‘चिंटू’ म्हातारा झाला हो…!!!

चिंटू ने कधी काळी एक जमाना गाजवला होतं.. Good Old Black and White जमाना. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर तर तेव्हा हिरोच होते. निरागस प्रश्न, आपल्याच आयुष्यातल्या सगळ्या घटना, जमलेली सगळी पात्र त्यामुळे मजा यायची वाचायला. मध्यमवर्गीय कुटुंब, सुट्टी, अभ्यास, सोसायटी, आसपासचे मित्र, शाळा, चित्रकला, क्रिकेट, घरातला पसारा, वाढदिवस, कैऱ्या…. सगळे तेच पण किती निरागस होते. आणि डोळे तर खास बोलके असायचे. प्रत्येकाच्या आजूबाजूला राजू, बगळ्या, मिनी, जोशी काकू… वगैरे असतात त्यामुळे अजून मजा यायची. मराठी मधली बहुधा सगळ्यात फेमस आणि जास्त काल चाललेली हीच कॉमिक स्ट्रीप असावी…एकदम भारी होतं चिंटू… आणि आज कितीतरी दिवसांनी वाचतो आहे परत… काय कचरा झाला आहे त्याचा…चिंटूची खासियत होती ते बोलके चेहरे आणि प्रासंगिक संवाद. चित्र काढण्यात जम बसल्याने त्यात काही कमतरता नाहीये नि रंग आल्यापासून अजून छानच वाटते आहे. पण डायलॉग मध्ये पार चिथडे उडाले आहेत. काय ती भाषा.. सातवी आठवीमधला मुलगा असे बोलतो? हे वाचा आणि बघा मी काय म्हणतो आहे ते… नको ती भाषा नको तिथे वापरल्याने चिंटू मधला चिंटूपणाच संपून गेला असे वाटतंय…फुल उजाड शुष्क चिंटू…..

चुकीच्या व्यक्तीकडे बोलतोय? अभ्यासाने गती पकडलीये? धोका पत्करू शकत नाही?? सातवी आठवीमधला मुलगा बोलतोय? वाटतंय का? आणि ही तर हाईट च आहे – चिंटू म्हणजे काय कोणी तत्वज्ञ आहे का? बघा तो शेवटच्या स्ट्रीप मध्ये काय बोलतो आहे ते – प्रत्येक आनंदाची किंमत द्यावी लागते….!!! आईच्ची जय त्याच्या…झाला…. चिंटू आता म्हातारा झालाय…

4663910945544493811

5485996976237177342

5625973960205425082

4 thoughts on “‘चिंटू’ म्हातारा झाला हो…!!!

  1. सौरभ

    अरे आधी तर प्रत्येक चित्रातले संवादही हस्ताक्षरात लिहलेले असत. आता ते संगणकाचा फॉंट वापरुन लिहले जातात.

    तू म्हणतोस तसे चिंटूची भाषा त्याच्या वयाप्रमाणे नसतेच. कित्येकदा त्यात काही विनोदही नसतो.

    चालायचेच. एवढ्या वर्षे चालू आहे, आणि जुन्यांचे कौतुक तर होतच राहते.

यावर आपले मत नोंदवा