सिनेमा सिनेमा

अनेकदा मध्येच असेच सिनेमा पहायचे खूळ येते आणि मग एकानंतर दुसरा, तिसरा….मालिकाच सुरु होते…आणि अचानक आयुष्यातले काही दिवस गायब होऊन जातात. आत्ताच पाहिली सेमिस्टर संपली आणि स्प्रिंग सेम सुरु होत आहे. दरम्यान ३ आठवडे सुट्टी होती. तसे पाहता बरेच काम करायचे प्लानिंग केले होते. पण हाताशी मोकळा वेळ, इंटरनेटचा अति-जलद स्पीड, सिनेमांची आवड, खूप मोठी विश-लिस्ट आणि डोक्याला कसला ताप नाही. यासारखे आयडियल काय असेल सिनेमे पाहायला? बघता बघता ३ आठवडे गायब झाले. आता या सगळ्या सिनेमांचे परीक्षण करायचे तर आपली कुवत नाही आणि शक्यही नाही. फ़क़्त ती यादी इथे देतो झाले.

  • अर्थ
  • छोटी सी बात
  • आक्रोश
  • अंकुर
  • अर्ध सत्य
  • निशांत
  • बझार
  • भूमिका
  • मंडी
  • मिस्टर & मिसेस ५५
  • वेक अप सिद
  • कागज के फूल
  • गरम हवा
  • मम्मो
  • सुरज का सातवा घोडा
  • तुला शिकवेन चांगलाच धडा
  • थोडा स रुमानी हो जाये
  • रॉकेट सिंग
  • १२ अंग्री मन
  • पाथेर पांचाली
  • अपराजितो
  • अपूर संसार
  • शेरलोक होम्स
  • रोबिन्द्रनाथ टागोर (सत्यजित राय)
  • डॉ स्ट्रेंजलव
  • सेरेंडीपिटी
  • बातो बातो मे
  • ३ इडीयट्स
  • चितचोर
  • इट्स अ वंडरफूल लाईफ
  • अवतार
  • सम लाईक इट हॉट
  • ट्रान्सफोर्मर्स १
  • लाईफ इस ब्युटीफुल
  • फ्रोम हियर टू इटर्निटी
  • गोलमाल (मराठी)
  • नटरंग
  • बिफोर सनसेट
  • मिर्झा गालिब (भरत भूषण, सुरैय्या वाला)
  • यातल्या जवळ जवळ प्रत्येक पिक्चर वर एकेक पोस्ट होऊ शकेल आरामात. एक एक जेम आहे, मास्टरपीस आहे, बहुतांश अजरामर कलाकृती आहेत. चित्रपट बघता बघता अशी एक लेवल येते कि मग भाषेचे बंधन वाटेनासे होते. चित्रपट जर्मन अहि कि जपानी, बंगाली आहे कि तमिळ, नो प्रोब्लेम, काही संवाद आहे कि नाहीत, नो प्रोब्लेम, काळा-पांढरा आहे कि रंगीत, नो प्रोब्लेम, संवाद आहेत कि संगीत, नो प्रोब्लेम, फ़क़्त कलाकृती जेन्युईन पाहिजे. मग मजा येतो. बऱ्याचदा असे वाटते कि एवढे २-३ तास इंवेस्त करून शेवटी पदरात काय पडणार? पण फल-निष्पत्ती व प्राप्ती च विचार मनात असेल तरं कलेचा आनंद घेता येत नाही. चित्रपटाची एक नशा असते. कैफ असतो. आणि मग भूक वाढत जाते. आणि विश लिस्ट चे तरं काय, ती तर हनुमानाच्या शेपटी सारखी वाढता वाढता वाढे अशी आहे….इनएक्झोसटीबल आहे. गालिब म्हणतो ते कधी डोक्यातून जाताच नाही.

    हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहोत निकले मेरे अरमान लेकीन फिर भी कम निकले….

    9 thoughts on “सिनेमा सिनेमा

    1. हेरंब

      एकदम मस्तच सिनेमे निवडलेत.. सगळेच ग्रेट आहेत. (wake up sid सोडून) .. पण 12 angry men आणि life is beautiful ग्रेटेस्ट आहेत. माझी पारायणं झालीयेत दोघांची. फार उच्च दर्जाच्या कलाकृती आहेत दोन्ही.

      • Nikhil Sheth

        खरं…लाईफ इज ब्युटीफुल हा खरा अप्रतिम सिनेमा आहे. सर्वांगाने. आणि १२ अंग्री मेन तर काय सांगू… आधीच अतिशय उत्कृष्ट कथा व संवाद अन त्यात हेन्री फोंडा ची कारागिरी…त्यावर हिंदी मध्येही एक पिक्चर येऊन गेलाय. एक रुका हुवा फैसला म्हणून…तोही पाहायचाय.

      • Nikhil Sheth

        परज़ानिया नामक एक सिनेमा पहिला होता.. फिराक पण त्याच विषयावर आहे बहुधा.. पाहायला हवा.. नेमसेक पाहिलंय.. जबरदस्त आहे.. निकोलाय गोगोल पूर्वी माहित नव्हता तो त्यामुळेच कळला.. भारी आहे सिनेमा..पुस्तकही चांगले आहे. इतर सीनेमे माहित नाहीयेत. बघायला हवेत. आभार..

    यावर आपले मत नोंदवा