अर्थ – अनर्थ

भाषा किती गमतीशीर आहे ना? प्रचलित म्हणी, त्यांचे शब्दार्थ, उगम, उच्चार…सगळ्यांचा इतिहास मोठा रंजक असतो. एकदा असाच एका सरांशी यावर बोलत होतो. ते म्हणाले, ‘शब्दांचा बारकाईने अभ्यास/विचार केला तर माणसाचा अहं वाढतो.’ याचा अर्थ अजून मला कळला नाहीये. काहीही असो. गोष्ट इंटरेस्टिंग आहे मात्र खरी. मागे एकदा शब्दांचे काळानुसार बदलत जाणारे अर्थ यावर एक लेख वाचला होता. उदाहरण होते, ”थिल्लर’. आता याचा अर्थ काय आहे ते आपणा सर्वांना माहित आहेच. एखादे पात्र थिल्लर आहे म्हणजे उथळ, वरवरचा विचार करणारे, सिरीयसनेस नसणारे वगैरे वगैरे….मात्र हाच शब्द ज्ञानेश्वरी मध्ये ही आढळतो, खूपशा उदाहरणांमध्ये आहे वापरलेला मात्र वेगळ्या अर्थाने. तिथे अर्थ आहे पाण्याचे छोटेसे ‘डबके’. आता त्याचा हा झाला वाच्यार्थ. कालानासुर त्याचा वाच्यार्थ गायब झाला मात्र ध्वन्यार्थ जो कि डबक्याच्या पाण्याचा उथळपणा, बरका दगड जरी मारला तरी लगेच येणारे तरंग आणि आवाज, हा अर्थ राहिला. म्हणजे शरीर गेले पण आत्मा आहे असे झाले. अशी भाषा बदलत जाते.

पण त्यावेळी त्या सरांचा राग आला खरा खूप. इथे मस्त विषयावर सगळी चर्चा चालू आहे आणि मध्येच काहीतरी असे अवमानजनक मत प्रदर्शित करून जायचे. मग सगळा विचका होतो. असो. या गोष्टीला आता ६ पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलीत. मात्र प्रसंग ध्यानात राहिला.

कालच रूममेट्शी बोलत होतो या विषयावर. किती मस्त वानगी आहे बघा. आपण बोटांमध्ये अंगठी घालतो. खरच? नक्की? नीट विचार करून बघा…आपण काय करतो? बोटांमध्ये अंगठी घालतो कि अंगठी मध्ये बोट?? हेःहेःहेः… अशीच अजून एक गम्मत. गॉसिपिंग करणे म्हणजे मनुष्यजातीची जन्मजात खोड. त्यात अपार आनंद मिळतो. पण जर नंतर ज्याच्याबद्दल बोलत होतो त्याला कळले तर? काय म्हणतो तो? ‘ तू माझ्या अपरोक्ष जे काही बोललास ते मला पसंत नाही. जे काही बोलायचे चे तोंडावर बोलत जा.’..!!! त्या मनुष्याला कधीच कळत नाही कि तो जे बोलायचे आहे त्याच्या बरोब्बर उलटे बोलत आहे. शब्द-संधी बघा अपरोक्ष शब्दाची. अपरोक्ष = अ+पर+ईक्ष. ईक्ष म्हणजे डोळे. पर म्हणजे परक्याचे. म्हणजे परोक्ष मिन्स दुसऱ्याचे डोळे. अर्थ परोक्ष म्हणजे दुसऱ्यासमोर अर्थात माझ्या मागे. आणि जेव्हा त्याला आधी ‘अ’ लागते तेव्हा त्याचा अर्थ विरुद्ध होतो. अ+परोक्ष म्हणजे माझ्यासमोर नाही असे नाही. म्हणजे माझ्या समोर….कन्फ्युज होऊ नका. थोडक्यात म्हणजे अपरोक्ष या शब्दाचा अर्थ आहे इतरांसमोर नाही (= माझ्यासमोर)…आता ‘माझ्या अपरोक्ष बोललेले आवडले नाही’ याचा अर्थ ‘माझ्या अनुपस्थित बोललेले आवडले नाही’ असा कसा होईल???

पण एक कळत नाही. हा काय संसर्गजन्य रोग आहे का? मराठी मध्ये ‘अपरोक्ष’ तसेच हिंदी मध्ये मेरे पीठ के पीछे आणि इंग्रजी मध्ये ‘behind my back’  आता behind my back म्हणजेच माझ्या पाठीच्या मागे आणि म्हणून माझ्या समोर…!!!

वरती जे उदाहरण दिले, बोटांमध्ये अंगठी, ते तर मराठी मध्ये खूपच व्यापक प्रमाणात आहे. बोटांमध्ये अंगठी, हातामध्ये बांगडी, पायामध्ये चप्पल आणि अंगामध्ये कपडे..!!! आता अस वाटतंय ना? कि अंगठीमध्ये बोट, बांगडीमध्ये हात, चपलेमध्ये पाय आणि कपड्यामध्ये अंग. सरळ आहे. आपण कधी पायात जीन्स नाही घालत तर जीन्स मध्ये पाय घालतो…. याचा उगम तर मला नक्की माहित नाहीये. जर तर्कतीर्थ असते तर त्यांना विचारला असता. पुलंनी पण यावर नक्कीच कुठे तरी विनोद केला असला पाहिजे…


Advertisements

6 thoughts on “अर्थ – अनर्थ

    • Nikhil Sheth

      तुम्ही जो म्हणता आहात त्या प्रसंगाशी मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. आणि या ब्लॉग वर कुठे ही आतापर्यंत मी लाकूडतोड्यावर काहीही लिहिले नाहीये.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s