एक जुनी सवय आहे. मोठ्या लोकांना जाऊन भेटायची…काहीही कारण काढून, कुठे असतील तिथे जाऊन, कसेही म्यानेज करून…पण भेटायचे… कधी कधी चर्चा करायला (पुणेरी असल्याचा जाज्वल्य अभिमान असल्याने ही सवय असणे म्हणजे आश्चर्य नाही) तर कधी नुसते बघायला…पण खूप लोकांना भेटलो, कधी बाहेर कार्यक्रमात तर कधी डायरेक्ट घरी जाऊन…मजा आली. प्रत्येक भेट म्हणजे एक नवा अनुभव असतो. खूप गोष्टी कळल्या….आता त्यातले काही लोक हयात नाहीयेत. काही लोक अनरिचेबल आहेत. भेटलेल्या बहुतेक लोकांच्या सह्या पण घेतल्या आहेत. पण सगळ्यांच्याच नाही जमल्या…काही काही इतक्या ब्रीफ भेटी होत्या की सही मिळाली, २ मिनिटे बोललो आणि टाटा…काही काही इतक्या जपल्या गेल्या की त्यानंतर त्यांच्या घरी जाणे येणे सुरु झाले…आणि त्यांचाही मोठेपणा की त्यांनी कायम मोठ्या मनाने प्रत्येक वेळी वेळ दिला…यामध्ये लक्ष्मी सहगल पासून ते दिलीप प्रभावळकर आणि अप्पा जळगावकर ते ग्रेगरी डेव्हिड रोबर्ट्स (शांताराम) सगळे लोक आहेत….एकूण किमान ५० तरी लोक होतील…(चला ५० दिवसांच्या पोस्ट्स चा प्रश्न निकालात निघाला एका झटक्यात…:))
थोडक्यात असे की – नवी कॅटगरी सुरु करत आहे. ‘किस्से सह्यांचे’ म्हणून… त्यामध्ये त्या व्यक्तींविषयी थोडे, भेटीविषयी थोडे आणि सही असेल तर सहीचा फोटो टाकत जाईन…..
नमस्कार साहेब,
सह्यांचा किस्सा सहिच आहे.
Hey…amazing topic…curious to know who all you have met 🙂
छान!!!
कोण कोण भेटले आणि त्यांच्या विषयी जाणून घ्यायला आवडेल.
– तो
lawakar yeoodet kisse.
(deonagarit kasa lihayacha ? plz help
नक्की… आणि देवनागरीचे म्हणाल तर त्याचे अनेक मार्ग आहेत पण सगळ्यात सोप्पा म्हणजे गुगलमेल मध्ये कंपोज करताना मराठी निवडायची. आणि मग इथे कॉपी-पेस्ट करायची…
धन्स निखिल,
गुगलमेल मी बरेचदा मराठीतच लिहिते.
आता तिथे लिहून इथे डकविन .