Anti-climax..

रावणाला मारायला राम आला होता. म्हणजे रावणाची योग्यता इतकी होती, शक्ती इतकी होती, आराधना, भक्ती इतकी होती की त्याच्या बरोबरीचा शत्रू म्हणजे राम. यात रावणाचे महानत्व येते. (काही लोक उलटे पाहतात की रावणासारख्या शत्रूला मारले म्हणून राम जास्त मोठा.. म्हणजे रावणाच्या पात्रतेवरून रामाची योग्यता मोजतात) ते काही असो. तुम्ही खूप कष्ट करता, प्रयत्न करता, रिझल्ट्स मिळवता, प्रेझेंट करता आणि ऐन वेळी काहीतरी फालतू म्हणजे अतिशय फालतू गोष्टीमुळे पचका होतो. आणि सगळ्याच गोष्टी अचानकपणे फोल वाटू लागतात. जर प्रोफेसरने काही मोठा कन्सेप्चुअल प्रश्न विचारला असता आणि उत्तर आले नसते तर किमान त्या प्रश्नाच्या क्लिष्टपणामुळे वाईट वाटले नसते. अतिशय भंकस चूक केली, चुकीची लाईन काढली ग्राफमध्ये आणि प्रोफेसरने नेमके ते पोईंट आउट केले. इतके वाईट वाटले म्हणून सांगू. या गोष्टीमुळे फक्त प्रोजेक्टच्या बाबतीतचा हलगर्जीपणा, आळस आणि बेफिकीर वृत्ती दिसून येते. कितीही नाही म्हणालो तर तसेच पोर्ट्रे होते ते. काय करणार.. आणि त्याहीपुढे तुमच्या ग्रुप मेम्बर्सचा विश्वासघात केल्यासारखे असते कारण तुमच्या चुकीमुळे त्यांच्या पण ग्रेड्सवर परिणाम होणार असतो. एवढे सगळे करून, अयोध्येहून निघून विजनवास स्वीकारून, संपूर्ण भारतवर्ष चालत चालत पार करून, वानरांची सेना जमवून, समुद्राला पार करून शेवटी तो क्षण येतो. युद्धाचा… रणांगणामध्ये उभे ठाकल्यावर समोर रावण असताना लढून मरण्यापेक्षा भोवळ येऊन खाली पडल्यास त्याला काय म्हणणार?

7 thoughts on “Anti-climax..

  • Nikhil Sheth

   अरे घरी आलो तेव्हा समर्थांच्या भाषेत सांगायचे झाले तर – ‘ध्वनी कल्लोळ उठिला’ होता नुसता कानात …. हेहेहाहेहे… असो. आत्ता दुसरा पेपर आहे शेवटचा… अर्धा मास्टर पण होत आलो…:)

 1. शब्दांकित

  तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून सांगते, रावण होताच ग्रेट! रामाने त्याचा पाडाव केल्यावर त्याला नमस्कार केल्याचं रामायणात सांगितलं आहे. त्याच प्रसंगी रावणाने रामाला दीक्षा दिल्याचं हि ऐकिवात आहे.

  पण तुमच्या ग्राफबद्दल मात्र वाईट वाटलं.

 2. nikhil bellarykar

  हे म्हणजे मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीतील औरंगजेब आणि शिवाजी महाराज
  या दोघांनी पूर्वजन्मी बदरिकाश्रमात राज्य इच्छा धरून एकत्र तपश्चर्या केलेल्या गोष्टी सारखे झाले!!!असो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s