जेम्स लेन पुराण – १

मला शतकांपासून सतावणारा एक प्रश्न आहे. इतिहासाचा उपयोग करायचा की उपयोगासाठी इतिहास वापरायचा? जर पहिला पर्याय असेल तर खरं ते मांडले पाहिजे आणि त्यातून योग्य तो बोध घेतला पाहिजे.  खालचा परिच्छेद वाचा –

One is astonished in the study of history that the recurrence of idea that the evil must be forgotten, distorted, skimmed over. We must not remember that Daniel Webster got drunk but only remember that he was a splendid constitutional lawyer. We must forget that George Washington was a slave-owner…. and simply remember the things we regard as creditable and inspiring. The difficulty with this philosophy is that history loses its value as an incentive and example; it paints perfect men and noble nations, but does not tell the truth.   –   W.E.B. Du Bois.

आणि दुसरा पर्याय असेल, उपयोगासाठी इतिहास. तर मग त्यात खरे काय खोटे काय, खरे किती खोटे किती याचा विचार ना करता स्पेसिफिक मोटिव्ह साठी इतिहास हवातसा वाकडा तिकडा करून वापरायचा. जसे की राष्ट्र-बांधणीकरता ऐतिहासिक पुरुषांचे आवश्यक तसे मोर्फिंग करून टाकायचे वगैरे…त्याचे तोटे पण खूप आहेत. खूप म्हणजे खूपच आहेत. पण लोकांना तेच समजते. आणि तेवढेच झेपते. जर ऐतिहासिक विभूतीन्मधले गुण-दोष मांडून त्यातून शिकायचे म्हटले तर लोकांना प्रश्न पडेल की कशावर विश्वास ठेवायचा? जीनांची स्तुती जेव्हा अडवाणींनी केली तेव्हाचे प्रकरण आठवा. फाळणी झाली ती दुर्दैवी होती. परत तास प्रकार होऊ नये असे वाटत असेल तर त्या इतिहासाचे नीट आकलन करून घेऊन त्यातून योग्य तो बोध घेतला पाहिजे. मग चुका दोन्ही बाजूंच्या असू शकतात असे लक्षात येते. नुसते ‘आले जीनांच्या मना’ आणि पाकिस्तान तयार झाला असे नाही. पण जर मग आपण आपले पण दोष काढू लागले की मूर्ती-भंजनाचे दुःख मिळते.

स्वातंत्र्य युद्धात क्रांतिकारकांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचे धाडस अतुल्य आहे. त्याग अनुपमेय आहे…वगैरे वगैरे सांगितल्यावर त्यांनी स्वीकारलेल्या मार्गातील चुका, त्यातली अपूर्णता, आणि लॉंग टर्म ध्येयसध्या करताना या मार्गातून अशक्य असलेल्या गोष्टी, त्यांच्या आयडीयोलोजी मधल्या अशा गोष्टी ज्या आता आपल्याला पटणार नाहीत या पण मांडायला नको का? जर त्यांना आपण सर्वार्थाने पुरस्कृत करणार असू तर मग आताच्या नक्सलवाद्यांच्या हल्ल्याला काय म्हणणार? त्यांच्या दृष्टीने ते पण क्रांतीकार्यच करत आहेत नाही का? कृष्णमेघ कुंटेचे एक पुस्तक आहे जेव्हा तो कर्नाटक च्या जंगलात गेला होता तेव्हाचे. तेव्हा वीरप्पन जिवंत होता. वीरप्पन आणि शिवाजी महाराजांच्या मार्गातील समान धागा त्यांनी दाखवला आहे. तो वाचा एकदा जरूर. किंवा नरहर कुरुन्दकरांचा एक लेख आहे ज्यात त्यांनी सुभाषचंद्र बोसांचे चित्रीकरण केले आहे. समर्पक वाटले मला ते खूप. बऱ्याच लोकांना तसे काही वाचणे आवडणार नाही कारण आयुष्यभर ज्यांच्याबद्दल आदर वाटत आला किंवा ज्यांची पूजा करत आलो त्यांचे गुण आहेत तसे दोषही आहेत हे मान्य असूनही त्याबददल ऐका-वाचा-बोलायची सवय नसते. ते नाही आवडत. युद्धस्य कथा रम्या हे ठीके. पण नुसत्या २-३ खुनांनी, ३-४ लुटींनी आणि काही गुप्त संघटना बांधून काही होत नाही. फारतर फार दहशत बसते पण क्रांती घडत नाही. क्रांतीसाठी आवश्यक आहे तो म्हणजे लोक-लढा. त्यासाठी लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. राजा महाराजांचा जमाना केव्हाच गेला. गांधींना कितीही शिव्या घाला. पण त्यांचे लोकांपर्यंत पोहोचायचे स्कील अप्रतिम होते..

जाऊ दे. फार घुमून फिरून आलो. मुख्य गोष्ट होती – जेम्स लेन… त्याच्या पुस्तकात त्याने बरेच मुद्दे मांडले आहेत. आणि महत्वाची गोष्ट अशी की ते सगळे मुद्दे जुने आहेत. जुने म्हणजे चक्क ५०-१०० वर्ष जुने. नवा एकही रिसर्च नाहीये त्यात. मात्र त्यातले बरेच मुद्दे आपल्याकडच्या इतिहासकारांना साक्षेप असल्याने त्यांनी मधी लिखित स्वरुपात मांडले नव्हते. ते कोणकोणते ते लिहेनच. मात्र ते पुस्तक गाजले ज्या उल्लेखामुळे तो येतो पुस्तकाच्या एकदा शेवटी शेवटी. पाचव्या चाप्टर मध्ये. तो एकाच चाप्टर आहे ज्यात तो स्वतःचे असे काही लिहायचा प्रयत्न करतो आणि तिथेच तो फसतो. पुस्तकातून आणि विदेशी विचारसरणीच्या चष्म्यातून भारतीय संस्कृतीबद्दल आणि विचारपद्धतीबद्दल ढोबळ माहिती मिळू शकते पण त्याच्याही पुढे जाऊन जी तार्किक विचार करायला क्षमता लागते ती त्याच्याकडे नाहीये. तेव्हा जे काही ओरिजिनल आहे ते जरी उद्देश्य चांगला असला तरी इतके भंकस आहे की काय सांगू?

क्रमश

6 thoughts on “जेम्स लेन पुराण – १

 1. Naniwadekar

  निखिल शेठ साहेब : तुमचं वाचन तर अफाट आहे. मी स्वत: फार वाचत नसल्यामुले त्याबद्‌दल काही बोलू शकत नाही. तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण आणि वाचनीय लिहिता. पण मधूनच काहीतरी घोटाळा करून बसता.

  “मला शतकांपासून सतावणारा एक प्रश्न आहे.” —- इतक्या लहान वयात तुम्ही इतकं कसं वाचलं हा मला प्रश्न होता. तुम्ही २००-३०० वर्षांचे आहात हे आत्ताच कळतंय. त्या मानानी तुमचं वाचन मग फार नाही.

  “नुसत्या २-३ खुनांनी, ३-४ लुटींनी आणि काही गुप्त संघटना बांधून काही होत नाही.” — एक खून करणं ही देखील काही ‘नुसती’ किंवा ‘सोपी’ गोष्ट नाही. शिवाय २-३ खून करून (सर्व) काही होईल, असा वासुदेव बळवन्ताचा किंवा सुभाषचन्द्राचा दावा नसणारच. (पण मी प्रत्यक्ष त्याबद्‌दल काही वाचलेलं नाही.) राज्यकर्त्यांविरुद्‌ध दहशत निर्माण करायला खूनाचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. ‘काही होत नाही’ म्हणून काही(ही) होत नाही.

  शिवाय खून कोणाचा केला, कधी केला, का केला यावर बरंच अवलम्बून असतं. हिटलर ज़र जून-जुलै १९३९ मधे अ/नैसर्गिक रित्या मेला असता तर कदाचित युद्‌ध झालं नसतं. अफ़ज़ल खान हा शिवाजीला मारण्यात यशस्वी झाला असता तर पुढे काय झालं असतं, हे सांगता येणं कठीण.

  गांधीजी हे लोकांपर्यंत पोचले हे खरं आहे. पण ‘काही होत नाही’ म्हणून बरेचदा काही होत नाही हे तुमचं म्हणणं खरं असलं, तरी काही लोकांपर्यंत पोचल्याचा (इतर) काही लोकांना काही (फायदा) होत नाही, हे ही सत्य आहेच. गांधी लोकांपर्यंत पोचले याचा अहिंसेशीच सम्बन्ध आहे, असं काही नाही. कारण अहिंसेला भेकड मानणारे बाळासाहेब ठाकरेही ‘अप्रतिम स्किल’ दाखवून लोकांपर्यंत पोचले आहेत. आणि गांधीजी लाहोरमधल्या हिन्दु लोकांपाशी पोचण्याऐवजी लाहोरचे हिन्दु लोक स्वर्गात तरी पोचले किंवा दिल्लीत तरी पोचले, हा भाग आहेच.

  • Nikhil Sheth

   नानिवडेकर महोदय, गम्मत अशी की तुम्ही सारखे म्हणते तुमचे काही वाचन नाही, आणि मुद्दे बरेच मांडता… कुठून सुचतात कोण जाणे.
   तुमच्या उजव्या विचारसरणी बद्दल मला कल्पना आहे. तुम्ही जे लिहिले आहे तेही मला ठाऊक आहे. पण मी जे उदाहरण गांधींचे म्हणून वापरले तेच बाळासाहेब ठाकऱ्यांचेही वापरता आले असते किंवा हिटलर चे ही. शेवटी हिटलर ला लोकशाही मार्गाने आधी सत्तेजवळ पोहोचावे लागले आणि ठाकऱ्यांना कितीही कसेही मते व्यक्त केली कसेही काहीही केले (योग्य वा अयोग्य तो वेगळा मुद्दा) तरी त्यानंतर निवडणूक लढवावी लागली. शिवाजी महाराजांचा काल वेगळा होता. म्हणून तर वर म्हणालो आहे की ‘राजा महाराजांचा कालखंड गेला’.. राहिला प्रश्न २-३ खून आणि ३-४ गुप्त संघटना वगैरे… ” (सर्व) काही होईल, असा वासुदेव बळवन्ताचा किंवा सुभाषचन्द्राचा दावा नसणारच. (पण मी प्रत्यक्ष त्याबद्‌दल काही वाचलेलं नाही.) राज्यकर्त्यांविरुद्‌ध दहशत निर्माण करायला खूनाचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. ‘काही होत नाही’ म्हणून काही(ही) होत नाही ”
   असे तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. ही फक्त कार्याची सुरुवात आहे. शेवटी जाणता जनार्दनाकडे यावे लागतेच. सुभाषबाबुंनाही आशा असणार की ते भारताच्या मुख्य भूमीत पोहोचले की लोकांचा पुन्हा पाठींबा मिळेल. दुर्दैवाने ते पोहोचू शकले नाहीत. वासुदेव बळवंत फडक्यांविषयी…दहशतीचा परिणाम होतो पण त्याला मर्यादा असतात. If you want to serve the larger purpose then at some stage, you have to come to the people.

   • Nikhil Sheth

    I know God is in details. पण तरीही महत्वाचे म्हणजे माझा मूळ मुद्दा जो आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्षच केले आहे… मी असे म्हणतो आहे की जर तुम्ही भगतसिंगांचे गुण गाणार असाल तर त्याचबरोबर त्यांच्या मार्गातील कमतरता आणि दोष पण सांगावे का? किंवा सेम अप्लाइज टू गांधी… त्यांचे कार्य सांगताना त्यात राहिलेल्या चुका, त्यांचे व्यक्ती म्हणून दोष वगैरे पण शिकवले पाहिजे की नाही? यावर विचार करतो आहे. व्यक्ती स्पेसिफिक नाही बोलत आहे. इतिहास मांडताना संपूर्णपणे मांडवा की कार्याला उपयुक्त तेवढाच? हा खल आहे. तुम्ही बारीक बारीक मुद्द्यांवर भर देताना मूळ मुद्दा विसरून जात आहात.

   • Nikhil Sheth

    तुमच्या विनोदावर मला पण जरा उत्तर द्यायची इच्छा होते आहे. एकदम तुमच्याच पद्धतीने. लहान सहान डीटेल्स मध्ये जाऊन. मी ‘शतकांपासून’ म्हणालो. पण शतके कशाची ते नाही स्पष्ट केले. तुम्ही असा कसं ग्रह करून घेतला की शतके वर्षांचीच म्हणून? दिवसांची शतके असतील नाहीतर तासांची पण… शतक ते शतक. तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका, माझे वाचन इतके अफाट की बास… हे सगळे मी गेल्या (सेकंदांच्या) शतकातच वाचून काढले….:):)

 2. Naniwadekar

  “If you want to serve the larger purpose then at some stage, you have to come to the people.” – इस्लाम लोकांकडे ‘गेला’ की लोकांना बळज़बरीनी आपल्यात घेऊन आला? याला उत्तर नाही. मोठ्या परिणामासाठी लोक तुमच्या मागे हवेत, हे मान्य. ते कसे येतील याचे अनेक मार्ग आहेत.

  राजा महाराजांचा कालखंड गेला. —- असाही भाग नाही. इदी अमीन, मुशर्रफ़ असे अनेक स्वनियुक्त राज़े आहेत. त्यातला एखादा वंशपरम्परा चालवू शकेलही. शिवाय राजा वाईटच असतो, असंही नाही. अगदी दुर्योधनही प्रजेसाठी कल्याणकारी होता, असं युधिष्ठिर आणि शरपंजरी भीष्म बोलल्याचं ऐकिवात आहे.

  इतिहास मांडताना संपूर्णपणे मांडवा की कार्याला उपयुक्त तेवढाच? हा खल आहे. — यालाही उत्तर नाही. इतिसासाचा अभ्यासकही सगळेच विचार निर्भयपणे मांडेल किंवा मांडू शकेल, असं नाही. टिळक-सावरकरांसारखा नेता इतिहास मांडताना आधीच आत्मविश्वास नसलेल्या आपल्या लोकांना ‘ही दुसरीही बाज़ू पहा’ म्हणून उगीच त्यांचा वाढणारा उत्साह सहसा कमी करणार नाही. ‘प्रसंग पाहोनी चालावे’ हा मोघम सल्ला पुढे ठेऊन प्रसंग पाहून आचार ठरवणं योग्य.

  – डी एन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s