धन्य ती यावनी कथा (2)

भारतात  जे स्थान रामायण आणि महाभारताला आहे, तेच स्थान युरोपमध्ये ट्रॉयच्या युद्धाला आहे. हे साम्य इतके आहे, की मेगास्थेनीस हा अलेक्झांडरचा भारतातील राजदूत हा बिनदिक्कत म्हणून जातो, की भारतातील लोकांना इलीयड माहित आहे. महाभारताचा उल्लेख तो १,००,००० कडव्यांचे इलीयड असा करतो. आणि अतिशयोक्तीचा दोष नजरेआड केला तरी पात्रांच्या बाबतीत साम्य नक्कीच आहे.

पहिले साम्य म्हणजे धृतराष्ट्र आणि प्रीआम  या दोघानाही खूप मुले होती – धृतराष्ट्राला १०१ तर प्रिआमला ८७. दोघेही आपल्या पुत्राचे मरण स्वत: पाहतात, आणि अनुक्रमे आपल्या ज्येष्ठ आणि कनिष्ठ पुत्रापुढे हतबल होतात. महाभारत आणि ट्रॉय युद्ध या दोन्हीही कथा एका स्त्रीमुळे घडल्या आहेत. अकिलीस्च्या सर्वात जवळ जाणारे पात्र म्हणजे अर्जुन आहे. दोघेही शौर्य आणि चपलता यांच्या योगे युद्धात अजोड आहेत, परन्तु तितकेच साधे आहेत.

महाभाराताचा हीरो कृष्ण  तर इलियडचा हीरो अकिलीस आहे. पण कृष्णाला सर्वात जवळ जाणारे पात्र म्हणजे ओदिसिआस आहे. तो हातात शस्त्र तर धरतोच, शिवाय युक्तीच्या गोष्टी सांगुन ग्रीक सेनेला विजय मिळवून देतो. तो ग्रीकान्साठी तारणकर्ता आहे, एकाचवेळी तो शूर योद्धा, धूर्त राजकारणी आणि  हिकमती मुत्सद्दी आहे. जेव्हा Paris ने हेलनला स्पार्टाहून पळवले, तेव्हा संपूर्ण ग्रीसच्या राजांना युद्धासाठी एकत्र आणण्यात त्याची भूमिका खूप मोलाची होती. जेव्हा अकीलीसचा मोहिमेसाठी शोध सुरु झाला, तेव्हा ओदिसिआसनेच स्त्रीवेशातील अकीलीसला बाहेर काढण्यासाठी युक्ती काढली. अकीलीसच्या राजवाड्याबाहेर त्याने रणशिंग फुंकले, तेव्हा अकीलीसच्या बरोबर असलेल्या सख्या घाबरून पाळल्या, पण अकिलीस मात्र तलवार घेऊन सावध झाला आणि त्याचे पितळ उघडे पडले. तसेच युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात लाकडी घोड्यात सैनिक लपवण्याची विलक्षण कल्पनादेखील त्याचीच होती. (ट्रोजन हॉर्स म्हणतात तो हाच)

पण इलीआडचा अजून एक विशेष म्हणजे त्यातील देवदेवता. भारतीय देवदेवतान्प्रमाणे त्या वरदान देवून गप्प न बसता आपल्या आवडत्या वीरांना मदत करण्यासाठी खुशाल स्वत: युद्धात उतरतात आणि एकमेकानादेखील इजा करतात. कितीतरी घटनांचे स्पष्टीकरण होमर देवदेवतांच्या रागलोभाचा संदर्भ देऊनच करतो. इलीयडची सुरुवातच मुली एका देवाच्या रोषामुळे घडलेल्या घटनेने झाली आहे. यामुळे हे देव इंद्र  इत्यादी देवांच्या जास्त जवळचे वाटतात. आणि जरा काही झाले, की राजे आपल्या पुराणात जसे तप करतात, तसे इथे बळी देतात. फक्त ऋषी तेवढे इलीयड मध्ये आढळत नाहीत. बाकी अप्सरा, गंधर्व इत्यादी बरेच आहेत. विशेषत: हीरोज – म्हणजे यांच्या आईवडीलापैकी एकजण साधा माणूस आणि दुसरा यक्ष, अप्सरा अथवा देव असू शकतो.

काही जण ट्रोजन युद्ध आणि रामायणातलेही समान धागे काढतात. जसे रामायणात सीतेचे हरण केले होते तर इलियड मध्ये हेलन चे. रामायणामध्ये राम सैन्य घेऊन लंकेवर चाल करून जातो. तसेच इथेही.

सम्युएल बटलरची निवेदनशैली ओघवती आणि महाकाव्याला साजेशी आहे. अस्सल व्हिक्टोरियन इंग्लिशमधील पल्लेदार वाक्ये वाचता वाचता होमरच्या शैलीचा देखील काहीसा अन्द्दाज येऊ लागतो. इलीयड, ओडिसी आणि एकूणच ग्रीक क्लासिकल शैलीचे उत्तम रसग्रहण http://www.ikanlundu.com/classicground/index.html या लिंकवर मिळेल. जिज्ञासूनी विकिपीडिया पाहावा, त्यात बऱ्याच लिंक्स आहेत. मी जो अतिशय धावता आढावा इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातून जर कुणाची उत्सुकता चाळवली गेली तर मला समाधान आहे.

.                                                                                                                                  – निखिल बेल्लारीकर

(सप्टेंबर २००७ मध्ये सिओइपि हिस्टरी क्लब चे पहिले सेशन झाले. तेव्हाचा विषय ट्रोजन युद्धच होता.)

Advertisements

2 thoughts on “धन्य ती यावनी कथा (2)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s