देखणे ते चेहरे

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे या मोल नाही फारसे ॥
तेच डोळे देखणे जे कोंडीती सार्‍या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळॆ ।
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां निश्चये पाळावया ॥
देखणी ती जीवने जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे शुभ्र पार्‍यासारखे ॥
देखणा देहान्त तो जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो रात्रगर्भी वारसा ॥

-बा. भ. बोरकर.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s