हॉरर अंगाईगीत – रोजमेरी’ज बेबी

आत्ताच रोमान पोलान्स्की चा रोजमेरी’स बेबी नावाचा सिनेमा पहिला….. काही काही दिग्दर्शक आहे हॉलीवूड मध्ये ज्यांचे सिनेमे पहायची एकही संधी मी सोडत नाही. स्पीलबर्ग, स्कॉर्सिसी, क्युब्रिक, कॅमेरोन, ल्युकास, हिचकॉक…लिस्ट खूप मोठी आहे. हा सिनेमा पोलान्स्की च्या ‘अपार्टमेंट ट्रीलिजी’ मधला तिसरा आहे.

डेंजर होता सिनेमा. भारी होता. स्टोरी नाही सांगत. पण टायटल सॉंग मात्र जबरदस्त आहे… ऐकूनच कॅची वाटला..आणि मग सिनेमा मध्ये गुंतत गेलो..

काही काही कलाकारांची खासियत असते. जेफरी आर्चर हा बायोग्राफिकल नायक रंगवणार, आर्थर हेली एकेक फिल्ड घेऊन त्यात कादंबरी लिहिणार, गुरु दत्त बऱ्याचदा दुःखद शेवट करणार, राजकपूरच्या सिनेमातली गाणी गुणगुणण्यायोग्य असणार, हिचकॉक नवे नवे angles ट्राय करणार, मधुर भांडारकर बॉलीवूडमधल्या हेली आर्थर हेली चि भूमिका बजावणार, रहमान ओर्क्रेसट्रा चा जबरदस्त वापर करणार, ओ’हेन्री च्या कथा ओ’हेन्री स्टाइलमध्येच असणार, डॉना रीड हॉलीवूड मध्ये आईची भूमिका बजावणार, स्कोर्सिसिच्या सिनेमांमध्ये खुन्खराबे असणार, इस्टवूड ने सिनेमा काढला की त्याला ऑस्करनामांकन मिळणार, प्रत्येक सवाई मध्ये मालिनीताई टप्पा गाणार, हरिप्रसाद चौरासिया प्रत्येक वेळी येणार, श्रोते पहाडीची फर्माईश करणार, वसंतराव गाण्यात एकतरी सरगम घेणार, सत्यजित राय प्रत्येक सिनेमामध्ये वेगवेगळ्या तर्हेने भारत दाखवणार, शेजवलकर प्रत्येक लेखात इतिहासाबरोबरच सद्य सामाजिक स्थितीवर एकतरी ओरखडा ओढणार, निनाद बेडेकर भाषण कोणत्याही विषयावर असेल तरी शेवटी शिवाजी महाराज, कविराज भूषण इकडेच ओढणार, एस डी बर्मन गाण्याला खास फोक टच देणार आणि सलमान खान प्रत्येक सिनेमात कपडे काढणार…..प्रेक्षकांचे काही पूर्वग्रह असतात आणि त्यानुसार अपेक्षा पण असतात…

तसे पोलान्स्की बद्दल च्या अपेक्षा हा चित्रपट १००% पूर्ण करतो. टेनंट पाहा, रिपल्शन पाहा, चायना टाऊन पाहा की हा रोजमेरी’स बेबी पाहा…१००% पोलान्स्की. हिचकॉक आणि पोलान्स्की यांचेह जेनर फार सेम तरी समांतर आहे…दोघांचे सिनेमे मानस-शास्त्रावर खूप अवलंबून असतात…पण त्याचा उपयोग दोघे वेगवेगळ्या कारणांसाठी करतात….हिचकॉक चा सिनेमा कायम उत्कंठावर्धक असतो, शेवटी काहीतरी जबरदस्त नाटकीय घडते…आणि पोलान्स्की?? एकदम सेम. मात्र फियोदोर दोस्तायव्हस्की चे ‘crime and punishment’ वाचताना जे फिलिंग येते ना…की नायकाच्या मनातल्या ज्या भावना त्या पुस्तकात रंगवल्या आहेत…तशाच भावना आपल्या मनात येतात पोलान्स्की चे सिनेमे बघताना….असो…

सिनेमा कुठे मिळाला तर जरूर बघा. सुंदर आहे. (सुंदर कसे म्हणू? हॉरर सिनेमा आहे तो) पण हे गाणे ऐका… पाट्या पडताना लागते….एक उच्च कलाकृती आहे हे गाणे….आहे खरं तर एक अंगाई(सं)गीतच… पण त्यात पण हॉरर कसं जागोजागी पेरले आहे ते ऐका…..

Advertisements

5 thoughts on “हॉरर अंगाईगीत – रोजमेरी’ज बेबी

  1. सौरभ

    अरे फारच भयंकर आहे हा चित्रपट. विकीवरच्या या यादीत http://en.wikipedia.org/wiki/AFI%27s_100_Years%E2%80%A6100_Thrills नवव्या क्रमांकावर आहे. प्रत्येक यादीतले जवळजवळ पहिले पंचवीस बघितले आहेत. तू स्टॅनले कुब्रिकचा द शायनिंग बघितला आहेस का? भयंकर भयंकर भयंकर. बघून बघ. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s