सन सतराशे एकसष्ट वर्ष अतीनष्ट या देशाला…

पानिपतचे तिसरे युद्ध. २५० वर्षे पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी १४ जानेवारीला. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासातल्या ज्या काही अजूनही सामन्यांमध्ये फेमस असणाऱ्या घटना आहेत त्यातले हे एक. मराठी कादंबरीकारांनी, नाटककारांनी पण तो इतिहास जिवंत ठेवला. मग तोतयाचे बंड असो, पानिपत १७६१ असो, विश्वास पाटलांची पानिपत असो की सावरकरांचे नाटक. स्वामी कादंबरी असो किंवा गडकरींचा पानिपतचा फटका… काय सुंदर फटका आहे तो. ‘कौरव-पांडव संगर-तांडव द्वापराकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती..’ एका ठिकाणी गडकरी लिहितात – ‘काळाशी घनयुद्ध करू मग अबदल्लीची काय कथा,  दत्ताजीचा सूड ना घेता जन्म अमुचा खरा वृथा’

‘अटके’च्या स्वारीबद्दलचा अभिमान असावा की ती एक खूप मोठी राजकीय चूक होती यावर बरेच वाद झाले. कटकेपासून अटकेपर्यंत भीमथडी घोडी दौडली याचा अभिमान, लाहोरवर भगवा याचे कौतुक कोणी करेल… तर कोणी अटकेच्या स्वारीचे पर्यवसान पानिपतात कसे झाले याचे विश्लेषण करेल. उत्तरेचे राजकारण करण्यात मराठे कसे कसे चुकत गेले असे कोणी सांगत जाईल तर कोणी दिल्लीवर मराठी सत्ता असल्याचे गुणगान गाईल. शिव्या घालणारे २ वाक्य सारखी वापरतील – Only Expansion, No Consolidation आणि शेजवलकरांचे ‘हिंदुपदपातशाही की भटकुलबादशाही?’ तर बाजू घेणारे भारताच्या सद्य नकाशाकडे बोट दाखवतील की बघा हे एवढाच प्रदेश मराठ्यांनी अमलाखाली आणला तो आजचा भारत, बाकी सगळा गेला….

संग्रामामध्ये कोणी कोणी काय काय मिस्टेकी केल्या इथपासून ते बुराडी की बरारी यावर बराच खल झाला. मल्हाररावांचा दोष किती, नजीब खान किती पातळयंत्री होता आणि मराठ्यांचे भूगोलाचे ज्ञान किती कच्चे… एक संपूर्ण पिढी गारद झाली किंवा नानासाहेबांचा कर्तृत्व कसे कमी पडले वा पेशवेशाहीतले कर्ज असो की तीर्थक्षेत्र आणि धर्म-धर्म करायचा अतिरेक (उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया?) … शिवशाही आणि पेशवे यांच्यातला फरक… तो फरक राज्याकाराभारातला तासच युद्धनीतीतला… त्याचा पुढे काय मराठेशाहीवर कसा काय परिणाम झाला… माधवरावांचे अल्पायुष्य तिथपासून ते तीन अंग्लो-मराठा युद्धे आणि पळपुटा बाजीराव…बरेच लिहिले वाचले चर्चिले गेले आहे…आणि आता २५० वर्षांच्या औचित्य निमित्त पुन्हा एकदा सगळा धुरळा उडणार आहे.

लोक पानिपत युद्ध स्मृती-समिती स्थापन करतील, पानिपत ला मोठी यात्रा काढतील, सत्कार समारंभ सोहळे करतील, चर्चासत्रे, स्मृती-पत्रके निघतील, भाषणे देतील… थोडे पोट-तिडीकीने तर थोडे पैसे पैसे करतील…मिरवतील… कोणी खरा इतिहास प्रेमी असेल, डोळस असेल तर कोणी हेतुगर्भ हालचाली करतील. सगळा डोंबाऱ्याचा खेळ. परत एकदा पुण्याचे इतिहासकार आणि कोल्हापूरचे वेगळेच गडी… नुसता काला करतील इतिहासाचा.. सगळे मिळून शेवटी काय साध्य होईल? हा वेगळाच प्रश्न आहे. स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शाह चा एक सिनेमा आहे १९८१ चा. ‘चक्र’ नावाचा… त्याच्याशी सिमिलर हे एक घटनांचे चक्रच आहे. किंवा सावंतांचा कर्ण म्हणतो तसे ‘नियतीचे गरागरा फिरणारे चक्र’. महाराजांच्या राज्याभिषेकाला जेव्हा ३०० वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा काय कचरा केला होता सगळ्यांनी… किती ते वाद-विवाद, गडावर काय करायचे काय करायचे नाही, समितीचे अध्यक्ष कोण? वन-विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्यातली भांडणे, तरी तेव्हा मिडिया नव्हती एवढी… आता बघू काय करतात ते…गडकर्यांच्या या ओळी परत म्हणायला नाही लागल्या म्हणजे मिळवले –
पुरे पुरे हे राष्ट्र विघातक परस्परांतील वैर अहो, पानपताची गोष्ट ऐकुनी बोध एवढा तरी घ्या हो.
भारत बांधव! पहा केवढा नाश दुहीने हा झाला, परस्परांतील कलहाकरीता मरण मराठी राज्याला…

Advertisements

11 thoughts on “सन सतराशे एकसष्ट वर्ष अतीनष्ट या देशाला…

 1. shreenivas

  sheth, lekh chhan ahe
  pan apalya “RATIONAL” shaileet ahe ase vatate…
  lekhacha uddeshya jar keval panipatachya smruti alavane asel tar lekh chhan ahe…
  pan hyapalikade jaun apan kahi vichar kela asel ase vatate… to kalala asata tar manikanchan sadhala asata..
  aso…
  kadacht lekhan-seememule apanas he shakya jhale nahi ase disate…
  taree samakhsya bhetalyavar boluch

  maryadeyam virajate
  shreenivas

 2. nikhil bellarykar

  the lekh is very good and I must say, you have spoken my mind as well here. tuzi ultimate query as to “shevati kay hoil?” cha asa ahe ki to prashn shevati history as constructed, propounded,interpreted and propagated today yakade jato.
  I think that as of now, your question is unanswered.
  wat sayeth?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s