बलिदान

आज २३ मार्च. भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा दिवस. त्यांच्या स्मृतीला प्रणाम. एकदम २७ सप्टेंबर २००७ मध्ये गेलो. भगतसिंग जन्मशताब्दी. आणि आम्ही जस्ट त्याच्या १-२ महिने आधी हिस्टरी क्लब सुरु केला होता. त्याला कॉलेज, अल्युम्नी कोणाचेही फंडिंग नव्हते. बाहेर जास्त ओळखी नव्हत्या. भारत इतिहास मध्ये कुठे जायला सुरुवात झाली होती. बेल्ल्या मोडी शिकून आला होता आणि आम्ही उर्दू-फारसी चे कित्ते गिरवत होतो. क्लब ला मोठे तर करायचे होते. आणि जन्मशताब्दी चांगलं ऑकेजन वाटले. काही ज्युनिअर्सनी क्रांतीकारांचे फोटो गोळा केले होते. त्यात फेमस लोक तर होतेच पण बरेच दुर्मिळ हुतात्मेही होते. १५० च्या वर क्रांतीकारांचे फोटो आणि माहिती होती. ती संधी उचलली आणि त्याचे एक्झिबिशन भरवले. प्रचंड हिट झाले. पहिल्या २ महिन्यातच मोठा शॉट दिला. भारी वाटले. तेव्हाची खरी निकड ही रिकग्निशन आणि फंडिंग ही होती. ती पूर्ण करण्याकरता असले स्टंट करणे आवश्यक होते. आणि त्याचा फायदा ही बराच झाला. सकाळने दाखल घेतली होती. एरवी ‘पुण्यातल्या सामान्य माणसाची किमान बौद्धिक पातळी अजून नीचतम कशी करता येईल हे सकाळचे काम आहे’ असे म्हणणारे आम्ही पण तेव्हा ‘सकाळ किती भारी’ असे म्हणू लागलो…! असो; हिस्टरी क्लब आणि त्याचे पराक्रम हे खरं तर एका संपूर्ण ब्लॉग चा विषय होण्याइतपत व्याप्ती असलेलल्या गोष्टी. ते यथावकाश हळू हळू येथे प्रगटतीलच… पण ही पोस्ट नोस्टाल्जिक अधिक आणि क्लब बद्दल कमी आहे. तुम्ही हे फोटो बघा –

Advertisements

6 thoughts on “बलिदान

 1. रोहन

  शहीद भगतसिंग.. सुखदेव आणि राजगुरु यांना शतश: प्रणाम…
  शहीदों की चितायों पे … लगेंगे हर बरस मेले … !
  वतन पर मिटने वालों का … बाकी यही निशां होगा … !

  • Nikhil Sheth

   रोहन, शहिदांचे योगदान मान्य करूनही त्यांच्या मर्यादा पण ध्यानात घेतल्या पाहिजेत. त्यांचे काम बलिदान प्रेरणादायक खरे, डिव्होशन चा अप्रतिम नमुना पण अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण आता मान्य करू शकत नाही. मात्र त्याकरता त्या गोष्टींकडे कानाडोळा करून चालणार नाही. इतिहासाचा अभ्यासक सर्वांगी असतो.

 2. Nikhil Bellarykar

  इतिहासस्य श्रोत्रूणाम सर्वेषां गौप्यभेदिनाम ||
  मुद्रैषा अभियंत्रूनाम सत्यधर्माय वर्तते ||

  हे हिस्टरी क्लब चे ब्रीद आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s