अनाकलनीय अमेरिकन्स…

चीन जगातले Manufacturing Hub आहे असे ऐकले होते. ९ ऑगस्टला २००९ ला ‘छोडो भारत’ केला आणि युएस ला आलो. एक कोणता तरी सण होता ज्यासाठी खूप सारे अमेरिकन झेंडे वापरले होते. छोटे, मोठे, कापडी, कागदी, प्लास्टिक चे वगैरे….दुसऱ्या दिवशी एक हातात मिळाला. त्यावर बघितले तर बाजूला छोट्याश्या अक्षरात ‘made in china’ अशी अक्षरं. अनाकलनीय आहे हे. राष्ट्रीय अस्मितेच्या या झेंड्यावर..!! आणि ते कुणाच्या गावात आहे असेही वाटत नव्हते. एक फोटो पण काढला होता.

अनुराग माथुर चे एक पुस्तक पहिले होते. ‘The Inscrutable Americans’. खरंच.

अनाकलनीय.

10 thoughts on “अनाकलनीय अमेरिकन्स…

  • Nikhil Sheth

   खरं तर या विषयावर बरेच प्रवाद आहे. की राष्ट्रीय अस्मितेची व्याख्या, स्वदेशी-विदेशीची व्याख्या, जनतेची सेन्सेटीविटी….प्रत्येकाला ही गोष्ट दाखल-पात्र आहे असे वाटेलच असे नाही. शेवटी मास-स्केल वर अर्थकारण जास्त महत्वाचे ठरते…

 1. अनिकेत वैद्य

  मला अशीच १ इ-मेल fwd. आली होती. त्यात नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरल्याचे दाखवले होते.
  दुसर्‍या चित्रात झॊम करून त्याच्या हातातला झेंडा दाखवला होता.
  तिसर्‍या चित्रात तो झेंडा झॊम करून त्याच्यावरचे Made in Chins दाखवले होते.

  • Nikhil Sheth

   हो, खरं तर तो मेल मी ही फार पूर्वी बघितला होता आणि तेव्हा हसलो होतो विनोद समजून…पण टी वास्तविकता आहे ते आता बघितले.

  • Nikhil Sheth

   सगळे एकतर शब्दांचे नाहीतर पैश्याचे खेळ आहेत. प्रत्येक गोष्टीला नाव देता येते आणि मोरालीटी म्हणजे काही गणित नाहीये. अगदी सहज मानिप्युलेट करता येते…:)

 2. Mandar

  मी अमेरिकेतून भावाला गिफ्ट देण्यासाठी आणलेल्या पाकिटात लपवलेल्या नोट वर पण असच लिहिलं होत! ‘Made In India’ 😀

 3. अभिजीत पवार

  भारतामध्ये काही वेगळा होत नाहीये. आपल्या देशाचा झेंडा, दिवाळीचे फटाके अन् रोषणाई, ईतकेच नाही तर चतुर्थीला बसणारे गणपती देखील आता चिना मध्युन येत आहेत.

  • Nikhil Sheth

   बदलत्या काळाप्रमाणे लोकांचे स्कीलसेट्स बदलले पाहिजेत. कामाची कमतरता कधीच नसते. मात्र कामाचे प्रकार बदलण्याचा वेग आणि माणसांचे स्कीलसेट्स बदलण्याचा वेग यात तफावत असते. पूर्वी हे बदला फार कमी व्हायचे..नंतर पिढीगणिक व्हायला लागले…आता बदलांचा वेग असा आहे की पिढी बदलायच्या आतच मार्केट मध्ये आवश्यक असलेल स्कीलसेट्स बदलतात. त्यामुळे ही अडचण होते….हा जो फेज डिफरन्स आहे तो जर व्यवस्थित जाणून पाऊले उचली तर ही अडचण येणार नाही….मात्र बदलांना सामोरे जायला मुक्त विचारांची आवश्यकता असते. (हे उत्तर बहुधा थोडेसे भरकटलेले वाटू शकते पण मुद्दा तोच आहे)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s