बालगंधर्व मध्ये तेंडूलकरांच्या चित्रांचे प्रदर्शन लागले होते… आणि स्वतः तेंडूलकर तिथे असणार १ दिवस. दहावीची परीक्षा संपली होती आणि कॉलेज सुरु व्हायचे होते. रिकामा होतो. गेलो…खूप खूप चित्रे होती…काही काही कॉमेडी होती. राजकारणावर, समाजावर भाष्य-बिष्य करणारी होती. काही काही बोर झाली. काही काही कळलीच नाहीत. पण ज्यासाठी गेलो होतो – तेंडुलकरांशी २ मिनिटे का होईना बोलायचे…आता १०वी मधला मुलगा त्यांना असे कसे सांगणार, ‘तुमच्या चित्रांचा मी चाहता आहे, मला अमुक अमुक फार आवडले, यात तुमचा विनोद खूपच सटल आहे…ब्लाब्ला…’ ते नाहीतरी मी स्वतःच हसलो असतो. मग बोलायला काहीतरी विषय तर पाहिजे…चित्रांच्या शेवटी ते एका बाकावर बसले होते आणि कोणाशी तरी गप्पा मारत होते…तिथेच ५ मिनिटे घुटमळत होतो….काय बोलू आणि कसे बोलू….एकतर सायकल चालवत एवढ्या लांब आलो होतो तेव्हा बोलल्याशिवाय परत जायचे नाही…आणि आता समोर ते बसलेत तर बोलायला काही सुचत नाही….परत एक राउंड मारली आणि सगळी चित्रे बघितली…त्यात एक काहीतरी गांधींवरती चित्र होते…शेवटी शेवटी होते ते…..ते नेमके काय होते ते आठवत नाही पण विचित्र होते हे नक्की…चला, विषय मिळाला…या चित्राविषयी बोलूयात. जो ‘तुमची चित्र आवडतात’ म्हणायला घाबरत होता तो त्याच्या एका अतिशय कॉम्प्लेक्स चित्राविषयी बोलायला निघाला…बाजूला जाऊन थांबलो. त्यांचे लक्षच नव्हते. ४-५ मिनिटे गेली तरी त्यांनी बघितलेच नाही…मी त्याचेह निरीक्षण करत होतो…अंगात हिरवा कुर्ता, त्यावर एक जाकेट, पांढरी दाढी आणि चष्मा + स्मितहास्य… शेवटी हिम्मत केलीच, ‘सर तुम्हाला एक विचारायचे होते’ त्यांनी बघितले की हा कोण उपटला मधेच…उत्तर पण नाही दिले. बहुधा त्यांच्याच विचारात असावेत. (पुलं स्टाईल प्रतीभासाधनेत व्यत्यय वगैरे) परत विचारले, ‘सर, एक प्रश्न होता’ ‘हा, काय रे?’ ‘सर आत्ता तुमची चित्र सगळी बघून झाली. पण एक कळलेच नाही, ते शेवटचे चित्र आहे ना, डावीकडचे,, दुसरे, गांधींवरचे, ते काही कळले नाही बघा, जरा एक्स्प्लेन करता का?’ धन्य मी…चायला…आधीच तो मोठा चित्रकार, त्यात त्यांचे प्रदर्शन, त्यात मी १०वी तला मुलगा, आणि वर चित्र समजले नाही तोंडावर सांगतो आणि परत ते एक्स्प्लेन करायाचे फर्मान देतो…!!! त्यांनी बघितले की हा असा काय आहे? काय विचारतो आहे ते त्यांना कळायला आधी १ मिनिट गेला…मग ते हसले आणि म्हणाले, ‘बाळा, तुला नाही कळायचे..जरा मोठा होशील तेव्हा मी काही ना सांगताच तुला कळेल’ मी जरा नाराजीच्या सुरातच म्हणालो, ‘पण मग सही तरी देता का मला?’ ते परत हसले, डायरी घेतली आणि सही करून दिली…
Sir,
Tumhi ethe sapdal ase watle navte.
Anand watla.
mazahi blog ahe. Paha na?
http://www.subhashinamdar.blogspot.com
ok
subhash inamdar
2003 la dahavi mhanaje tujha engg attach samplay?
22 warshancha aahes tu
हो…बरोबर आहे.