अर्था-अर्थी

एक सुंदर रचना आहे – राजहंसाचे चालणे, जागी जाहले शहाणे, म्हणुनी काय कवणे, चालोची नये?

अर्थ सांगायची गरज नाही. एकदम सहज आणि सोपा आहे. तुम्ही कितीही अचिव्ह करा, तुमच्या क्षेत्रात कोणीतरी तुमच्या वर अजून असणारच…त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा नाराज होऊन ध्यास सोडायचा नसतो..आणि पिकासो झाला, राजा रविवर्मा होऊन गेला म्हणून मी चित्र काढायचीच नाहीत का? पिकासो पिकासोच्या जागी, मला कुठे त्याच्याशी जाऊन स्पर्धा करायचीये? मी आपला कालिदास म्हणतो तसा, ‘स्वान्तसुखाय’ चित्र काढेन किंवा माझ्या पातळीवर जे जमेल ते साध्य करेन. ते असो. पोस्ट वेगळ्याच मुद्द्यावर आहे. साहित्यामध्ये मुशाफिरी करत असताना किती साधर्म्य दर्शक रचना आढळतात. म्हणून काय कवणे चालोची नये? याच अर्थाची एक कविता शाळेत होती. ती अशी – ‘या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो’, (वाड्गमय रुपी नदी वगैरे अझ्युम करूयात) कवी म्हणतो, ‘मी नव्हे शिल्पज्ञ मोठा, तंत्र नव्हते माहिती, चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती’, (कवी जरा डाऊन टू अर्थ आहे असे दाखवतो आहे) तर,  पुढे तो म्हणतो, ‘मी नव्हे शिल्पज्ञ मोठा, तंत्र नव्हते माहिती, चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती, फ़क़्त तिचा चिखल व्ह्याया अंतरी मी ओळलो’ आणि ‘ताज बांधो बांधणारा, मी वडारी जाहलो’ हा..हा मुद्दा सांगायचं होता..ताज बांधो बांधणारा मी वडारी जाहलो..आहे कि नाही ‘म्हणून काय कवणे चालोची नये’ स्टाईल?

मोमीन खान मोमीन म्हणून एक शायर होता मुघल दरबारात, तो म्हणून गेला, ‘तुम मेरे पास होते हो गोया, जब कोई दुसरा नही होता’…..या अर्थाचे कुठे काही ऐकले/वाचले आहे का? आहे. आहे…पण नक्की आठवत नाही? जरा जोर द्या…श्या….ठीके, सांगतो. त्या मोमीन ने आपले तुकाराम वाचले असण्याची धूसर सुद्धा शक्यता नाहीये. आणि तुकारामांचेच वचन आहे – ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’…!! अहाहा,,काय योगायोग…अजून पुढे वाचा…त्याचा समकालीन जो कि गालिब, तोही म्हणतो, ‘इमा मुझे रोके है तो खींचे है मुझे कुफ्र’ आणि तुकाराम काय म्हणतात?? ‘आपुलाची वाद आपणासी’..:):)

मात्र प्रत्येक वेळी सेम अर्थासाठी सेम दृष्टांत आहे असे नाही. मर्ढेकरांची जी सगळ्यात प्रसिद्ध कविता आहे, ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ त्यामध्ये एक असे आहे – ‘जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे’ तेव्हा कम्युनिस्ट चळवळ सुरु अजून व्हायची होती. कॉम्रेड डांगे, बी टी रणदिवे वगैरे पब्लिक होते पण साहित्यामध्ये फ़क़्त अण्णाभाऊ साठे होते, नारायण सुर्वे वगैरे यांचा उदय व्हायचा होता..गिरणी कामगार चळवळ नुकतीच जोर धरू लागली होती. तेव्हा मर्ढेकर म्हणतात. ‘जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे’. आणि त्याच्या थोड्याच नंतर आलेल्या एका हिंदी पिक्चर मध्ये एक गाणे होते, अजूनही लोकांच्या ओठावर आहे ते, ‘आज फिर जीनेकी तमन्ना है, आज फिर मरनेका इरादा है’. दोघांना म्हणायचे आहे ते पोलर अपार्ट आहे पण दृष्टांत एकाच…आणि तोच दृष्टांत वापरून इब्राहीम जौक दहलवी काय म्हणतो? तर ‘लायी हयात आये, कजा ले चली चाले, अपनी ख़ुशी ना आये ना अपनी ख़ुशी चाले…’ याला म्हणतात सुवर्ण-मध्य..:) सक्ती पण नाही इच्छा पण नाही. आयुष्याने आणले, आलो, मृत्यू घेऊन चालला, चाललो, ना माझा मत कोणी विचारलं ना माझी इच्छा… अशी ही आपलीच आपले आयुष्य घडवण्यामध्ये असहाय्यता….:) ) ही गझल कुंदनलाल सहगल ने फार सुंदर गायली आहे ३६-३७ साली. कुठे मिळाली तर जरूर ऐका…या गझलेचा विषय निघालाच आहे तर त्यामागची एक दंत-कथा पण सांगून टाकतो. बहादूर शह जफरच दरबार भरला होता दिल्लीच्या किल्ल्यात. १८४०-५० च्या आसपासची गोष्ट असावी. शाही मुशायरा चालू होता. एक एक कवी आपापली कलाकृती सादर करत होता. स्वतः बादशाह जफर एक उत्कृष्ट कवी होता. जसे संगीतामध्ये गंडाबंद गुरु असतो तसंच शायरी मध्ये ही एक उस्ताद असतो. ज्याच्याकडून तालीम मिळते. आणि आपले मुहम्मद इब्राहीम जौक दहलवी साहेब हे प्रत्यक्ष बादशाह जफर चे उस्ताद होते. तर मुशायरा चालू होता आणि जौक साहेब त्यांची मुखम्मस (५ ओळींची कविता) सुरु करणर, तेवढ्यात अचानक बादशाह ला बेगमचे बोलावणे आले. बिचारा काय करणार, दरबारातून उठून निघून गेला…आणि मग तेव्हा जौक साहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले – ‘लायी हयात आये, कजा ले चली चले, अपनी ख़ुशी ना आये ना अपनी ख़ुशी चले’..

आणखी एक गमतीशीर दाखला देतो आणि पोस्ट संपवतो. व पु म्हणतात – ‘सुगंधाचं नातं नाकाशी.. घशातून आत गेली की राहते ती फक्त हवा.’ आणि थोड्या सिमिलर लाईनवर रामदास म्हणतात – ‘घेताची होय सुग्रास अन्न, अर्धी विष्ठा अर्धे वमन’…!!! आहे कि नाही गम्मत च गम्मत चोहीकडे?Advertisements

19 thoughts on “अर्था-अर्थी

 1. आल्हाद alias Alhad

  व्वा!
  योगायोगानेच येऊन आपटलो खरंतर तुमच्या अनुदिनीवर….. आणि खरंच एक सुंदर लेख वाचायला मिळाला…

  धन्यवाद.

 2. Arun

  Tumhi far bhagyawan manushya ahat karan ki tumhala he sarv vachayache ani ektra jodayache sanskar zale. Amhi thode kami bhagyawan ahot karan tumhi jevdha wel lihu shakata tevdhach portion amhi wachoo shaktoo. Ishwar karo tumhala jast lihinyachi buddhi dewo.

  • Nikhil Sheth

   मनापासून आभार…पण मी जे काही लिहित आहे ते फार वेगळे नाहीये…सगळी पुस्तके, लेख, लेखक, सिनेमे, गाणी, गझला, इतिहास…..सारे सारे आपल्या सर्वांच्या परिचयाचेच आहे…इथे आल्यापासून सगळ्यांशी संबंध तुटला. वाचायला वेळ पण मिळेनासा झाला. म्हणून हे लिखाण सुरु केले…काहीतरी संपर्क राहील त्या विश्वाशी म्हणून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s