राहते और भी हैं वस्ल की राहत के सिवा
क्रांती पाहिजे होती पण वाट्याला आले तुरुंग. क्रांती वगैरे काही दृष्टीपथात पडेना. प्रवासात भरडला जाणारा माणूस तेवढा दिसत होता. कोणीही तिथे निराशेने दाबून गेले असते पण फ़ैज पक्के आशावादी. एके ठिकाणी म्हटले आहे –
And yet love is the leit motif of his poetry. Faiz is one of the great lyricists who seems, from one point of view, to have sung of nothing with greater passion than love.That is why, apart from being a great revolutionary poet, he was a great love poet, and there was no distinction between the two, love and revolution had become identical in him.
कैदेत असताना कधी कधी आपल्या बायकोला पत्रे लिहायचे त्यांची बायको Alys हिला. हि जन्माने ब्रिटीश पण जातकुळीने कम्युनिस्ट. एका कवितेत ते म्हणतात –
बुझा जो रौज़न-ए-ज़िंदाँ तो दिल ये समझा है
कि तेरी मांग सितारों से भर गई होगी
चमक उठे हैं सलासिल तो हमने जाना है
कि अब सहर तेरे रुख़ पर बिखर गई होगी
ग़र आज तुझसे जुदा हैं तो कल बहम होंगे
ये रात भर की जुदाई तो कोई बात नहीं
ग़र आज औज पे है ताल-ए-रक़ीब तो क्या
ये चार दिन की ख़ुदाई तो कोई बात नहीं
याच कवितेत पहिले कडवे आहे जे आपले सध्याचे प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष (माजी सरन्यायाधीश) मार्कंडेय काटजू सारखे वापरत असतात – “बने हैं अहल-ए-हवस मुद्दई भी, मुंसिफ़ भी; किसे वकील करें, किस से मुंसिफ़ी चाहें”; जिथे वकील आणि न्यायाधीश दोघेही हव्यासाला बळी पडले आहेत तिथे दलीले पेश करणार तरी कोण? आणि दाद तरी मागायची कोणाकडे?
पण फ़ैज म्हणतात – नाही. जीवात जीव वगैरे असे पर्यंत बोललेच पाहिजे. क्रांती नाही म्हणून काय झाले? मार्क्स सफल नाही म्हणून काय झाले? मुग गिळून गप्प राहण्यात अर्थ नाही. सत्याचे वाली आम्ही नसू तर मग कोण? आज किमान बोलायला तोंड आहे, शरीरात त्राण आहे, जीवात जीव आहे, आणि मुख्य म्हणजे सत्य जिवंत आहे – आत्ताच बोलले पाहिजे.
बोल कि लब आज़ाद हैं तेरे बोल ज़बाँ अब तक तेरी है
तेरा सुतवाँ जिस्म है तेरा बोल कि जाँ अब तक् तेरी है
देख के आहंगर की दुकाँ में तुंद हैं शोले सुर्ख़ है आहन
खुलने लगे क़ुफ़्फ़लों के दहाने फैला हर एक ज़न्जीर का दामन
बोल ये थोड़ा वक़्त बहोत है जिस्म-ओ-ज़बाँ की मौत से पहले
बोल कि सच ज़िंदा है अब तक बोल जो कुछ कहने है कह ले
शाम बेनेगलांच्या ‘मम्मो’ मध्ये फरीदा जलाल हि कविता म्हणते. पाकिस्तान मधून आलेली असते. कागदपत्रे गहाळ असतात. आणि इथे तिला बऱ्याच अपेष्टांना सहन करावे लागते. तेव्हा ती हि कविता म्हणते. बोल कि लब आज़ाद हैं तेरे… जेल मध्ये अनेक वर्ष काढली. मग झुल्फिकार अली भुत्तोंच्यामुळे सुटका झाली. मात्र तडीपार व्हावे लागले. काही वर्षे रशियात काढली. तिथे लेनिन प्राईझ का काय ते पण मिळाले. मग नंतर लंडनला स्थाईक झाले. आणि शेवटी १९६४ मध्ये मायदेशी परत येउन कराची मध्ये घर केले.
“निसार मैं तेरी गलियों के अए वतन, कि जहाँ चली है रस्म कि कोई न सर उठा के चले”
आता तर जगच पाहून झाले होते. कामगार इथून तिथून सर्वत्र सारखाच हे माहित होतेच. आता मानव इथून तिथून जगभर एकच आहे हे अनुभवले. बुद्धदर्शन झाले. दुःख आकळले आणि मग मानवता-विश्वात्मकतेची पायरी चढले. आंतरराष्ट्रीयवाद का काय ते. आधीच देवावर श्रद्धा नव्हती. म्हणजे किमान प्रस्थापित मुस्लिम अल्लाह मान्य नव्हता. देव नाही देवालयी अशी मान्यता होती. ब्लास्फेमी कायद्याअंतर्गत खटला पण चालला होता एकदा यांच्यावर. सुफी पंथाचा प्रभाव जास्त होता.
ज्या पाकिस्तानने त्यांना सुरुवातीस प्रचंड त्रास दिला तिथेच नंतर ते राष्ट्रीय कवी झाले. नंतर राजकारणात आले. अनेक खात्यांचे केंद्रीय मंत्री झाले. देशाची सेवा वगैरे केली. प्रत्येक कलेच्या प्रकारावर आपला प्रभाव सोडते झाले. आता तर त्यांचे नाव इतके मोठे आहे कि गालिब आणि इक़्बाल नंतर फ़ैजचे नाव येते. दिगंत कीर्ती मिळवली. कीर्तीरूपी उरले आहेत. असे म्हणतात कि चार वेळा यांची नोबेल करता निवड होता होता राहिली. पण, तरीही फ़ैज साहेब म्हणतात –
वो इंतेजार ही जिसका, ये वो सहर तो नही,
ये वो सहर तो नाही जिसकी आरजू लेकर चले थे
यार कि मिल जाएगी कही न कही
फलक के दश्त में तारोंकी आखरी मंजिल…
निजाते दीदो दिल कि घडी नही आई
चाले चलो कि वो मंजिल अभी नही आई
भाषांतर? भाषांतर कुठाय?!
या लेखमालेचा तो स्कोप नाही. त्यांच्या काही कवितांना फक्त संदर्भ देऊन त्यांची पार्श्वभूमी सांगायचा प्रयत्न केला आहे. फ़ैज कसे होते, कोण होते, त्यांच्या कविता ज्या आहेत त्या तशा का आहेत याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला आहे.
भाषांतरही करा ना. तो खो होता मूळचा.