अपरिचित २६ जानेवारी

26 जानेवारी…? एक मित्र सकाळी म्हणाला, ‘भारतीय प्रजासात्तक चिरायू होवो.’ मी चुकून उत्तरलो – ‘सेम टू यू’..:)

जोक्स अपार्ट. शुभेच्छा….मात्र यावर पण आत्ता खर तर खरमरीत लिहायची इच्छा होत आहे…आपल्या सगळ्यांना तर १९४७ ते १९५१ मधल्या सगळ्या प्रिय-अप्रिय घटना पण माहित आहेत. २६ जानेवारीचे महत्व अधोरेखित आहे. त्याबद्दल सांगायची गरज नाही. प्रजासत्ताक दिवस या शब्दाचा खरं अर्थ माहित असण्यासाठी १९४७ ते १९५१ चा इतिहास वाचला पाहिजे. मग जेवढा अभिमान आत्ता वाटतो आहे तेवढाच नंतरही वाटतो का ते बघा. असो.

ही पोस्ट लिहित आहे ती २६ जानेवारी चे भारताच्या इतिहासात असलेले अजून योगदान लिहायला.

१५६५ साल – तालीकोट ची लढाई – विजयनगर हे शेवटचे हिंदू राज्य. दक्षिणेकडे हातपाय पसरलेल्या सगळ्या इस्लामी राजवटींनी त्याविरुद्ध केलेली शेवटची मोठी लढाई. आणि विजयनगर चा पाडाव. अतिशय गाजलेले युद्ध आहे हे. अहमदनगर, बिदर, गोवलकोंडा, विजापूर वगैरे सगळ्या दखनी राजवटी एकत्र आल्या. आणि भारतीय इतिहासाला रोजचेच असल्याप्रमाणे काही छोट्या छोट्या हिंदू राजांनी त्यांना मदत केली. दोन्ही बाजूंनी मिळून ३ लाखांच्या आसपास सैन्य असावे. विजयनगराचा पाडाव झाला. राजाचे मुंडके रस्त्यारस्त्यावर मिरवण्यात आले भाल्याच्या टोकाला लावून. आणि विजयनगर शहराची तर अशी धूळधाण उडाली की काय सांगू नका. विजयनगर गेले आणि बहामनी सुलतान आले. त्यानंतर जवळपास १०० वर्षांनी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी भारतीय सिंहासनाची संस्थापना केली. ही मधली १०० वर्षे मुघलांचा सुवर्णकाळ समजली जातात. आणि विजयानगराचा इतिहास भारताच्या सुवर्णकालांपैकी एक आहे.

१९३० –  कॉंग्रेस च्या लाहोर अधिवेशनामध्ये पहिल्यांदा हिंदुस्तान ला ‘पूर्ण’ स्वातंत्र्य मिळवून द्यायचं ठरलं. तेव्हा पंडित नेहरू हे भारताचे युथ आयकॉन होते. नेहरू आणि बोस भांडणे बिलकुल नव्हती. उलट ते दोघे विरुद्ध गांधी असा सीन होता राष्ट्रीय पातळीवर. पूर्ण स्वराज. ही संकल्पना आता लोकांना कॉमन सेन्स वाटेल पण तसे नाहीये, तोपर्यंत झालेले सगळे सत्याग्रह (काँग्रेस led) हे काही पूर्ण स्वराज्यासाठी नव्हते. दादाभाई नौरोजी, महात्मा फुले ते अगणित समाज-सुधारक हे आधी सामाजिक उन्नती, आर्थिक सुधारणा आणि मग राजकीय स्वातंत्र्य अशा धोरणाचे होते. थोडक्यात जरी जनतेचे मत असले तरी राजकीय प्रक्रिया तेवढी परिपक्व झाली नव्हती की पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडेल. लक्षात घ्या, टिळक म्हणालेत ‘स्वराज्य हा माझा जन्म-सिद्ध हक्क आहे’ स्वराज्य म्हणजे होमरूल. स्वातंत्र्य नव्हे. कारण तेव्हाची लढ्यामागची संकल्पना पूर्णपणे वेगळी होती. उद्दिष्टे वेगळी होती. भगतसिंगांची केस तेव्हा चालू होती. १९२९ ते १०३१ अशी ती चालली. बोस आणि नेहरू यांनी जनतेची नस बरोब्बर जाणली. किंवा जनतेला आपल्या दूरदर्शी विचारांबरोबर न्यायाची ताकद त्यांच्यात होती म्हणा. की महात्मा गांधींचा फारसा पाठींबा नसताना त्यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करवून घेतला. तसे पाहता भारतातल्या एका पक्षाने केलेला पक्षांतर्गत ठराव होता. पण तेव्हा एक तर तो पक्ष जोरात होता आणि आपण आतापर्यंत शाळेत काँग्रेस पक्षाचा इतिहास हा भारताचा इतिहास म्हणून शिकलो आहोत. (त्यामुळे माझे विचार जरासे सिनिकल असतील म्हणा.)

१९३० – अजून दुसरे महायुद्ध आसमंतात नव्हते पण काहीसा अंदाज होता. गांधींनी दांडी मार्च ची संकल्पना पूर्णत्वास आणायला हेच वर्ष निवडले. गांधी आयर्विन करार घ्या, पाहिली गोलमेज परिषद घ्या. सगळे याच काळातले. खान अब्दुल गफार खान याच कालात उदयाला आले.

१९६५ – हिंदी भारताची ओफ़िशिअल भाषा म्हणून संसदेमध्ये मान्य करण्यात आली. दुर्दैव की भारताला राज्यभाषा अजूनही नाहीये. हिंदी आणि इंग्रजी या ओफ़िशिअल भाषा आहेत. आणि हिन्दीला मान्यता कशी मिळाली, का मिळाली आणि जे काही राजकारण झाले तेव्हाच कळले होते की भाषावार प्रांतरचनेच्या नंतर चिंधड्या उडणार आहेत. राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घ्यायची हिम्मत फार कमी नेत्यांनी दाखवली आहे स्वातंत्र्यानंतर.

१९२६ – फरमान फतेहपुरी. अतिशय महान असे एक उर्दू भाषेचे अभ्यासक यांचा जन्म. (पाकिस्तान)

२००१ – भूज चा भूकंप. हा कोणी कसं विसरेल? भयानक. भयंकर. किल्लारी ची आठवण जागवली होती त्याने. किमान लगान चित्रपटामुळे तरी लोकांना आठवत असेल तो आता.

सॉरी. उगीच निराशावादी लेख लिहिला. पण प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छांचे लेख सगळीकडेच आहे. अपरिचित २६ जानेवारी आणि त्या अवतीभवतीच्या घटना जशा आठवल्या तशा उतरवल्या. एवढेच. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

Advertisements

6 thoughts on “अपरिचित २६ जानेवारी

  1. Rohan

    छान आहे लेख …. १९४७ ते १९५१ दरम्यान लढल्या गेलेल्या युद्धाचा सुद्धा वीसर पड़ता कामा नये.

    १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण सोबत मिळाला विभाजनाचा शाप देखील. त्यात पाकिस्तानने काश्मिरवर आक्रमण केल्याने राजाहरीसिंग यांनी घाईने भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. अगतिक होउन त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि नकळत भारताचा प्रवेश झाला एका चक्रव्यूहात. ज्यात तो शिरला खरा पण आज ६० वर्षांनी देखील बाहेर पडायचा मार्ग शोधतोय…

    • Nikhil Sheth

      तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण माझा निर्देश आहे भारतीय घटना तयार होताना झालेल्या राजकारणावर होता. तेव्हाची कमिटी, आयपिसी वगैरे वगैरे….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s