आत्ता बाहेर सोसाट्याचे वादळ आणि पाऊस येत आहे. एक वर्ष तरी झाले मी वादळाची वाट पाहत आहे. मिडवेस्ट मधली राज्ये ही वादळांच्या छायेखाली असतात. सारखे अलर्टस, टोर्नाडो आला की काय करावे, कसे करावे, कुठे लपावे कुठून पळावे, काय करू नये वगैरे वगैरे काय काय चालू असते. आधीच अमेरिकेसारखा देश जिथे उगीच जास्त काळजी करतात. त्यात हा वादळांचा धोका. इथे येण्यापूर्वीपासून इच्छा होती की एकदा तरी मोठा टोर्नाडो बघावा बघावा म्हणून. २-३ वेळा उगीह्क अलार्म वाजले अलर्टस आले पण फुसके निघाले… आणि आज काहीच अलर्ट नव्हता तरी बेक्कार वादळ आले आहे. सगळी झाडे मुळासकट उन्मळून पडतील जणू… आणि हे घर तर लाकडाचे आहे.. लाकडाच्या घरांबद्दल उगीच तकलादू असल्याची भावना आहे त्यामुळे सारखे असे वाटते की हे घरच उडून गेले तर? तर काय? पुण्यात म्हणे पानशेतच्या पुरामध्ये जुने वादेच्या वाडे २-३ मजले असलेले पाण्यात वाहून गेले होते… बोट क्लब वरचे मामा सांगायचे की त्यांनी कशी पंट काढली आणि संगमावरून कसे कुठे गेले नी कुणाला वाचवले वगैरे वगैरे… भयंकर साहसाची गोष्ट वाटायची.. त्यांनीच सांगितले होते की त्यांनी अक्षरशः जुने २-३ मजली वाडे पुरत वाहून जाताना पहिले आहेत..!!! इथे फक्त ते उडतील.. २ मजल्यांची लाकडी घरे हवेत उडतील असेच वाटत आहे…मजा येईल… जोरदार, घमासान काय काय विशेषणं लावू ते पण सुचत नाहीये. अंधार दाटलाय. पाण्याचे फवारे नुसते अंग बोचकारून काढतील एखाद्याच्या इतके जोरदार आहे. झाडे हालत आहेत..हालत काय झाली त्यांची बघा – झाडाचा शेंडा बुडाला टेकेल इतके वाकली आहेत…तर. सह्याद्री मध्ये असा पाऊस अनुभवला की रामदास आठवायचे ‘धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे’ इथे तर ‘धबाबा’ शब्द पण फिका वाटावा… बघू किती वेळ हे प्रकरण चालते आहे ते…
कोसळल्यास जीवितहानी कमीत कमी व्हावी तसेच फेरउभारणीला वेळ लागू नये हा लाकडी घरांचा हेतू असतो.
are u ok now?vadal gele kaa?kaa aalach navhte?:)
मी बरा आहे…काचेच्या अलीकडून वादळ बघायला मजाच येते…. २-३ तासांनी गेले वादळ… झाड पडले नाही की घर पण उडाले नाही… श्या…
tumhala maja yete,pun je vadalat saapdtaat tyachanchaa matra jiv jato, tyache kay?(