बालगंधर्वांचा चंद्रास्त

एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक वाचले होते – सर्वोत्तम पिंगे. उत्कृष्ट विषयांची निवड, आणि शैलीचे वरदान. खूप आवडले होते. त्यातले बरेच बरेच लेख हे अभ्यासाचे आहेत. इरावती कर्वे असोत की चर्चिल की सोमर्सेट मॉम की कुमार गंधर्व. त्यात एक लेख होता – बालगंधर्वांचा चंद्रास्त. अतिशय हृदयस्पर्शी आहे. वाचा म्हणजे काय ते कळेल. जमल्यास तो एकदा स्कॅन करून अपलोडच केला पाहिजे… संगीताच्या प्रत्येक चाहत्याने रादर प्रत्येकानेच वाचला पाहिजे असा तो लेख आहे. त्यातूनच समजलेल्या २ गोष्टी. १ म्हणजे बालगंधर्वांच्या नातीने की मुलीने (आठवत नाही) त्यांच्या चरित्राची लेखमाला लिहिली होती. माणूस मध्ये. आता बालगंधर्व या नावाभोवतीचे वलय म्हणजे काय सांगायला पाहिजे का? त्यात तशी मालिका कधी प्रकाशित झाली होती हेच आता लोकांना माहित नाहीये. तेव्हा माजगावकर हयात होते. पण ते अंक आता मिळणार कुठे? खूप इकडे तिकडे केले तेव्हा ते अंक कुठे मिळतील त्याचा पत्ता लागला, ओळख पण निघाली… आणि अमेरिकेत निघून आलो… ते राहूनच गेले…
आणि दुसरी त्याहूनही भारी गोष्ट आहे. १९३५-३६ च्या सुमारास बालगंधर्व शांतारामांकडे होते.. त्यांनी तिथे बरेच सिनेमे करायचे ठरवले होते पण दुर्दैवाने एकच सिनेमा निघाला. नंतर काहीतरी बिनसले नि ते सोडून परत स्टेजवर गेले. पण तो एकच सिनेमा जो होता तो होता ‘संत एकनाथ’…. श्रीकृष्णार्जुनयुद्ध मध्ये आपण मास्तर दीनानाथांना पहिलेच आहे. तेव्हा हा व्हिडियो कुठे मिळतो का शोधात होतो…बरेच वर्ष सापडत नव्हता. तो आत्ता सापडला. ज्याने अपलोड केला त्याला शतशः धन्यवाद. मागच्याच आठवड्यात अपलोड केला आहे बहुधा.
कुमारांचा ‘मला उमजेले बालगंधर्व’ सगळ्यांनी ऐकला असेलच. प्रत्यक्ष बालगंधर्वांच्याही रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. नाट्य संगीताच्या ही आणि भजनाच्या ही. हो हो..भजनाच्या…. बालगंधर्वांना भजनाचे वेड होते. बऱ्याचदा ते भजनी मंडळी गोळा करून लोकांसमोर भजन गायचे… त्यांना लोकांनी बजावले होते की असे ओरडत जाऊ नका घसा खराब कराल म्हणून…पण त्यांनी ऐकले नाही कधीच… त्यातली काही भजने जी आहेत त्यांना चाली लावल्यात त्यांच्याच गुरुबंधूंनी.. मास्तर कृष्णारावांनी…अतिशय श्रवणीय.
असो. खाली त्या सिनेमातील गाण्याच्या लिन्क्स देतो. आवडतात का ते बघा.

6 thoughts on “बालगंधर्वांचा चंद्रास्त

 1. savadhan

  अप्रतिम,सुंदर! दोन्ही ही भजने फारच सुंदर आणि श्रवणीय आहेत.दोन दोन वेळा ऐकून्ही समाधान होत नाही.परत परत ऐकाविशी वाटतात ही भजने.आपल्याला शतशः धन्यवाद !! माझ्याकडे जुन्या ७८ स्पीडच्या काही रेकॉर्ड्स आहेत. पण हल्ली माझा रेकॉर्ड प्लेयर चालत नाही.आणि दुरुस्त करुन पण मिळत नाही.
  savdhan.wordpress.com

  • Nikhil Sheth

   गाडी जुनी आहे पण खूप चांगले काम करते….पण स्पेअर पार्टसच मिळत नाहीत बाजारात…त्यामुळे फोर्स्फुली आपण ती वापरणे काही काळानंतर थांबवतो….तसेच तुमच्या रेकोर्ड प्लेयर चे…:) आणि बालगंधर्वांचे म्हणाल तर, एक काळच त्यांच्या नावाने ओळखला जातो. यापरते काय सांगायचे?

 2. Naniwadekar

  नंतर काहीतरी बिनसले नि ते सोडून परत स्टेजवर गेले. पण तो एकच सिनेमा जो होता तो होता ‘संत एकनाथ’…
  —-

  नारायणराव बालगंधर्वांना सिनेमाचं तंत्र आवडलं नाही, आणि त्यांनी प्रभातला करारातून मुक्त करण्याची विनन्ती केली. संवादाचे उतारे पाठ करणे हा प्रकारही त्यांना मानवला नाही. तरीही नन्तर त्यांनी स्त्रीभूमिका असलेला किमान एक सिनेमा केला, पण तो प्रभात-बरोबर नाही.
  प्रभातच्या चित्रपटाचे नायक एकनाथ असले तरी नांव होतं – ‘महात्मा’, ‘सन्त एकनाथ’ नाही. त्यावर सरकारनी आक्षेप घेतला, म्हणून ते ‘धर्मात्मा’ केलं गेलं.

  नारायणराव बाहेर पडल्यामुळे प्रभातला तुकारामाच्या भूमिकेसाठी पागनीसांना विचारावं लागलं. नारायणराव हा उधळा, बेहिशेबी माणूस होता. आततायी म्हणायलाही हरकत नाही. अशी चर्चा टीकाकाराच्या दूषित मनोवृत्तीची निदर्शक आहे, असं महाराष्ट्राचे लाडके चमचागीर पु ल देशपांडे म्हणत. त्यात तथ्य नाही असं नाही. पण नारायणराव स्वत:च्या उधळेपणामुळे आयुष्यभर कर्ज़ात राहिले, आणि त्यांनी जाहीर भजनं म्हणायच्या नशेत स्वत:चा आवाज़ही बिघडू दिला. बालगंधर्वांचा बहराचा काळ १९०५ ते १९२५, आणि नन्तर त्यांच्या वयाला स्त्री-भूमिका मानवेनात. पण १९१९ साली जन्मलेले पु ल गंधर्वांच्या १९३०-३५ कडल्या सुमार नाटकांचीही फाजील स्तुती करतात, असा ग वा बेहेरे यांचा आरोप होता. पुढे नारायणरावांचा अतिरेक इतका झाला की पु लं नी ही ‘बिच्चारे सौभद्र’ लेख लिहून त्यांची स्त्रीभूमिकांचा अट्टाहास केल्याबद्‌दल टर उडवली. ‘धर्मात्मा’ सिनेमातली नारायणरावांची गाणी मात्र अप्रतिम आहेत. त्या सिनेमात वसन्त देसाई, बालकलाकार वासन्ती (श्रुती सडोलीकरची मावशी), आणि एकनाथपत्नी गिरिजेच्या भूमिकेत रत्नप्रभा यांचीही सुरेख गाणी आहेत.

  • Nikhil Sheth

   भारी… यातले काही काही डीटेल्स माझ्यासाठी नवे होते, नाव धर्मात्मा होते ते नंतर लक्षात आले होते पण अपडेट नाही केले. उत्तरकाळात झालेली किंवा करवून घेतलेली वाताहात.. स्त्री-भूमिकांचा अट्टाहास, उधळपट्टी, पब्लिक मध्ये भजने गायची आवड, त्यांच्या आयुष्यातले गौहर जानचे आगमन आणि नंतरचा सगळा तमाशा, पुरस्काराच्या रकमेसाठी गावोगाव फिरून स्वतःचे करून घेतेलेले हसे…बऱ्याच गोष्टी आहेत. त्या आता लोकांना फारशा माहित नाहीत हे पण खरे. पण या लेखाचा विषय त्यांच्या चित्रपटातल्या कामावर होतं म्हणून उल्लेख टाळला होता. पण त्यांनी नंतर केलेला दुसरा सिनेमा ऐकला पण नव्हता… त्याचे नाव आणि इतर माहिती कुठे मिळेल काय?
   …. तरी पण महाराष्ट्राचे लाडके ‘चमचागीर’ खटकले.

 3. Naniwadekar

  रवीन्द्र पिंगे म्हणतात की वसन्त शान्ताराम देसाअ‍ी यांच्या ‘अमृतसिद्‌धी’ नाटकाचीच रीळ बनवून चित्रपट म्हणून वापरली, आणि तो चित्रपट कोसळल्यावर ‘मीराबाई’ चित्रपट काढला. तोही पडला. पण प्रत्यक्षात एकच चित्रपट निघाला होता.

  अरुणाबाअ‍ी दामले (प्रभातच्या दामले मामांच्या सूनबाई) म्हणतात की ‘अमृतसिद्‌धी’ नाटकावर आधारित ‘साध्वी मीराबाई’ नावाचा सिनेमा केला होता. हा उपलब्ध असावा. यात म्हणे साथीला बसलेले तबला-पेटी-ऑर्गनचे कलाकार पडद्‌यावर दिसतात. नारायणरावांनी यात मीरेची भूमिका केली होती.

  दीनानाथांनी १९३४ साली कृष्णार्जुन युद्‌ध या हिन्दी आणि मराठी दोन्ही भाषेत बनवलेल्या चित्रपटात अर्जुनाचं काम, १९३५ साली ‘सत्याचे प्रयोग’ या मराठी चित्रपटाला संगीत, तर १९३६ साली ‘अन्धेरी दुनिया’ या चित्रपटात काम असा प्रवास केला होता. माझी अ‍ेक अन्धुक आठवण म्हणजे आफ़्रिकेत नाटकप्रयोगांचा विचार करून चिन्तामणराव कोल्हटकर अ‍ेकटेच आफ़्रिकेत जाऊन आले, पण तो बेत नन्तर बारगळला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s