बोल के लब… (२)

फ़ैज अहमद फ़ैज.

आपल्या या लेखनायकाचा जन्म १९११ साली सियालकोटला अखंड भारतात झाला. त्याची जन्म शताब्दी नुकतीच आपण साजरी करून संपवली. भारतभर अनेक कार्यक्रम केले, सप्ताह घातले, भाषणे ठोकली, रात्री जागवल्या, गाणी ऐकली-ऐकवली, चर्चासत्रे भरवली, नाटिका पण केल्या. अगदी राष्ट्रपती महोदया देखील भाषणकर्त्या झाल्या या विषयावर. सीमेपलीकडून अनेक कलाकार आले आणि मित्रत्वाचे नारेबिरे लगावून गेले. पुढच्या वर्षी मंटो साहेबांची जन्म-शताब्दी आली, ती पण अगदी अशीच इमाने इतबारे साजरी केली.

जेव्हा फ़ैज लाहोरला कॉलेजात होते तेव्हा देशभरात ‘सायमन परत जा’ चे नारे सुरु होते. लाहोरला लाल लजपत राय नेतृत्व करत होते. फ़ैजचे ‘formative age’ का काय ते होते. तिथे हे अरेबिक शिकले, इंग्रजी साहित्य वाचले. तेव्हा पंजाबात डावी विचारसरणी जोरदार मूळ धरत होती. रशियन क्रांती झाली होती. सर्वत्र लाल रंगाचा बोलबाला होता. बहुधा कबीराने ‘लाली मेरे लाल कि, जिथ देखू तिथ लाल’ हे या काळाला उद्देशून लिहिले असावे. दुसरे महायुद्ध अजून बरेच दूर होते. भगत सिंग तर पक्का कम्युनिस्ट. Comintern मधून हकालपट्टी झाल्यावर मानवेंद्रनाथ रॉय जेव्हा भारतात परत आले तेही लाहोरला चक्कर मारते झाले. या सर्वांच्या संपर्कात, प्रभावात फ़ैज साहेब येत होते. तेव्हाचे कवी – हसरत मोहानी, हफ़िज जालन्धरी, अख्तर शिरानी यांचे वाचन चालू होते.

पस्तीस साली अमृतसरला नोकरी करण्यास फ़ैज आले. भारतात ट्रेड युनियन्स वाढत होत्या. मजदूर आंदोलनाचा जमाना सुरु झाला होता. प्रोग्रेसिव रायटर्सवाले बाळसे धरू लागले होते. यांच्यात फ़ैज दाखल झाले. त्या काळाबद्दल फ़ैज म्हणतात – “It seemed that several schools had opened in the garden. In this school the first lesson we learnt was that to think of separating oneself from the world is, in the first place, useless. This is so because the experiences around us necessarily affected us. The self of a human being, despite all its loves, troubles, joys and pains, is a tiny, limited and humble thing. The measure of the vastness of life is the whole universe. Thus the agony of love and the agony of time are two aspects of one experience.”

एक शेर आहे – यू किनारोंसे समुंदर देखा नही जाता. आपल्या ‘एक तरी ओवी अनुभवावी’ उक्तीला अनुसरून फ़ैज साहेबांनी काय काय करून नाही  पहिले? शिक्षक झाले, पत्रकार झाले. अलिगढला गेले, लाहोरला गेले. अगदी सैन्यात देखील भरती झाले. तिथे कोणा ‘अकबर खान’ नावाच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली होते. बढती होत होत मेजर झाले. फाळणीनंतर कबालीवाल्यांचे कश्मीरवरचे आक्रमण पाहून वैतागून राजीनामाच दिला. पुन्हा देशांतर, पुन्हा अनेक नोकऱ्या, लेखणी चालूच होती, चळवळी चालूच होत्या.

फ़ैज एका कवितेत म्हणतात – हम देखेंगे लाज़िम है कि हम भी देखेंगे, वो दिन कि जिसका वादा है जो लोह-ए-अज़ल में लिखा है

तो दिवस नक्की येईल. कोणता? तर –
जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां रुई की तरह उड़ जाएँगे,
हम महक़ूमों के पाँव तले ये धरती धड़-धड़ धड़केगी,
और अहल-ए-हक़म के सर ऊपर जब बिजली कड़-कड़ कड़केगी

जेव्हा या जुलमाचे मोठ-मोठाले पर्वत कापसासारखे उडून जातील; आम्ही, जे अनेक शतके दबलेलो आहोत, यांच्या पायाखाली जमीन कंप पावेल, आणि आमच्या वर हुकुम चालवण्याऱ्यांनो, तुमच्याच डोक्यावर आकाशातून वीज पडेल.

जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से सब बुत उठवाए जाएँगे,
हम अहल-ए-सफ़ा, मरदूद-ए-हरम मसनद पे बिठाए जाएँगे,
सब ताज उछाले जाएँगे सब तख़्त गिराए जाएँगे

बस नाम रहेगा अल्लाह का जो ग़ायब भी है हाज़िर भी जो मंज़र भी है नाज़िर भी,
उट्ठेगा अन-अल-हक़ का नारा जो मैं भी हूँ और तुम भी हो,
और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा जो मैं भी हूँ और तुम भी हो.

या ‘अन-अल-हक़’ (अहं ब्रह्मास्मि) च्या शोधात फ़ैज साहेब कायम राहिले. निडर. यांचा डावीकडे असलेला कल आणि लोकप्रियता पाहून लियाकत आली खानने यांचा सावरकर केला. बादरायणी संबंध जोडून एका ‘साजिश’ मध्ये सहभागी झाल्याबद्दल कैदेत टाकले. अपमान केला. राजकीय बंदी असून देखील सामन्य कैद्याप्रमाणे वागवले. आपल्याकडे आणीबाणी काळात ‘मिसा’वाल्यांना किमान सोयी-सुविधा तरी मिळत असत तुरुंगात. यांचे फार हाल झाले. त्यावर त्यांनी एक सुरेख काव्य लिहिले आहे. (आणि नय्यर नूरने अप्रतिम गायले देखील आहे) म्हणतात –

आज बाज़ार में पा-ब-जौला चलो (आज भल्या बाजारात पब्लिक समोर पायात बेड्या घालून नेण्यात येत आहे),
दस्त-अफ्शां चलो, मस्त-ओ-रक़्सां चलो, खाक-बर-सर चलो, खूं-ब-दामां चलो,
राह तकता है सब शहर-ए-जानां चलो… आज बाज़ार में पा-ब-जौला चलो

हाकिम-ए-शहर भी, मजम-ए-आम भी, 
तीर-ए-इल्ज़ाम भी, संग-ए-दुश्नाम भी, 
सुबह-ए-नाशाद भी, रोज़-ए-नाकाम भी

इनका दमसाज़ अपने सिवा कौन है, 
शहर-ए-जानां मे अब बा-सफा कौन है, 
दस्त-ए-क़ातिल के शायां रहा कौन है

रख्त-ए-दिल बांध लो दिलफिगारों चलो, 
फिर हमीं क़त्ल हो आयें यारों चलो, 
आज बाज़ार में पा-ब-जौला चलो

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s