कविता…? घंटा..!!!

लहानपणी कधी काळी कविता करायचा एक प्रयत्न केला होता. प्रयत्न कसला तो, गम्मत च होती ती. मी आणि यशा, दोघे एका बाकावर बसून शब्दाला शब्द जुळवायचो. यमक शोधायचो….तेव्हा कारगिल चे युद्ध चालू होते. तर काय कविता करावी? ‘भारत आहे एक कुरण, कुणीही यावे चरून जावे, स्वस्त आहे येथे मरण, कारण, कोरड्या नदीवरील हे धरण….’ 🙂 आता किती हास्यास्पद वाटते. वामन पंडितांनी समर्थांना आपला गुरु केले होते. समर्थांनी उपदेश दिला की संस्कृत ऐवजी मराठी मध्ये लिखाण करा, जनसामान्यांपर्यंत पोहोचेल. वामन पंडितांनी ऐकले. आणि जी काही सुसाट काव्यरचना केली, त्यात इतके यमक वापरले इतके यमक वापरले की समर्थांनी त्यांना ‘यमक्या’ वामन हा खिताब च बहाल केला. असो. विषयांतर झाले. तर लहानपणी कविता करायचे फुटकळ प्रयत्न केले. कधी कधी निसर्गावर अत्याचार केले कधी समाजावर तर कधी मनावर तर कधी देशावर…पण कविता करायचा नाद नाही सोडला. एकदा असा लिहिले होते, ‘कोल्हयासारखे असतात राजकारणी सगळे, राजकारणात असतात लोणच्यासारखे मुरलेले..उड्या मारतात इकडून तिकडे जसे काही ससे, नीतीमत्तेचे यांना काही बंधनच नाही कसे?’…काय त्या उपमा, काय ती उदाहरणे… वा वा…देश-समाज झाला आता आला निसर्ग. त्याबद्दल म्हटलो होतो, ‘पडती टपटप धारा, सळसळतो हा वारा, आपत्ती या गारा, चिंब निसर्ग सारा…वीज मिरवते नारा, वाकती ढग गजभारा, पावश्याचा हाकारा, चिंब निसर्ग सारा….सायंकाळच्या दिवाबात्तीला, झाड नाचते आज, नभातल्या रंगांना या कल्लोळाचा साज, ढगांचा मुकामारा, चिखलाचा पसारा, चिंब निसर्ग सारा’….खरच लिहिताना पण हसायला येते आहे खूप..

एकदा मुक्त छंदाविषयी मर्ढेकरांचे वाचले – ‘इरेस पडलो जर बच्चमजी, मुक्तछंद तर लिहीन मीही’…मग मीही लिहिला…’पेटलेली संध्याकाळ, पेटलेल्या संध्याकाळी मी नदी किनारी बसलो होतो, मस्तकात विचारांचे काहूर माजले होते आणि मनात प्रश्नांचे मोहोळ उठले होते…काडीने वाळूवर स्मृतिचित्रे रेखाटत होतो, आभाळाच्या कुन्चाल्यांवर रंगांचा काला झाला होता आणि बुडू पाहत असलेला सूर्य केविलवाणा झाला होता….’ चायला काय वाचत होतो तेव्हा काही माहिती, काय लिहिले आहे हे? आठवीमध्ये?

गेय कवितेचा प्रयत्न केला तेव्हा असा परिणाम झाला – ‘हाय त्याच्या वेदनांचा पूर वाहे, बांध तुटुनी अखंडित वाहताहे, सावकाश सळसळते आज पण, भेदुनिया ती शांतता कमान.’ तेव्हा बहुधा बालकवींची ‘भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा’ बालभारती मध्ये होती…बहुधा दिंडी वृत्त आहे. आठवत नाही.

तर असा प्रवास चालू होता. देश, समाज, निसर्ग, वेदना, आता आले मन. मनावर पण एक कविता केली चायला…कोणालाच सोडले नाही..एकेकाला धरून धरून कविते मध्ये ठोकून-माकून बसवले..तर मनावरची कविता, ‘एक अंदाज अंदाज बांधत चाललो, जगीयाच्या पसाऱ्यात कासारे मावलो? एवढ्याश्या विचाराने मन अंतरी लावले, विचारता विश्वालाच का बरे ते कावले? अणूत हे जग, अणुतच मी हा सारा, सांग कसा रे मावेल त्यात मनाचा पसारा? विचार विचार डोके फुटले फुटले, नाही वाटत वाटत प्रश्न अजून मिटले. अजूनही मनाचा या अनंत संसार, गवताची कडी नाजू पेले गजभार. वाकलो वाकलो गजाच्या या भारे, पण थांबलेच नाहीत प्रश्नांचे हे वारे. असंख्य प्रश्नांचे उठे आकाशी मोहोळ, नक्षत्राला खेचायचे जणू काही याचे बळ. नाही नक्षत्र हलले, नाही वादळ शमले, तुडवली गेली फक्त पायाखालची कमले, अशा प्रसंगांनी ऊर फाटले फाटले अनु गिळावया जणू परमाणु आले. अजून ही कळेना असा विश्वाचा हा व्याप? काय मनाची ही सीमा आणि त्याचे तोल-माप’ सरळ आहे शब्दाला शब्द, वाक्याला वाक्य. फक्त एक चाल मेंटेन करायचा प्रयत्न…..पण आता जोडीला अनुप्रास पण आला होता. काय काय पराक्रम केलेत तेव्हा…

एकदा जीवनलहरी वृत्त वाचले. ‘नदीच्या शेजारी, गडाच्या खिन्डारी, झाडांच्या ओळीत वेळून्च्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई, राहते ग आई?’ ही कविता त्या वृत्ताचे उदाहरण म्हणून अजून आठवते. शब्द आणि गेय मानतेसाठी मला हे वृत्त मला फार आवडते. तर लगेच तेव्हा त्यात पण कविता – सळसळ वारा, सूर्याचा हा पार, इवलेसे फूल झालेले मलूल’ चायला कवितेमधले प्राण च काढून टाकले सगळे…काय वाट लावली वृत्ताची. पुढे वाचा. पोट धरून हसा. ‘एकटे स्मशान, टाकुनिया मान, बसलेले आज, झाडूनीया लाज, दृश्य भयंकर, थडग्याला चीर, मृतवत सारे पक्षी घुत्कारे, आवाज भयाण, घाबरे हे रान, भग्न अवकळा, पान सळसळा इथे हे हजर, जिवंत मरण’…काय ते कल्पना विश्व तेव्हाचे…खरं….

पण सगळ्याच काही बक्वास कविता नाही केल्या काय. एक बरी पण केली होती. नाव होते ‘अलिप्त’. ही यशाने आणि मी एकत्र बसूनच केली होता म्हणा…Here it goes – इथेच होतो दिवस इथेच होते रात्र, आभाळ फ़क़्त निमित्तमात्र. दाटूनिया ढग, कोसळती जलधारा, आभाळाने सोसावा फ़क़्त विजांचा मारा… चांगली जमत होती पण यापुढे कधी गेलीच नाही…

पण नंतर आली वेळ दलित काव्याची…आठवीत असताना मला दलित काव्य करायची बुद्धी कुठून झाली तो एक परमेश्वरालाच ठाऊक..पण केल्या खऱ्या एकदोन दलित कविता…दलित म्हणजे दलित काव्य नाहीये ते..पण त्यावरून शैली(?) घेतलेली आहे.

रक्ताळलेली प्रतिभा आणि भेगाळलेले मान, बोथटलेली हाडके, कशी करायची सहन? आशेचा उभारा मनास देता देता,कोसळून गेलो उभा होता होता. व्याकुळतेच्या मुंग्या डसल्या, पण सावरतील त्या रिती कसल्या? आलो होतो जा जगात यशोचिन्तनाने सजून पण फुलांचा झाला चुराडा आणि मने गेली कुजून…’.वगैरे वगैरे अजून पुढे काय काय आहे…ही झलक पुरेशी आहे. अजून खूप आहेत. पण वाचकांवाराचे अत्याचार थांबवतो….नाहीतर तुम्ही लोक पुन्हा फिरून इथे यायचे नाव घेणार नाही. कारण त्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, हा काही मंच नाहीये टोमाटो किंवा बूट फेकून मारायला.


Advertisements

13 thoughts on “कविता…? घंटा..!!!

 1. सुहास

  वाह..खरच मला पण जुने दिवस आठवले शाळेतले तेव्हा शाळेच्या विश्वावर एक कविता करायचा प्रयत्न केला पण “अधुरी एक कविता :p” ती आज पर्यंत तशीच एका वहित वाट बघतेय पूर्ण होण्याची 🙂

 2. सौरभ

  हॅलो निखिल, कसा आहेस? वर्डप्रेसवर भटकताना तुझा ब्लॉग मिळाला.

  मजा आली वाचायला. अवचट काकूंच्या क्लासमध्ये असताना तुझी ती कवितांची वही बघितल्याचे आठवते. ती नेहमी इकडून तिकडे फिरत असे. 🙂

  -सौरभ (सुभाष)

  • Nikhil Sheth

   आयला सुभाष??? यू स्टील रिमेम्बर… अल्टीमेट. अरे खरं तर ती वही ‘सगळी’कडे फिरायची, नाही का? 🙂 भारी…तुला इथे पाहून आनंद झाला. घर बदललेस आणि संपर्क तुटला होता आपला…पुढचे मेल वर बोलुयाच आता…ब्लॉग लिखाण सुरु केल्याचा पहिला दृश्य फायदा.

  • Nikhil Sheth

   इथेच पोस्ट करताना विचार करत होतो की ब्लॉग वर चुकून लोकांनी चपला आणि अंडी-टोमाटो मारले आणि त्यांचेच पीसी खराब झाले तर??

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s