इक-इक पत्थर जोड़ के – कतील शिफाई

कतील शिफाई… नाव बहुधा माहित नसेल.. खरंच भारताचे दुर्दैव आहे की फाळणीनंतर उर्दूला विसरून गेलो. प्रॉपर खच्चीकरण झाले उर्दूचे… मुस्लिमांची भाषा म्हणून पाकिस्तानने क्लेम केला आणि आपण जास्त विचार ना करता देऊन टाकली.. प्रश्न उर्दू चा नाही पण त्यामुळे २ संस्कृत्यांमध्ये प्रचंड फट निर्माण झाली. माहितीचे, कलेचे आदानप्रदान थांबले. अनेक मोठे मोठे उर्दू चे शायर पाकिस्तानमध्ये होऊन गेले… त्यांचे काव्य आपल्याला कळणार नाही असे नाही. वाचायला मिळाले, ऐकायला मिळाले तर नक्कीच आवडेल.

या कवीचे खरे नवे ‘औरंगझेब खान’. आत्ता आपण ज्याला नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स म्हणतो किंवा खैबर रिजन तिथे एक जिल्हा आहे ‘हरिपूर’ नावाचा तिथला याचा जन्म. १९१९ चा. उर्दू कवींमध्ये टोपण नाव घेऊन लिखाण करायची परंपरा आहे. तसे याचे नाव ‘कतील शिफाई’. कतील म्हणजे ज्याचा ‘कत्ल’ झाला आहे तो आणि ‘शिफाई’ कारण त्याच्या गुरुचे नाव ‘शिफा’ होते त्यांना दिलेला आदर.

सुरुवाती-सुरुवातीला ‘ज़िन्दगी में तो सभी प्यार किया करते हैं, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा’ सारख्या सुमार रचनांपासून सुरुवात करून हा शायर गालिब स्टाईल मध्ये ‘मैं इस लिये मनाता नहीं वस्ल की ख़ुशी, मेरे रक़ीब की न मुझे बददुआ लगे’ सारख्या एकदम सटल रचना करून जातो.

लहानपणी वालीद लवकर पैगंबरवासी झाले आणि याच्यावर कमावण्याची नौबत आली. काही खेळाचे सामान विकणारे दुकान काढले, धंदा नाही चालला नी मग शेवटी रावळपिंडीची वाट धरली. १९४६ च्या सुमारास लाहोरला ‘आदाब-ऐ-लतीफ़’ नामक मासिकात सह-संपादक म्हणून काम सुरु केले.  ४७ मध्ये कोण फिल्म प्रोड्युसर ने गाणी लिहायला सांगितली आणि तिथून जो प्रवास सुरु होतो… तो म्हणजे स्तिमित करून टाकणारा आहे; अनेक फेमस गाणी, गजला, नज्म असे करत करत मग काव्य-संग्रह, पुस्तके तो शेवटी पाकिस्तान्माधला साहित्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळवूनच थांबतो. हिंदुस्थान सरकारचा ‘अमीर खुस्रो पुरस्कार’ पण मिळाला.

पूर्वी शायरी म्हणजे पर्शियन शब्दांचा नुसता भरणा असायचा… अर्धे शब्द सामान्यांना कळायची मारामार. गालिबला पण एकदा वैतागून काही शेरांचा अनुवाद फारसीतून उर्दू मध्ये करावा लागला होता. नंतर स्वातंत्र्याच्या काळात ‘तरक्की-पसंद’ किंवा ‘सुधारणावादी’ कविता आल्या पण तरीही त्या ‘मासेस’ पर्यंत तितक्या पोहोचल्या नाहीत. ते झाले तेव्हा जेव्हा उर्दू शायर चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना समजतील अश इगणी लिहू लागले तेव्हा. त्यात साहीर लुधियानवी, कतील शिफाई वगैरे अग्रणी. हिंदी शब्द जमतील तेवढे वापरूनसुद्धा आशयाला आणि सौंदर्याला धक्का ना लावता रचना यांनी केल्या. नाहीतर गालिब जेव्हा म्हणतो ‘गुंचा-ए-नाशीगुफ्त’ किंवा ‘बूद-ए-चिराग़-ए-कुश्ता’ म्हणजे काय ते कळायला आधी वेळ जातो. त्याचे सौंदर्य कळणे पुढचेच.

विरह म्हणजे उर्दू शायारांचा आवडता विषय.. एकदम जीव की प्राण… असा एक पण शायर नाही सापडणार ज्याने हिज्र, इंतेजार यावर कविता नाही केली. कतील कसा याला अपवाद असणार? तो म्हणतो – ‘जाने वो क्या सोच रहा था अपने दिल में सारी रात, प्यार की बातें करते करते उस के नैन भर आये थे’. साध्या साध्या शब्दात पण प्रचंड ताकद असते नाही का? सक्षम कवीची रचना वाचली की याची अनुभूती आवर्जून येतेच येते. त्याच काव्यात पुढे तर थोडासा ओ’हेन्री पण डोकावून जातो.. एकदम दर्दभरा ओ’हेन्री. कतील म्हणतो – ‘उसने कितने प्यार से अपना कुफ़्र दिया नज़राने में, हम अपने ईमान का सौदा जिससे करने आये थे’… अपेक्षा आणि अपेक्षाभंग कायम असे एकमेकात गुंतून येतात. सगळेच कायम असे अर्धेमुर्धे होते की हसावे की रडावे तेच कळत नाही… जिंकलो की हरलो पत्ताच लागत नाही…हा शेर वाचताना मला कायम का जाणे, बोरिस पास्तरनाकची ‘डॉ झिवागो’ आठवते….

पण सगळ्यात उत्कृष्ट गजल म्हणजे इक इक पत्थर –

इक-इक पत्थर जोड़ के मैंने जो दीवार बनाई है
झाँकूँ उसके पीछे तो रुस्वाई ही रुस्वाई है
यों लगता है सोते जागते औरों का मोहताज हूँ मैं
आँखें मेरी अपनी हैं पर उनमें नींद पराई है
देख रहे हैं सब हैरत से नीले-नीले पानी को
पूछे कौन समन्दर से तुझमें कितनी गहराई है
सब कहते हैं इक जन्नत उतरी है मेरी धरती पर
मैं दिल में सोचूँ शायद कमज़ोर मेरी बीनाई है
बाहर सहन में पेड़ों पर कुछ जलते-बुझते जुगनू थे
हैरत है फिर घर के अन्दर किसने आग लगाई है
आज हुआ मालूम मुझे इस शहर के चन्द सयानों से
अपनी राह बदलते रहना सबसे बड़ी दानाई है
तोड़ गये पैमाना-ए-वफ़ा इस दौर में कैसे कैसे लोग
ये मत सोच “क़तील” कि बस इक यार तेरा हरजाई है

(हरजाई – सर्वव्यापी, दानाई – sanity)

शेवटी चित्रपटासाठी लिहित असल्याने बहुतेक रचना या प्रेम, प्रेमभंग, दिल, यार वगैरे प्रकारात आहेत पण काही काही ठिकाणी तर स्वतःच्या भावनांवर भाष्य करतानापण काहीतरी उच्च बोलून जाणे म्हणजे ‘कतील’ची खासियत. आता हेच बघा. आशिक-माशुक वाले फेमस प्रकरण. ती त्याला सोडून गेली आहे आणि तो मला जास्त काही दुःख झाले नाही असे सांगत आहे पण मध्येच म्हणतो – ,किस को ख़बर थी साँवले बादल बिन बरसे उड़ जाते हैं, सावन आया लेकिन अपनी क़िस्मत में बरसात नहीं’ तर दुसरीकडे – ‘गुनगुनाती हुई रफ्तार बड़ी नेमत है| तुम चट्टानों से भी फूटो तो नदी बन के बहो|’ आणि याला काय म्हणावे? ‘दिन में हँसकर मिलने वाले चेहरे साफ़ बताते हैं, एक भयानक सपना मुझको सारी रात डरायेगा’

आणि शेवटी? २००१ मध्ये मृत्यू, लाहोरमध्ये एका रस्त्याच्या नावाचा धनी, जन्मगावी कतील शिफाई नावाचा मुहल्ला, अनेक अजरामर पाकिस्तानी फिल्मी गाणी आणि अनेक कॉलेजात डिग्रीसाठी अभ्यासाला कतीलची पुस्तके…

Advertisements

3 thoughts on “इक-इक पत्थर जोड़ के – कतील शिफाई

 1. Shantanu Deo

  “आज हुआ मालूम मुझे इस शहर के चन्द सयानों से
  अपनी राह बदलते रहना सबसे बड़ी दानाई है ”

  Waah waah.
  Nikhil , mi tuza khup motha fan aahe. Far sundar lihitos. Specially kavitanbaddal.
  Tuza “Ti geli Tevha” wala lekh tar apratimach hota.
  Ek separate blog suru kar.
  Best luck asach lihit raha.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s