आत्ताच १२ वीचा निकाल लागला. या निकालातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘लातूर Pattern’ साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याची पहिल्या क्रमांकावरून झालेली उचलबांगडी आणि ती सुद्धा साधीसुधी नाही तर एकदम शेवटच्या स्थानावर. मागच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण होते ८५.५१ % आणि ह्या वेळेस ते आहे ४४.८१ %….!! आता वर्षभरात विद्यार्थ्याची पातळी काही इतकी खालावत नाही. या साठी जबाबदार सर्वात मोठा घटक म्हणजे लातूरच्या आणि महत्वाच्या नांदेडच्या जिल्लाधिकारी आणि करमचार्यानी घेतलेले ‘Tough Anti Exam Malpractices Measures ‘ बाकीच्या ७ बोर्डाचे निकाल ८० % च्या आसपास आहेत आणि फक्त लातूर चा ४४ %. यात लातूर बोर्ड गंडलेले आहे असे समजावे की बाकीच्यांना ‘Reality check ची गरज आहे असं समजावे..?
इतर महाराष्ट्रात काही फार दिव्य परिस्थिती आहे असं वाटत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतो. आता लातूरकरांना कमी निकालाबद्दल फैलावर घेतलं जाते की इतरांना ठोस पावले न उचलण्याबद्दल हे पाहायला हवे. महाराष्ट्र बोर्डाने निकाल Online लावून फार मोठी सोय केली आहे, आणि त्यात सर्वात मस्त गोष्ट म्हणजे भरपूर Statistics उपलब्ध करून दिले आहेत. लातूरच्या या निकालावरून जरी आपल्या शिक्षण पद्धतीचे खरे स्वरूप बाहेर येऊन वाभाडे निघाले असतील तरी परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा पाउल म्हणता येईल. बाकीच्यांना सुद्धा असे करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात पास होण्यासठी अभ्यास करावा लागतो अशी भावना तरी निर्माण होईल.भविष्यासाठी आपले बोर्ड कुठल्या वाटेने जातात हे महत्वाचे ठरेल. ईश्वर त्यांना योग्य (कठीण असला तरी ) मार्गाने चालांयची सुबुद्धी देवो .
( ह्या पार्श्वभूमीवर ८ वी पर्यंत परीक्षा रद्द करण्याचा निर्णयाबद्दल विचार करतोय.. फारसे आशावादी चित्र दिसत नाहीये)
१२ वी results आणि Statistics इथे पाहू शकतात http://mahresult.nic.in/ येथे विभाग निहाय statistics पण उपलब्ध आहेत.
– स्मित गाडे
धन्यवाद.
लातूर पॅटर्न असाच तयार झाला होता का? अशी अविचारी टीका तुम्ही केली नाहीत या बद्दल आभार.
मला वाटतं इतर बोर्डांनीही अशीच कठोर भूमिका घेतली पाहिजे. आकडे फसवे असतात. प्रत्यक्षात पास होण्याची लायकी किती जणांची हे पाहिले पाहिजे.
लातूर पॅटर्न विषयी एक स्वतंत्र लेख होऊ शकतो..लातूर पॅटर्न मध्ये परीक्षा पद्धतीतील उणीवा शोधून त्यांचा फायदा घेतात असं वाटत..
इंजिनीरिंग CET मध्ये लातूर पॅटर्न आलाय.. आमच्या कॉलेज (COEP ) मध्ये प्रवेश महाराष्ट्र भर खुला आहे(university कोटा ) नाही.
पण तरी E & TC ह्या खूप वर मेरीट जाणाऱ्या शाखेत ६० पैकी ४० लातूरचे आहेत एका batach मध्ये.. अर्थात ह्या साठी लातुरकाराना दोषी मानता येत नाही..
पण परिस्थिती बरोबर नाही हे नक्की.
heyy, Nice Article Smit !! 🙂
Thanks 🙂
धन्यवाद 🙂
Actually, ह्यावेळेस सरकारने खूपच मनावर घेतल होत.
सर्वानीच मनावर घेतलं पाहिजे आता …
लिहिणे-वाचणे ही मूलभूत कॊशल्ये विकसित होण्यावर पहिली ते आठवी परीक्षामुळे येणारी बंधने दूर झाल्याने परिस्थिती सुधारण्याची शक्यता जास्त वाटते.
जर तीन पर्याय असतील
१)एखायदा विषयाचा डोळसपणे अभ्यास करायचा
2) एखाद्या विषयाचा नुसताच परीक्षेसाठी अभ्यास करायचा(समजावून न घेता)
३)अभ्यासच करायचा नाही
तर 3 पेक्षा 2 अधिक योग्य वाटतो..
ह्या प्रश्नाच्या दोन बाजू होऊ शकतात..
१) शिक्षणाची बिकट परिस्थिती ..मुलांना लिहिता वाहता न येणे इत्यादी ….. माझ्या मते ह्या बाबतीत मुख्य प्रश्न परीक्षा नसून शिक्षक आहेत.. हा प्रश्न खेड्यात फारच मुख्य आहे
२)विद्यार्थ्यांवर येणारे मानसिक दडपण… ह्या बाबतीत मुख्य प्रश्न पालक आणि समाज आहे… हा प्रश्न मुख्यत्वे करून शहरातला आहे..
दुसऱ्या प्रश्नावर परीक्षा रद्द करणे हा एक उपाय होऊ शकतो (But its just a part of solution..I think its not the critical one yet )..
खेड्यांमध्ये परीक्षा रद्द केली तर निदान परीक्षेसाठी तरी जे अभ्यास करायचे तो पण बंद होईल..अश्या ठिकाणी मुलांनी काहीच न शिकण्यापेक्षा निदान काही तरी शिकले ते जास्त फायद्याचे वाटते
‘latur pattern’ hi ek abhyasachi paddhat ahe, tyat mi laturkar asalyane mala tyacha abhiman ahe. Latur pattern ha GI(Geograpical indication) nahich muli, tharavik vidyalayani tharavun tharavik parikshanchi uttam tayari karan(coachin classes included.) to pattern follow karanarya vidyalayancha nikal 80% chya var ahe. Shahu, dayanand, basweshwar ni mahatma gandhi college cha tyat samavesh ahe.
Itaranni to dhada giravanyaaivaji fakt result che ‘aakade’ kase lavata yetil he pahilyane ha parinam.
Copy virodhat sabal pavale uchalali geli he kautukaspad. Pan itar boardanihi lakshat thevava, supatale kadhi na kadhi jatyat yetatach, ti vel yenyapurvi shahane vha.
gade Tai Tumhi chan lekh lihila aahe. attach mi Savadhan chya blogvar Mophat prahikshanabaat ek vachala. Phar udbodhak aahe.8-9 vi chya mulana lihita yet nasatana ti ithaparynt aali kashi asa prashna tyani vicharalay .aho sagalya maharashtratach ashi avastha aahe. Shikshanacha Khel khanadoba !!