टोबा टेक सिंग

सआदत हसन मंटो, अजून एक दुर्दैवी पान… इतिहासाचे, साहित्याचे…. फाळणी-पूर्व भारतामध्ये जन्म आणि नंतर लाहोर मध्ये राहिले. लाहोरला गेल्यावर पुन्हा एकदा जुन्या भारताची स्वप्ने पाहत दारू ढोसून लिव्हर खराब करून गेला हा माणूस. ५५ साली अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी. उर्दू मध्ये लघु-कथांचा बाप माणूस हा. त्यांचा ठंडा गोश्त, letters to uncle Sam, बू… सगळे काही खूप फेमस आहे. पण सआदत म्हटले की पहिल्यांदा काय आठवत असेल तर ते म्हणजे ‘टोबा टेक सिंग’.. फाळणीवर अपार साहित्य निघाले. अगदी तमस, गर्म हवा, मम्मो, पिंजर, गदर, खामोश पानी सारखे सीनेमे असोत की Freedom at Midnight, ट्रेन टू पाकिस्तान, मिडनाईट चिल्ड्रेन, इंटरप्रीटर ऑफ मालाडीज इंग्रजी पुस्तके असोत, ५५ कोटींचे बळी किंवा मग बाप्सी सिधवा, आणि सआदत हसन मिंटो यासारखे लेखक असोत.

उर्दू साहित्यातल्या लघुकथांचा या माणसाने एक वेगळाच अविष्कार केला. Satire, Parody वगैरे प्रकारात खूप पोहोचलेला माणूस हा. पण तरीही सआदत हसन मिंटो = टोबा टेक सिंग हे समीकरण गेली ५०-५५ वर्षे तसेच आहे. फाळणी वरचे एक क्लासिक सटायर. कालच त्याच्या खूप जुन्या व्हर्जनची पीडीएफ मिळाली. ज्यांना उर्दू वाचता येते त्यांच्यासाठी पर्वणी आहे. आणि ज्यांना येत नाही, त्यांच्यासाठी बीबीसीचे लिप्यंतर आहे.

फाळणी नंतर ३ वर्षांनी दोन्हीकडच्या परधर्माच्या वेड्यांची अदलाबदल करायची ठरते. पाकिस्तान मधून वेडे हिंदू-शीख आणि हिंदुस्तानातून वेडे मुस्लीम दुसरीकडे पाठवायचे ठरवतात… लाहोर मधल्या एका वेड्यांच्या इस्पितळात गोष्ट सुरु होते. ‘तबादले की तैयारियाँ मुकम्मल हो चुकी थीं’ हे एवढे साधे पण वाक्य केवढेतरी भकास दृश्य डोळ्यासमोर उभे करते. शेवटी या वाक्याने जेव्हा गोष्ट संपते तेव्हा आपला दिल तहस-महस झालेला असतो – ख़ारदार तारों के पीछे हिंदुस्तान था, इधर वैसे ही तारों के पीछे पाकिस्तान ; दरमियान में ज़मीन के उस टुकड़े पर जिसका कोई नाम नहीं था, टोबा टेक सिंह पड़ा था.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s