तो जियें हम और इस उम्मीद पर दो दिन तलक…

मुघल व्हिलन होते, औरंगझेब ग्रेटेस्ट व्हिलन होता.. अकबर हा व्हिलन इन डिसगाईस होता….. बेलाशक वाटो तसे.. पण बहादूर शाह जफर बद्दल कुठेतरी मनात खूप खूप खूप दर्दभरे फिलिंग आहे मात्र…. आणि असूया तर अपार….साला कसा सुदैवी आणि दुर्दैवी माणूस होता रे तो…  नशिबात आले सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात अशक्त राज्याचा राजा होणे. पण त्याच्याच वेळी उर्दू चा काय सुवर्णकाळ म्हणतात तो होता. एकतर स्वतः बहादूर शाह झफर, गुरु लाभला तो पण खाकानी-ए-हिंद सारखा, दरबारात मोमीन खान मोमीन आणि साक्षात गालिब. असे लोक आजूबाजूला असल्यावर बादशहाची शायरी उत्तम न उतरणार तर काय….तो म्हणतो कसा बघा एके ठिकाणी – ‘बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी, जैसी अब है तेरी महफ़िल कभी ऐसी तो न थी’…  पण या बादशहाची कोणती पण गजल वाचली की हा माणूस काय विरहाने व्याकुळच वाटतो. लोक अल्लामा इक्बालला दुसरा गालिब म्हणतात. पण पहिल्या गालिब मध्ये जे आहे आणि या दुसऱ्या गालिब मध्ये जे नाही तेच नेमके जफरकडे आहे. खुशमिजाज, सुखानमिजाज, आर्तता, हिज्र आणि गम… एकदा म्हणतो –

दिल की मेरी बेक़रारी मुझ से कुछ पूछो नहीं
शब की मेरी आह-ओ-ज़ारी मुझ से कुछ पूछो नहीं

बार-ए-ग़म से मुझ पे रोज़-ए-हिज्र में इक-इक घड़ी
क्या कहूँ है कैसी भारी मुझ से कुछ पूछो नहीं

ऐ “ज़फ़र” जो हाल है मेरा करूँगा गर बयाँ
होगी उन की शर्म-सारी मुझ से कुछ पूछो नहीं

आणि लगेच दुसरीकडे म्हणतो – इथे अनुप्रास बघा किती सुंदर आहे ते –

तुम न आये एक दिन का वादा कर दो दिन तलक, हम पड़े तड़पा किये दो-दो पहर दो दिन तलक ll
दर्द-ए-दिल अपना सुनाता हूँ कभी जो एक दिन, रहता है उस नाज़नीं को दर्द-ए-सर दो दिन तलक ll
गर यक़ीं हो ये हमें आयेगा तू दो दिन के बाद, तो जियें हम और इस उम्मीद पर दो दिन तलक ll

अहाहा…तो जियें हम और इस उम्मीद पर दो दिन तलक… जफरच जाणे असे काही लिहिणे.

गम्मत अशी की त्याच्याबद्दल तेव्हा दिल्लीत लोक काय म्हणायचे? ‘शहन्शाहे आलम, अज दिल्ली ता पालम’ ‘साऱ्या जगाचा बादशाह, कुठून कुठे? तर दिल्लीपासून पालम पर्यंत याची सत्ता’… हाहा…तुम्ही श्याम बेनेगल चे सीनेमे बघता का? श्याम बेनेगल आणि स्मिता पाटील ने एक जमाना गाजवला होता. अर्थ, बाजार, निशांत, भूमिका, मंडी, आक्रोश…एकेक सिनेमा म्हणजे एकेक महा-काव्यच आहे. ८३ सालचा दोघांचा सिनेमा म्हणजे ‘मंडी’ आणि त्यातले एक गाणे – ‘शमशीर बरहना माँग ग़ज़ब बालों की महक फिर वैसी है, जूड़े की गुंधावत बहर-ए-ख़ुदा ज़ुल्फ़ों की लटक फिर वैसी है’ ती गजल जफरचीच. (तेव्हा वनराज भाटीया अत्यंत श्रवणीय म्युजिक कंपोज करत होते – मंडी मधली आशाने गायलेली गाणीही सुरेख आहेत. इथे ऐका )

हा माणूस कवितेतून कायम फक्त माणूसच वाटतो. कुठे आपले स्तुती-पर काव्य दरबारी कवीकडून लिहून घेऊन त्याला मोहरा देणारे राजे आणि कुठे याच्या स्वतःच्या रचना –

हमने दुनिया में आके क्या देखा, देखा जो कुछ सो ख़्वाब-सा देखा ll
है तो इन्सान ख़ाक का पुतला, लेक पानी का बुल-बुला देखा ll
ख़ूब देखा जहाँ के ख़ूबाँ को, एक तुझ सा न दूसरा देखा ll
अब न दीजे “ज़फ़र” किसी को दिल, कि जिसे देखा बेवफ़ा देखा ll

१८५७ च्या उठावात दिल्ली ची धुळदाण उडाली…मुघालशाही अस्तंगत झाली… याला याच्या मुलांची कापलेली मुंडकी इंग्रजांनी ताटामध्ये पेश केली.. आणि तसेच उचलून घेऊन गेले.. रंगून ला… नवाब वाजीद अली शाह (अवध) ला जेव्हा कलकत्त्याला डीपोर्ट केले तेव्हा त्याने गेलेली ठुमरी – ‘बाबुल मोरा नैहर छुटो जाय’ … के एल सैगल आणि भीमसेन अण्णांनी अजरामर केली आहेत… अवध ते कोलकत्ता असा प्रवास होता त्याचा… त्यात एवढी आर्तता… मग बहादूर शाह जफर ला एवढ्या म्हातारपणी अशी कुटुंबाची आणि राज्याची वासलात लावून रंगूनला इतक्या दूर जाताना जे वाटले असेल ते शब्दात उतरले ते इतके अप्रतिम आहे की बस…

उम्र-ए-दराज़ माँग कर लाये थे चार दिन
दो आरज़ू में कट गये दो इन्तज़ार में

कितना है बदनसीब “ज़फ़र” दफ़्न के लिये
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में

खरंच.. दोन गज जमीन पण नाही मिळाली मायभूमीत मरायला याला…(कू-गल्ली, यार-मित्र) यावर पूर्वी एक सिनेमा येऊन गेला.. कधी कुठे पहिला नाही पण त्यातली गाणी मस्तच आहेत. रफी साहेब आपले नेहमीप्रमाणे दर्दभरे नगमे आवळत आहेत. आणि शब्द अर्थात साक्षात जफरचे –

7 thoughts on “तो जियें हम और इस उम्मीद पर दो दिन तलक…

 1. शब्दांकित

  जबरदस्त! तुमचा उर्दूचा अभ्यास चांगला आहे. त्यातून दांडगी सर्जनशीलता! भावार्थ सांगताना येणारी अझिजी पण दुर्लक्षिली जाऊ शकत नाही.

  उर्दूतल्या अजून दर्दभऱ्या निर्मिती, त्यांचा आढावा आणि कलात्मक समीक्षण ह्याकडे लक्ष राहील.

 2. Madhukar Dharmapurikar

  वा, वाह ! बहाद्दुरशहा ‘जफर’ बद्दल वाचत गेलो, आणि अर्थातच ‘लाल किला’ची आठवण ठेवत पुढे पुढे
  गेलो, आणि शेवटी,’आबे-जमजम’ लागावं,तशा या गजल सापडल्या ! तुमच्या आभ्यास-आस्वादाला सलाम!

  • Nikhil Sheth

   जफर खरंच एक वेगळेच रसायन आहे. उर्दू मधली भाषेची सगळी मुलायमता, भावनांचा परिपोष सगळे सगळे आहे… आबे-जमजम चे म्हणाल तर काय सांगू, इस्माईल व्हायची आरजू असेल मस्जिद-अल-हराम दूर नाही…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s