त्रिवेणी

जपान म्हटलं की काय आठवते? झेन कथा, हायकू, इकेबाना, बोन्साय, ओरिगामी, गेयशा, कोडो, बर्नाकू, काबुकी, खान्जी……. हे सगळे ऐकून असतो. कशाचा अर्थ काय ते थोडक्यात माहित असते पण त्याबद्दल फारसे ऐकले नसते… ‘जपानची संस्कृती = उपरिनिर्दिष्ट शब्द’ असे एकच समीकरण आपल्या मनात असते… फार तर फार कोणा रसिक चहा प्रेम्याला ‘साडो’ अनुभवायची इच्छा असते. तरी पण हायकू आणि झेन कथा आपल्याकडे पुष्कळ आल्या आहेत. शांताबाई आणि इतरांनी पण त्यावर बरेच लेखन केले आहे. गुलझार साहेबांनी तर हिंदी मध्ये शायरीला नवे आयामच प्रदान केले. शेर असतो २ ओळींचा. उल्ला-मिस्रअ आणि सानी-मिस्रअ.. पाहिली ओळ आणि दुसरी ओळ… उर्दू काही फारशी अवघड नाहीये बघा. पाहिली ओळ मधला ‘पहिली’ साठी जो शब्द आहे तो आहे उल्ला त्याच्या जवळचा उर्दुच पण आपल्या ओळखीचा शब्द म्हणजे अव्वल. पहिला. प्रथम… तर अशा २ ओळी असतात. आणि अनेक शेरांची मिळून गजल बनते. जरी संपूर्ण गजलेला अर्थ असला आणि त्यात एक फ्लूईडीटी असली तरी प्रत्येक शेर हा पण स्वतंत्रपणे अर्थसंपूर्ण असायला लागतो.. आणि मग त्यानंतर काही काफिया-रदीफ ची बंधने असतात… अजून काही डीटेल्स आहेत. पण २ ओळी या कायम २ च असतात. गुलजार साहेबांनी त्यात तिसरी ओळ टाकली. आता आहे तो शेर तसाच आहे. २ ओळींना मिळून पूर्ण अर्थ आहे. आणि त्यात तिसरी ओळ आली की पहिल्या २ ओळींमधून जो अर्थ अभिप्रेत झालेला असतो तो एकदम बदलून जातो. एकदम वेगळेच दालन उघडावे, वीज चमकावी किंवा १८० अंशाचे वळण घ्यावे.. असे काहीतरी धक्का तंत्र तरी असते किंवा.. जाऊ दे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. हायकूच्या जवळ जाणारा आहे पण हायकू नाही. तुम्हीच वाचा –

कोई चादर की तरह खींचे चला जाता है ये दरिया..कौन सोया है तले इसके जिसे ढूंढ रहा है?
डूबने वालेको भी चैनसे सोने नहीं देते…
किंवा
ये मना इस दौरान कुछ साल बीत गए है, फिर भी आँखों में चेहरा तुम्हारा समाई हुई हु..
किताबोंपे धुल जमनेसे कहानी कहा बदलती है?

मानवी नात्यांवर तर हे किती सुरेख आणि विराण आहे बघा –

ना हर सहर का वो झगडा, ना शब् की बेचैनी,
ना चुल्हा जलता है घर में ना आखें जलती है..
कितने अमनसे घर में उदास रहता हु…

इथे गुलजार साहेब स्वतः त्रिवेणी म्हणजे काय ते समजावून सांगत आहे बघा..

4 thoughts on “त्रिवेणी

    • Nikhil Sheth

      त्या भाषणात गुलजार साहेब म्हणतात की जसे गंगा आणि यमुना एका ठिकाणी येते तसे शेराच्या २ ओळी असतात आणि त्यातच जशी सरस्वती येऊन मिळते त्याला त्रिवेणी संगम म्हणतात… २ ओळी समोर स्पष्टपणे दिसतात.. तिसरी ओळ नकळतपणे सरस्वतीसारखी स्फुरते आणि शेराच्या अर्थाला पूर्णपणे बदलून टाकते… पण ती त्या संगामध्ये असतेच… फक्त तुमच्या मनात प्रगट होणे झाले पाहिजे….

    • Nikhil Sheth

      हेरंब – खरे तर अजून खूप खूप चांगल्या रचना त्रिवेणी मार्फत गुलझार साहेबांनी केल्या आहेत.. त्याची काही पुस्तके पण निघाली आहेत… मिळाली तर जरूर वाचा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s