वादग्रस्त शिवाजी….!

सध्या अमेरिकेत आहे. मागे एकदा भांडारकर प्रच्याविद्येचे दुर्दैवी प्रकरण झाले होते. जेम्स लेनच्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकातल्या काही उल्लेखांवरून. मग त्यावर राज्य शासनाने बंदी आणली. (की केंद्र?) पेपरात त्यावर बरेच लेख यायचे, नेटवरही आर्टिकल्स उपलब्ध आहेत. पण मुळातून कोणतीही गोष्ट वाचल्याशिवाय मत बनवायचे नाही आणि विश्वास ठेवायचा नाही असा शिरस्ता समर्थांनी पाडून दिला आहे, मूर्खांच्या लक्षणाच्या समासात ते म्हणतात – समूळ ग्रंथ पाहिल्याविण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता पाहे अवगुण, तोची एक पढतमुर्ख. मग लक्षात आले की बंदी भारतामध्ये आहे आणि मी अमेरिकेत. म्हणजे पुस्तक वाचायला मिळू शकते की इथे.

इथली लायब्ररी अतिशय मोठी आहे. १२ इमारती आहेत…!! १२…!!! आणि त्यातही जर पाहिजे ते पुस्तक नाही मिळाले तर ते इतर युनिव्हार्सीटीजच्या लायब्ररीतून मागवून आणून देतात…. अनेक लायब्रऱ्यांची लीग आहे.. ते पुस्तक आहे का ते धुंडाळले, तर नव्हते… म्हणून मागवून घेतले आहे. ते आज पोचले. पण आज आहे रविवार. उद्या जाऊन ते आणतो आणि खरंच काय कसे आहे ते वाचतो. नेत्यांच्या भाषणावर, वृत्तपत्रातील आणि टीव्ही-रेडियो वरच्या बातम्यांवर कमीत कमी विश्वास असल्याने आता खरंच कळेल की काय प्रकार होता ते. फक्त मला एक माहित नाही मी ते वाचल्यावर त्याबद्दल ब्लॉगवर लिहू शकतो का ते. त्यामुळे वाचल्यानंतर त्यावर लिहायचे की नाही ते अजून ठरवले नाहीये. पण ते नंतर पाहता येईल…. आधी वाचून तर बघू…..

5 thoughts on “वादग्रस्त शिवाजी….!

  1. हेमंत आठल्ये

    नक्की वाचा. त्या पुस्तकात शिवाजी महाराज यांचे पितृत्व दादाजी कोंडदेवांकडे असू शकत असा उल्लेख आहे. ज्या जेम्स लेन यांनी हे पुस्तकं लिहिले आहे. त्यांना बहुतेक शिवाजी महाराज कोण होते याची नीट कल्पना नसावी. कारण पुस्तकं खूप चांगल आहे. पण त्यातील या पितृत्वाचा उल्लेख चुकीचा केल्याने त्यावर बंदी आली. म्हणजे लेखकाने त्यात जर तर च्या गोष्टी मांडल्या आहेत. पण अस त्यांनी लिहायला नको होत. बाकी लेखकाने माफी मागितली. आणि प्रकाशकाने याची प्रकाशाने थांबवली आहेत. आपणाला एक माझी विनंती आहे. ‘शिवाजी’ ऐवजी आपण ‘शिवाजी महाराज’ असा उल्लेख केला तर आनंद होईल. महाराजांचा एकेरी उल्लेख मनाला बोचतो हो..

  2. jalandar bankar

    पुस्तक वाचा आणि पुस्तकाचा सारांश ही लिहा.जेम्स लेन यांना कळवा की पित्यासमान असणे आणि पिता असणे ह्यात जमिन आस्मानाचा फ़रक असतो.भारतात गुरुंना आणि वडिधा-यांना आम्हि पित्यासमान मान देतो.

  3. savadhan

    पुस्तक अवश्य वाचा. त्यावर आपण लेख लिहू शकता. फक्त आपल्याला आदरणीय आणि देवतुल्य अशा कोणत्याही व्यक्तीचा मग ती संत, स्वामी, महराज अथवा अगदी आपले माता, पिता असोत. त्यांचा उल्लेख आपण आदरानेच करतो.हे कोणि तरी पाश्चात्यांना शिकवणे आवश्यक आहे.आदर कशाशी खातात याची त्यांना माहिती करून देणे गरजेचे आहे. म्हणजे पितृतुल्य ,मातृतुल्य याचा बोध त्यांना होईल.अहो आम्ही आमच्या थोर्ल्या बंधूना आणि वहिनीना सुद्धा आई-वडिलां इतका मान देतो.हे त्यांना कसं समजणार? पत्नी शिवाय परस्त्री मातेसमान माननारे आम्ही हे कसं कल्णार?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s