नक़श फ़रयादी

पहिल्या वेदाची सुरुवात ‘ॐ अग्निमीळे पुरोहितम् ॥ यज्ञस्य देवमृत्विजं ॥’  अशी आहे तर जुन्या करारात म्हणतात – In the beginning God created the heaven and the earth. तर नव्या करारात मथ्यू च्या गोस्पेल मध्ये The book of the generation of Jesus Christ, the son of David, the son of Abraham…. तर त्याही नंतर आलेल्या कुरअनच्या पहिल्या चाप्टर ज्याचे नाव आहे ‘अल फ़तिआह’ त्यात तर सेम श्रीगणेशाय नमःच आहे – ‘बिस्मिल्लाहिर्रहमानइर्रहीम अलहमदूलील्लाही रब्बीइलाहमिना’  गीतेमध्ये सुरुवात होते ती ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ने तर ज्ञानेश्वरी म्हणते ‘नमोजी आद्या’… काहीही असो… आम्ही मात्र दिवान-ए-गालिब ने सुरुवात करतो….. अर्थांच्या छटांची अल्टीमेट सर्कस…

نقش فریادی ہے کس کی شوخیِ تحریر کا
کاغذی ہے پیرہن ہر پیکرِ تصویر کا

नक़श फ़रयादी है किस की शोख़ी-ए तहरीर का
काग़ज़ी है पैरहन हर पैकर-ए तसवीर का

आता ‘ब्लॉग’च्या बाबतीत हे म्हणणे शब्दशः घेता येत नाही म्हणा… कागद गेले. पण पैकर-ए-तस्वीर ची किंमत मात्र तशीच आहे अजून.. मर्त्य वस्तूवर उठलेले तरंगच जणू. मग ती तहरीर शोखियोंसे भरलेली असो वा नसो. पण नक़श फ़रयादी मात्र कायम असतात. बाकी जुन्या करारातले वाक्य गीतेला लागू पडत नाही आणि कुरआन मधले वाक्य ऋग्वेदात लावता येत नाही.. पण हे वाक्य मात्र सगळ्यांना तसेच लागू पडते.. (अर्थात वेद अपौरुषेय मानत असाल आणि इतर ही धर्मग्रंथ हे God/اللہ प्रेरित आहेत असे मानणे असेल तर विषयच संपला)

Advertisements

4 thoughts on “नक़श फ़रयादी

 1. chandrashekhar deshpande

  ‘iskoolke timepe’
  asa uchchar hava ‘ is schoolke’
  navhe.
  1.hay gaane massessathi aahe
  2.avghad lihine sope aste;sope lihine avghad aste.
  3.mala gaane avadle tar mazi abhiruchi uchcha nahika?

  • Nikhil Sheth

   छे, तसे बिलकुल म्हणत नाहीये मी.. उलट मलाही ही गाणे खूप आवडले.. हसून हसून मुरकुंडी वळली… एक्स.एल.आर.आय. चे जसे एक्सएल की लडकीया गाणे आहे तर आयआयटी खडगपूर मधले हे फेमस गाणे आहे… इथे २-४ लोक एकत्र आले की लगेच आम्ही हे गाणे बघायला बसतो.. जबरी मजा येते…. लिहायचं टोन असा होता की बघा, अशीही गाणी पब्लिकला आवडतात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s