अमेरिकन शिक्षक…?

अमेरिकेत शिकायला यायच्या आधी इथल्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल बरेच ऐकले, वाचले, सर्फले, गुगले होते. की इथले वर्ग कसे असता, व्हिडियो लेक्चर्स, वेबसाईट वरून गृहपाठ, वर्गात खाणारी-पिणारी (कॉफी) मुले, वर्गात laptop वर नोट्स काढणारी किंवा गेम्स खेळणारी मुले वगैरे वगैरे….आश्चर्य च वाटायचे की वर्गात मास्तर जीव तोडून शिकवत असता कोणी कॉफी कसे पिऊ शकते…ते पण ठीके एकवेळ पण एक कानाने त्याचे बोलणे ऐकताना laptop वर दुसरेच काम करणे म्हणजे त्याचा अपमानच नाही का? असले ‘काय सांगू वाटे, काहीचिया बाही’ रेग्युलर आणि नैसर्गिक वाटायला लागले….तोच हा व्हिडियो पहिला. ओक्लाहोमा युनी.चा. चला, एक तरी असा प्रोफ आहे ज्याला वाटते की मुलांनी त्याच्या लेक्चर ला असली उपकरणे वापरू नयेत, वापरू नयेत काय, वर्गात आणू ही नाहीयेत….अन नुसते त्याला वाटत नाही तर तो प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड स्ट्रीक्ट दिसतो आहे त्याबाबतीत…मुलांनी घाबरावे, आपले ऐकावे म्हणून अपाल्याकडे कान पिरगळणे, कोंबडा करायला लावणे, छडी मारणे, वर्गाबाहेर किंवा बाकावर उभे करणे अशा शिक्षा आहेत. पण हा प्रोफ काय करतोय? खरंच ‘काहीच्या बाही’च आहे. त्याचा मुद्दा मुलांना नीट कळावा आणि एकदम नीट कळावा म्हणून याने काय केले? याच्या वर्गात मुलांनी laptops अनु नयेत अशी याची इच्छा आहे. म्हणून याने पहिल्या लेक्चर ला एक laptop घेतला, लिक्विड नायट्रोजन घेतले, laptop त्यामध्ये बुडवला, आणि मग म्हणाला, “This is just liquid nitrogen, so it alone won’t hurt the computer. But this will.” आता हे ‘this’ म्हणजे काय ते या व्हिडियो मध्येच पाहा. हे पाहून पोरांच्या कपाळात गेल्या नसतील तरच आश्चर्य आहे. कोण हिम्मत करेल वर्गात परत laptop आणायची किंवा मोबाईलशी खेळायची?

9 thoughts on “अमेरिकन शिक्षक…?

    • Nikhil Sheth

      अरे खरं, इथे laptop वर काम वर्ग चालू असताना करणे म्हणजे सामान्य आहे आणि वर्गात कॉफी पिणे अतिसामान्य आहे. इतके की काही काही प्रोफ तर स्वतः कॉफी पीत पीत शिकवतात….त्यात हा असा नग निघणे म्हणजे….तू कल्पना करू शकतोस..

    • Nikhil Sheth

      हे सगळे पूर्व-नियोजित आहे हे खरे…पण माहितेय का, इथे प्रोफ्स ना वर्गात ड्रामा क्रीएट करायला खूप आवडते. आणि जर वर्ग डेमो द्यायचे असतील आर विचारायलाच नको. काय काय नाटकं करतील खरंच ‘प्रेक्षणीय ददर्श’ असतात..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s