शून्य….?

अडीच हजार वर्षांपूर्वी सिंधू च्या तीरावर झालेली ती चकमक. अलेक्झांडर आणि एक साधू. दोघांचे आयुष्याकडे बघायचे दृष्टीकोन वेगळे, दोघांच्या आकांक्षा वेगळ्या. दोघांचे विचार-आचार वेगळे आणि दोघांच्या ‘कर्तृत्व’ या शब्दाच्या व्याख्याच वेगळा. अलेक्झांडर आला होता ग्रीसहून…अकिलीस चे ग्रीस. विजयाचा उन्माद, पराक्रमाची ओढ, राज्याची लालसा, कर्तृत्वाची आस. विजयाच्या उन्मादाच्या क्षणी ज्या भावना असतात that is the closest you can go to the God. Its an ambrosia from the heaven.

आणि हा नंगा फकीर… त्याची पार्श्वभूमी होती भारतीय तत्वज्ञाची. सगळे मिथ्या आहे. ‘खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है, बस पैदल ही जाना है…!’ शून्याची संकल्पना शोधणाऱ्या देशातला तो. गीतेमधल्या विश्वरूप दर्शनाची जाणीव असणारा. ‘हे सगळे आधीच मेलेले आहेत. मी त्यांना मारलेले आहे. तू फक्त एक माध्यम आहेस’ हे माहित असलेला.

दोन वेगळ्या विचारांमधला झगडा. कोणा एकाचे बरोबर वा चूक नाही. कारण दोन्हीही मानवनिर्मित आहेत. तो २ विचारांमधला फरक आहे. प्रत्येक वेळी निर्णय घेताना आपल्यासमोर तो प्रश्न असतो. की हे का करायचे? कोणासाठी? तेव्हा ही गोष्ट आठवा. म्हणजे सगळी उत्तरे सापडणे सुकर होते. आपल्याकडच्या पारंपारिक गोष्टी.. मग त्या पुराणातल्या असोत की इसापनीती-पंचतंत्र-जातक कथा असोत वा चार्वाक-बिरबल-तेनालीरामन सारख्या ऐतिहासिक असोत. खूप मोठा खजिना आहे. लहानपणी वाचून सोडून देतो खरं तर पण प्रत्येक टप्प्यावर त्यातली गोष्ट मार्गदर्शक ठरू शकते. परवा युट्युब वर कोणता तरी व्हिडियो पाहत होतो तेव्हा पुन्हा एकदा फिरून ही गोष्ट सापडली आणि ती इतकी प्रचंड अपील झाली की काय सांगू. फकिराच्या आणि अलेक्झांडरच्या स्टान्सवर खरंच खूप काही विचार करण्याजोगे आहे.

माणसाला कर्तृत्वाची आस का असते? रिकग्निशन? पैसा? सत्ता? अमरता? जग मिथ्या आहे ही संकल्पना माणसाला उत्तरायुष्यात फार भेडसावते. आणि मग घेतलेले निर्णय जर परत घेता आले तर काहीतरी वेगळे आयुष्य जगलो असतो असे वाटू शकते. वैफल्याची ती भावना मला वाटते प्रत्येकाला कधीनाकधी भेडसावतेच. ती असमाधानातून असो किंवा अजून कशामुळे. वपू एका ठिकाणी म्हणाले होते, ‘म्हातारा झाला, निवृत्त झाला की माणूस गीतापठण सुरु करतो. उरलेला काल भगवंताच्या स्मृतीत कंठायला. पण तीच तर खरी गीतेची शोकांतिका आहे. गीता आहे कर्मपर. कर्मयोग वाचून आयुष्य घडवायचे की सगळे सांधे हलायला लागल्यवर कर्मयोग वाचायचा? गीता तरुणपणी वाचली तर काही अर्थ आहे. नाहीतर नंतर फक्त कर्म-अकर्म-विकर्म वितंडवाद नुसता.’ (नक्की शब्द आठवत नाही पण आशय असा होता)

‘का?’ हा प्रश्न खरंच अनादिकालापासून सतावणारा आहे. आणि याचे उत्तर आपल्याला खरंच कधीच सापडत नाही. काहीतरी समाधानकारक पळवाट नक्कीच काढतो त्यातून आपण.. पण ती शेवटी पळवाटच असते. त्या ‘का’ या प्रश्नाचे उत्तर शोधायला या सगळ्या पौराणिक-ऐतिहासिक कथा खूप उपयोगी ठरू शकतात, नाही का? त्यात प्रचंड आशय आहे. विफलता म्हणजे काय ते नीट कळायचे असेल तर भीष्माचे आयुष्य बघा. त्याने तरुणपणी केलेले कर्तृत्व आणि उत्तरआयुष्यात आलेली असहाय्य हतबलता. कर्ण तर वर्ल्डफेमस आहेच. अनेक अनेक आहे. सगळे जुने आहे, सगळे परंपरागत आहे, माहित आहे… आताचा काळ वेगळा आणि नवा आहे. नवी संकटे नव्या घटना नव्या अडचणी नव्या संस्कृती नवे लोकं ….. म्हणून ते ज्ञान टाकाऊ नाही. उलट आता त्याकडे नव्याने बघू शकतो. त्याचे अनेकपदरी अर्थ निघतात. दुर्लक्ष अक्षम्य.

‘का’ चे उत्तर बऱ्याचदा, १) पर्याय नाही २) दुसरे काय करता येईल माहित नाही ३) गरज नाही ५) सगळे हेच करतात आणि हेच रूढी-प्राप्त आहे ४) कशाला त्रास; अशा प्रकारचे असते.  तुकाराम जेव्हा म्हणतात ‘ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ तेव्हा शिवाजी महाराजांनी जर ती उक्ती आचरली असती तर? मनाचा इनार्शिया शरीरापेक्षा शतपट जास्त आहे…. शून्य…. वर्तुळ… अलेक्झांडर आणि तो साधू. मला इथे बसल्या बसल्या मनःशांती मिळाली आहे. मग का जगाच्या मागे फिरत बसायचे? प्रत्येक निर्णय घेताना, जीवन के हर मोड पर, आपल्या मनात एक साधू असतो आणि एक अलेक्झांडर. दोघेही त्यांची त्यांची पार्श्वभूमी बघितली तर योग्य असतात. त्यांची चकमक होणे अपरिहार्य आहे. आवश्यक आहे. आणि वर्तुळ… शून्याची संकल्पना बनवणाऱ्याने  त्याला आकार पण कसला जबरदस्त विचार करून दिला आहे. मी आहे तिथेच थांबलो आणि तू सगळी पेरीफेरी भटकून तिथेच आलास…. दोघांचा शेवट तिथेच. त्यामुळे फरक तो काय?


9 thoughts on “शून्य….?

  1. MILIND

    namaskar…..! vartula warun ek gosta aathwali…. 3 mungya vartulaat firat asatat,aani warun shankar parvatiche vimaan jaat asate.. parvati tya mungyana baghun shankaras sangate ki aapan tyanchi pariksha gheu….! mungya jawal jawun parvati pahilila vicharte ki tuzya pudhe kiti mungya ? ti sangate 2..aani mage, parat uttar 2… same q and same ans frm dusri mungee…, 3ri mungee sangate mazya pudhe 2 mungya…,aani mage.? parvati, tar mungee mhane kanich nahi..ase ka…?khup warshapurvi college madhe doke khanya sathi hi goshta sangaiche…aani uattar denara thakla ki mag sangaiche..3ri mungee khote bollee….!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s