Once again जेम्स लेन..

आणि जेम्स लेनचे पुस्तक वाचून संपले. त्या माणसाने बराच अभ्यास केला आहे. परदेशी व्यक्ती असल्याने त्याचा अभ्यास जास्त भासतो. पण त्याच्यापेक्षाही खूप उच्च दर्जाचे इतिहास संशोधक बघितले असल्याकारणाने तो उगीच आव आणून लिहितो असे वाटते. पुस्तकाचा विषय खरं तर चांगला आहे. धाडसी आहे. मात्र काहीतरी हेतू ठेवून लिहिले आहे असे सारखे वाटते. आणि ‘तो’ उल्लेख करण्याची घोडचूक त्याने केली. अन्यथा पुस्तक अजून बाजारात मिळत असते तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी इतिहास नीटसा माहित नसणाऱ्या लोकांना वाचनीय आहेत.

6 thoughts on “Once again जेम्स लेन..

 1. manohar

  पहिली बाब म्हणज़े ज़ेम्स लेन पुराव्यांची योग्यायोग्यता तपासण्याचे कॊणते नियम आपण स्वीकारले हे सांगत नाही तोपर्यंत त्याच्या संशोधनाला काहीही किंमत नाही.

  • Nikhil Sheth

   जेम्स लेनने जे पुरावे वापरले आहेत…रादर त्याच्या भाषेत जे सोर्सेस वापरले आहेत त्यात नवे काहीच नाही. तेच सारे सोर्सेस आपल्याकडचे इतिहास संशोधक वापरत आहेत. दुसरी गोष्ट अशी की त्याने बऱ्याच ठिकाणी जरी मूळ कागद वाचला असला तर तो मतांच्या बाबतीत खूप इतर रेफरन्सेस वर अवलंबून राहिला आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की त्याने काही नवा रिसर्च केलेला नाही. त्याने फक्त आहेत ते ग्रंथ वापरून कालानुक्रमानुसार ‘शिवाजी’ नावाच्या गोष्टीची व्याख्या कशी बदलत गेली आणि त्यामध्ये कोणकोण सहभागी होते, त्यांची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय होती हे पहिल्या ४ लेखनामध्ये मांडले आहे. आणि पाचव्यात ते आक्षेपार्ह मत. मात्र सगळ्याच धड्यांमध्ये त्याने घेतलेला पवित्र फारच धोकादायक आहे. (त्याला काही काही ठिकाणी वास्तवाची दुर्दैवी किनार आहे) पण पाचवा चाप्तर म्हणजे नुसते विचार खल आहे आणि तो चाप्टर म्हणजे त्याच्या एका अर्थाने नीचपणाचा एका अर्थाने त्याच्या साक्षेपी इतिहासकार(??) असण्याचा कळस आहे. मला वाटते की त्या पुस्तकात नेमके काय अने आणि त्याची रूपरेखा कशी आहे यावर आता एक आर्टिकल लिहावे लागेल कारण त्याशिवाय मी काय बोलतो आहे ते कळणार नाही …. पण ते लिहून चालेल का ते माहित नाही…

 2. Ravi Gawande

  pan ha jemes lean bhartiya etihsacha jyala gandha sudha nahi, ase purvagraha dushit lekhan karato .vastunistta etihas lekhnacha kuthe patta nahi.pan kevathe he mothe patak ..kuni parkiya yeto aani aaplya asmitechi khelto..aapan aani hi vyavasta upatsumbha sarkhi fhakt pahat rahate!!

Nikhil Sheth साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s