जेम्स लेन पुराण – २

आणि मग सुरु होतो जेम्स लेन चा मध्ययुगीन महाराष्ट्राचा अभ्यास करायचा प्रयत्न. पुस्तकाची सुरुवात त्याने मोठी मनोवेधक केली आहे. डेक्कन क्वीन मधून व्हीटी ते पुण्याचा प्रवास. मुंबईचे वातावरण, कल्चर, तिकडचे लोक मागे टाकून जेव्हा देशावर गाडी येते तेव्हा त्याला जाणवणारा बदल एकदम काव्यमय चितारला आहे. त्याला सगळीकडे दिसते ते शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिव-सेना….. ही चराचर व्यापून राहिलेली कोण व्यक्ती?

दसऱ्याला सुरु होणारे मोहिमा, औरंगाझेबासाठीचा ‘डोंगरातील उंदीर’, दिवाळीला बनवतात ते किल्ले, इतिहासाच्या पुस्तकातून प्रत्येक पिढीला सांगण्यात येणाऱ्या शिवाजीच्या गोष्टी, आदिलशाही-निजामशाही-मुघल यांच्यातले डायनामिक्स, जिजामातेचे माहेरकडचे थोडे, तर थोडे शहाजीराजांचे असे काय काय सांगून त्याला किमान  माहिती आहे हे सिद्ध करतो. आणि एकदम म्हणतो – It is easy to get swept up by the romance of Shivaji’s legend. There are great victories, daring raids, and narrow escapes, all complemented by tales of his virtue and nobility. In Maharashtra, these stories are so well-known, and are knit into seamless narrative, that it is difficult to imagine Shivaji as anything but exemplar of the region’s highest ideals. असे तो म्हणतो तेव्हाच लक्षात येते की याची गाडी कुठे वळणार आहे ते…..

पुस्तकाचे एकूण ५ भाग आहेत.

  • Shivaji and Maharashtrian Hindu Identity
  • The Epic Hero : 17th Century Sources of Heroic Legends of Shivaji
  • The Hindu Hero : Shivaji and Saints
  • The Patriot : Political Readings of Hindu Identity in the Tales of Shivaji
  • Cracks in the Narrative
  • Epilogue : Construction of Hindu and Muslim Identities in Maharashtra

मला सगळ्यात सुरुवातीला याचे नावच खटकते – Hindi King in Islamic India… काय प्रकार आहे? असो. पुस्तकाचे व्यवस्थित विवेचन करेनच येत्या लेखांमध्ये. मात्र त्याने जे मांडले आहे ते कितीही तकलादू आणि खोटे आहे असे कितीही मी म्हणालो तरी त्याने ज्या गोष्टीची आवश्यकता भारतीय इतिहासाच्या विवेचनाला आहे हे सांगितले आहे ते मात्र खरे आहे.

क्रमश


Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s