धन्य ती यावनी कथा

होमरचे इलिअड आणि ओडिसी वाचावे असा कैक वर्षापासून बेत होता…ट्रॉय सिनेमा पाहिल्यानंतर तर माझी उत्सुकता जास्तच चाळवली गेली….. त्यातली ती लढाई ची दृश्ये, मुख्यतः अकिलीस चा माज मनात घर करून राहिला…..’ग्रीक महाभारत’ असा लौकिक असलेली ही नेमकी कथा आहे तरी कशी, हे पहावे म्हणून इन्टरनेट वर सर्च मारला, आणि http://classics.mit.edu/Homer/iliad.html या लिंक वर त्याचे इंग्लिश भाषांतर हाती लागले…

होमर हा ग्रीक काव्याचा जनक मानला जातो. साधारणपणे इसवी सनापुर्वी ८ व्या शतकात त्याने इलियड रचले, अशी परंपरा आहे.  इलियड चे कथानक हे ट्रॉय च्या युद्धाच्या १० व्या वर्षात ज्य़ा घटना घडल्या, त्यावर आधारित आहे. जसजसे मी इलियड चे एकेक सर्ग वाचू लागलो, तसतसे त्यातील अनाकलनीय  नावांचे ते योद्धे, मन मानेल त्याला वरदान देणारे, आणि आपल्या भक्ताला दुसऱ्याच्या भक्ताने का मारला म्हणून आपआपसात शिवीगाळ करणारे ते मनस्वी देवी-देव. हे मनात खोलवर भिनू  लागले, आणि अकिलीस हे नाव उच्चारल्याबरोबर ‘स्विफ्ट फूटेड सन ऑफ़ पेलिअस’, ‘किंग ऑफ़ मोर्मिडोंस’ अशी बिरुदावली आपोआप मागे येऊ लागली.

इलियड मध्ये शेकडो पत्रे आहेत, राजे, रंक, देव-देवी, सर्वांची रेलचेल आहे. पण याचा नायक आहे अकिलीस…साऱ्या ग्रीसचा राजा अगमेम्नौन विरुद्ध बोलायचे आणि ते आचारायचे धाडस करणारा एकांडा शिलेदार…त्याच्या नावाचा अर्थच “शत्रूचे दुक्ख ” असा आहे ….पण होमर सुद्धा अकिलीसची स्तुति सरळ न करता त्याच्या अभावामुळे ग्रीक सैन्याचे कसे हाल झाले, त्याचे वर्णन करतो. त्याची पार्श्वभूमी दुखाची आहे.

इलियड सुरु होते ट्रॉयच्या युद्धाच्या एका निर्णायक टप्प्यावर. ग्रीस पासून निघून आता १० वर्षे उलटली आहेत, आणि ग्रीक सैनिक दिवसेंदिवस घरी जाण्यासाठी अधीर झालेत.  त्यातच प्लेगची साथ देखील आली असून अस्मानी-सुलतानीने ग्रीकांची पुरती वाताहत झालीय. ग्रीक छावणीवर दुखाची गडद छाया पसरली आहे. ट्रॉय तर शरण येण्याचे नाव घेत नाही, आणि हेलेनला परत आणण्याचे मेनेलोस चे स्वप्न अपुरे राहते कि काय, असे वाटत असतानाच ब्रीसीस नामक एका साध्या पुरोहित कन्येमुळे घटनाक्रम जणू ढवळून निघतो…प्लेगची साथ निवारण करण्यासाठी अपोलो देवाला अगमेम्नोनने आपल्याकडची एक दासी अर्पण करावी, अशी एका पुरोहिताने विनंती केली, ज्याला आपल्या मुलीची सुटका करण्याचा हा एकमेव मार्ग होता. अगमेम्नोनने संमती तर दिली, पण त्याबदली आपल्याला अजून कोणीतरी दासी हवी,अशी मागणी केली.

आणि अकिलीस अगमेम्नोनवर घसरला….राजसभेत विषयासक्तिबद्दल अगमेम्नोनची त्याने यथेच्छ निंदा केली, ज्यामुळे अगमेम्नोनला राग आला आणि त्याने अकिलीसकडची दासी हिरावून घेतली… यामुळे अकिलीसचा स्वाभिमान दुखावला जातो आणि तो प्रतिज्ञा करतो की आता शस्त्र म्हणून धरणे नाही. अकिलीस नाही; बिचाऱ्या ग्रीक सैनिकांचे हाल आता कुत्रे खात नव्हते. अकिलीस सारखा भक्कम आधार आता त्यांना रणांगणात दिसणार नव्हता , आणि हेक्टरने रोज त्यांचे शिरकाण आरंभले होते….
पण अचानक एक महान योगायोग घडला…अकिलीसचा सर्वात जवळचा मित्र पट्रोक्लास ला अकिलीस समजून हेक्टरने मारले….

आणि इथे अकिलीस पेटला…..त्याने ट्रोजन फौजांचा संहार सुरु केला. जसा महाभारतात अर्जुन तसाच तो “अन्झेपेबल” होता…..त्याचे लक्ष फ़क्त आणि  फ़क्त हेक्टरकड़े होते…….त्याचा आवेश पाहून हेक्टर त्यापासून पळू लागला. तीन वेळेस त्याने अकिलीसला हुकवले, पण शेवटी अकिलीसने त्याला आपल्या भाल्याने क्षणात यमसदनी पाठवले…..मग ट्रॉयचा राजा प्रीआमने अकिलीसची विनवणी करून हेक्टरचे शव परत ट्रॉय मध्ये आणून त्याला अग्नी दिला……. इलीआड ट्रॉय युद्धाबद्दल एवढेच सांगते.बरेच धागेदोरे हाती लागत नाहीत.

पुढे बऱ्याच घडामोडी होऊन अखेर ओडीसिअसच्या युक्तीने ग्रीक सैनिक लाकडी घोड्यात बसून ट्रॉय मध्ये शिरतात आणि ट्रॉयचा सर्वनाश होतो…..(क्रमश:)

– निखिल बेल्लारीकर
(परिचय – प्रस्तुत लेख निखिल बेल्लारीकर ने लिहिला आहे. हा माणूस इतिहास (मुख्यतः मध्ययुगीन भारत), आणि गणित तज्ज्ञ आहे. आणि उत्कृष्ट वक्ता देखील. परमेश्वराची स्मरणशक्तीची देणगी यांना मुक्तहस्ताने लाभली आहे. मेघदूतही घडा घडा म्हणू शकतो. या व्यतिरिक्त हा माणूस मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, बंगाली, उर्दू, संस्कृत आणि ग्रीक भाषा जाणतो. पुरातन संकृत, इंग्रजी आणि मराठी काव्य हा याचा खास अभ्यासाचा विषय आहे. कॉलेज मध्ये असताना आम्ही सुरु केलेल्या ‘हिस्टरी क्लब’चा हा २ वर्षे प्रेसिडेंट होता. इन्जिनिअरिन्ग संपवून आता गणितामध्ये पुढील शिक्षण घेत आहेत)

Advertisements

2 thoughts on “धन्य ती यावनी कथा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s