शब्दप्रभू वाचीवीर

भाषेची जडण-घडण कशी होते एक गम्मत च आहे. आणि त्यात खूप मज्जा मज्जा असतात. भाषा ही प्रवाही असते, इवोल्विंग असते. ती कोणी जाणून बुजून घडवत-बिघडवत नाही. समाजाचे प्रवाह, संस्कृतींचा प्रभाव, वक्तव्याची माध्यमं, मनोरंजनाची साधने, साहित्याची ताकद या व अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. तुकारामांचा मराठी भाषेवरचा प्रभाव, किंवा शेक्सपियर चा इंग्रजी वरचा प्रभाव यांवर बरेच लिहिले-बोलले गेले आहे. साहित्यिकाची ताकद पण त्यामुळे नक्कीच उपेक्षणीय नाहीये. काही काही वेळा जाणीवपूर्वक प्रयत्न होतात, भाषा बदलायचे. जसे कि रघुवीर यांचे हिंदी शुद्धीचे प्रयत्न किंवा आपल्याकडे सावरकर मराठी म्हणा…त्यावरून एक गम्मत आठवली, सावरकरांनी अनेक शब्द प्रचलित केले. त्याबद्दल मराठी त्यांची आजन्म ऋणी आहे. त्यांच्या या शब्द संपदेमध्ये एक शब्द म्हणजे ‘राव’. साहेब या फारसी शब्दाला प्रतिशब्द म्हणून त्यांनी ‘राव’ रूढ केला. आणि आता आजकालचे पोस्टर्स पाहिलेत राजकारण्यांच्या जाहिरातींचे, तर त्यात नाव कसे असते? अमुकरावजी तमुकसाहेब..:)

मुद्दा अशावरून सुचला कि काल माझा एक मित्र, निखिल याने चीनी मुळाक्षरे ‘खान्जी’ कशी बनली आहेत त्याची एक गोष्ट सांगितली. चीनी भाषा ही हायरोग्लीफिक आहे. आणि ती अजाणत्याला प्रचंड विचित्र वाटते. पण ती अशी का आहे? आणि त्यात मोजकीच मुळाक्षरे नसून खूप सारी चित्र का आहेत? गोष्ट जी आहे ती सत्यकथा आहे कि पौराणिक माहित नाही. पण आहे खूप छान.

काळ साधारण इ पु २५००. चीनच्या ५ महान राजांपैकी एक यलो एम्परर (हुंग डी). तेव्हा लेखन कला नव्हती. माहिती नोंदवण्यासाठी दोरीच्या गाठी किंवा असे काहीतरी वापरायचे. त्या पद्धती वर राजा आहे नाखूष. खान्जी ला दरबारात बोलावणे आले. तू आता लिखाण करण्यास लागणारी चिन्ह तयार कर…!! खान्जी साहेब निघाले आणि नदीकिनारी आले. खूप काळ प्रयत्न केला. जमेना. अशी कशी सुचणार? चिन्ह काय आकाशातून आणायची? एके दिवशी आकाशातून उडणारा फिनिक्स दिसला. त्याच्या चोचीतून काहीतरी जमिनीवर पडले. जवळ जाऊन बघितले. काय वस्तू आहे ही? कोणत्या तरी प्राण्याचे पग-मार्क होते. कळेना. नाहीतरी काही चिन्हे सुचत नव्हती, रिकामा वेळ होता. आता किमान याचा तरी छडा लावूयात. एका स्थानिक आदिवासीला शोधून आणले. तो म्हणे कि ‘पी याओ’ चे आहे. काय पुरावा? कशावरून? तर म्हणे मला माहित आहे. मी इथे आयुष्यभर राहिलो आहे. प्रत्येक प्राण्याची एक खासियत असते. मी हे बरोबर ओळखले. ‘पी याओ’च आहे. अचानक साक्षात्कार झाला आपल्या खान्जी महाराजांना. Sudden Revelation. Epiphany. निसर्गातल्या प्रत्येक जीवाला, वस्तूला एक व्यक्तिमत्व आहे, एक ओळख आहे. जर ती आपण या चित्रांमध्ये बंदिस्त करू शकलो तर संपूर्ण सेट तयार होईल. झाले. महाराज सुटले. सूर्य, चंद्र, तारे, नदी, नाले, पक्षी, झाडे, फळे, फुले, वगैरेंचे निरीक्षण सुरु झाले. त्यांना न्याहाळत न्याहाळत हा चित्रांचा सेट पूर्ण झाला. राजाला सदर केला. राजा खुश. त्याने सगळ्या प्रांतांच्या कारभाऱ्यांना बोलावले आणि शिकायला सांगितले. खान्जी पण खुश. अशी आहे आजच्या या दुर्बोध-विचित्र लिपी मागची कहाणी.

याच्याशीच सिमिलर एक कथा आपल्याकडे ही आहे. जरा जास्त वास्तववादी एवढेच. आपल्याकडे १९४०-१९५० पर्यंत दफ्तरातली लिपी मोडी होती. अजून ही काही सातबारे मोडी मध्ये असतात. इंगजी कर्सिव या संकल्पनेशी साधर्म्य. तर ती मोडी कुठून आले? पूर्वी काय देवनागरी नव्हती?

फार फार पूर्वी महाराष्ट्रात यादव म्हणून राजे होऊन गेले. इसवी सन १०००-१३०० च्या आसपास. ज्ञानेश्वरांच्या ही आधीपासून ते होते. त्यांची राजधानी देवगिरी. त्यातल्या एका राजाच्या दरबारात एक हेमाद्री पंत म्हणून प्रधान होता. त्याने महाराष्ट्राला ३ गोष्टी दिली असे म्हणतात. एक म्हणजे बाजरी. ती त्याने महाराष्ट्रात प्रथम आणली. दुसरे म्हणजे बिन चुन्याचे घर. तो स्वतः वास्तुरचनाकार होता, हेमाडपंती वाडे/मंदिरे महाराष्ट्रात अजून ही काही ठिकाणी पाहायला मिळतात. महालक्ष्मी देवी ला महाराष्ट्र फेमस त्यानेच केले.(!!) आणि मुख्य म्हणजे ज्यासाठी त्याचा उल्लेख इथे आला ती गोष्ट – मोडी लिपी. त्याने ती तयार केली असे काही म्हणतात तर काही म्हणतात कि त्याने ती लंकेवरून आणली. देवनागरी मध्ये प्रत्येक अक्षर सुटे सुटे असल्याने शासकीय कारभार हाकताना पत्रे लिहिण्यास वेळ फार जातो यावरच हा तोडगा…आणि तो भलताच लोकप्रिय झाला. त्यानंतर ती लिपी आपण ७०० वर्ष वापरली…!! काय होते एवढे त्यात? प्रत्येक शब्दावर वेगळी रेघ मारायची गरज नाही. एका ओळीला एक रेष. परत लपेट मारून मागचे अक्षर पुढच्याला आणि मागचा शब्द त्याच्या पुढच्या शब्दाला जोडायचा. म्हणजे ओळीचा सुरुवातीला पेन टेकवले कि डायरेक्ट शेवटीच उचलायचे. Short Hand च म्हणा ना मराठीतील…पण गम्मत अशी कि इतिहासात मोडी वाला कोणी पाणिनी झाला नाही. त्यामुळे अजूनही वाचताना बऱ्याचदा डोळे फिरतात..:)

या झाल्या लिपी बनवणाऱ्याच्या कथा. तशाच जुन्या लिप्या ज्या कि विस्मरणात गेल्या आहेत त्यांचा अर्थ लावणाऱ्या पण छान छान गोष्टी आहेत. जसा कि जेम्स प्रिन्सेप घ्या. ही वल्ली एकोणीसाव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीमुळे भारतात आली आणि कित्येक शतके कोणालाही कळत नसलेले मात्र सगळ्यांना माहित असलेले अशोक स्तंभ त्यावरच्या कोरीव शब्दांचा अर्थ लावून दिला. आता आपण त्याला सम्राट अशोक कालीन ब्राह्मी लिपी म्हणतो. त्यामुळे इतिहासाचे एक नवेच दालन उघडले.  एक एक लोक काय अचाट असतात….

इतिहासात अशा अनेक घटना आहेत, असतात छोट्याश्या. पण ज्याचा समाजावर, लोकांवर, त्यांच्या राहणीमानावर कायमचा परिणाम होतो. गमतीशीर असतात.

Advertisements

One thought on “शब्दप्रभू वाचीवीर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s