दिसामाजी काहीतरी

प्रवर्ग: ह्युमरस – हिलारीयस

नवीन फेअर एंड लवली जाहिरात…!!!

इस्कुल के टेम पे, आना गोरी डेम पे….

इस्कुल के टेम पे, आना गोरी डेम पे…. अनेक गाणी अशी असतात. काहीच मटेरीअल नसते पण कितीतरी वेळा पाहून हसत बसतो. कधीकाळी गाजलेली सुट्टा, एक्स.एल. कि लडकिया वगैरे गाणी असोत किंवा द्राविडी हिरोंच्या चित्रपटातल्या करामती. त्यातलेच अजून एक हे इस्कुल के टेम पे… क्लासिक क्लासिक म्हणतात ते हेच. यासमोर हेलन-मधुबाला-झीनत अमान-करीना पण झक मारतील. कोण तो देव आनंद, शशी कपूर, जीन्तेंद्र, जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी आणि बाकी सगळे चोकलेट हिरो याच्यासमोर हात जोडून उभे राहतील… ‘तौफा मांगा तौफा दुंगा, जान मांगा जान दुंगा’ …. अहाहा काय ते शब्द. अगदी माणकासारखे. स्वानंद किरकिरे आणि प्रसून जोशी झक मारतील, राजीव मेनन आणि संतोष सिवन आपापले कॅमेरे बंद करतील… एस डी पण चक्रावून जाईल आणि लता पण आपले गाणे सोडून शांतपणे याचा आस्वाद घेईल….

कारण मी कधीच रिस्क घेत नाही…..

प्रचंड महाप्रचंड अद्भुत असे काही नाही पण मजेशीर, विनोदी, हास्यरसातली एक बेश्ट रचना आहे. मनापासून आवडली. कोणी लिहिली आहे खरंच माहित नाही तेव्हा, बा पोएटा; तुझ्या अनुल्लेखाबद्दल माफ कर. पण हे जे काही रसायन आहे ते उत्कृष्ट जमले आहे. चढत्या वाढत्या आलेखाने…वाचकहो, वाचाच…

दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही, मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयपाक करत असते, शेल्फ मधील भांड्यांचा आवाज येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, शिवाजी महाराज फोटोतून बघत असतात, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. वापरत नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो, चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो आणि अर्थात बाटलीही पुन्हा काळ्या कापतात ठेवतो, शिवाजी महाराज मंद हसतात, स्वैपाकघरात डोकावून बघतो, बायको कणीकच मळत असते, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी: जाधवांच्या मुलीच्या लग्नच जमलं का ग? ती: छे, दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ..

मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज येतो, बाटली मात्र मी हळूच काढतो, वापरत नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो, पटकन पेगचा आस्वाद घेतो आणि बाटली धुवून मोरीत ठेवतो, काला ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही कारण मी कधी रिस्क घेत नाही, मी: जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झाले नाही? ती: नाही काय, अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे. मी: (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा… मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो, मात्र कपाटाची जागा आपोआप बदलली असते, फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो, शिवाजी महाराज मोठ्याने हसतात, फळी कणकेवर ठेवून शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो, बायको शेगडीवर मोरी ठेवत असते, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही…मी: (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभ कापून टाकेन तुझी…ती: उगीच कटकट नका करू, बाहेर जाऊन गप पडा.

मी कानाकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मारतो, मोरी धुवून फळीवर ठेवतो, बायको माझ्याकडे बघत हसत असते, शिवाजी महाराजांचा स्वैपाक चालूच असतो, पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही कारण मी कधीच रिस्क घेत नाही…मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं म्हणे? ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा…मी परत स्वैपाक घरात जातो, हळूच फळीवर जाऊन बसतो, शेगडीही फळीवरच असते, बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो, मी डोकावून बघतो – बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते, या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही…अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत… जाधवांचा स्वैपाक होईपर्यंत मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो, कारण मी कधीच रिस्क घेत नाही……

- तळीराम

जागतिक अर्थकारण

पारंपारिक अर्थकारण - तुमच्याकडे २ गायी आहेत. त्यातली एक तुम्ही विकता आणि बैल घेता. त्याच्या मल्टीपल वर आरामात राहून तुम्ही रिटायर होता.

भारतीय अर्थकारण - तुमच्याकडे २ गायी आहेत. तुम्ही त्यांची पूजा करता.

पाकिस्तानी अर्थकारण - तुमच्याकडे एकही गाय नाही. भारतीय गायी तुमच्या आहेत असं तुम्ही दावा करता. मग अनेरीकेकडे पैसे, चीनकडे शस्त्रे, इंग्लंडकडे विमाने, इटलीकडे यंत्रे, जर्मनीकडे तंत्रज्ञान, फ्रान्सकडे पाणबुड्या, स्वित्झर्लंडकडे कर्ज, रशियाकडे ड्रग्ज असे काय काय मागता आणि वर जगाकडून आपले शोषण होते म्हणून बोंबलत बसता.

अमेरिकन अर्थकारण - तुमच्याकडे २ गायी आहेत. एकीला विकून टाकता, आणि दुसरीला चौपट दुध देण्यास भाग पडता. आणि मग ती मेली की अचंबित होऊन कोण एका गायी असलेल्या देशावर आरोप ठेवता आणि साहजिकच तो देश साऱ्या जगाला धोका असतो. मग त्याच्याशी युद्धा पुकारून बळजबरीने त्या गायी हिसकावून घेता.

फ्रेंच अर्थकारण – तुमच्याकडे २ गायी आहेत. पण तुम्हाला ३ पाहिजेत म्हणून तुम्ही संपावर जाता…

जर्मन अर्थकारण – तुमच्याकडे २ गायी आहेत. तुम्ही असे काही तंत्रज्ञान विकसित करता की त्या गायी १०० वर्षे जगातील, महिन्यातून एकदाच खातील आणि स्वताहून दुध देतील.

ब्रिटीश अर्थकारण – तुमच्याकडे २ गायी आहेत. Both of them are mad.

इटालियन अर्थकारण – तुमच्याकडे २ गायी आहेत. पण त्या आहेत कुठे हेच तुम्हाला मुळी ठावूक नाही. तुम्ही जेवायला निघून जाता.

स्विस अर्थकारण – तुमच्याकडे ५००० गायी आहेत. त्यातली एकही तुमची नाही. त्यांचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही इतरांना पैसे आकारता.

जपानी अर्थकारण – तुमच्याकडे २ गायी आहेत. तुम्ही त्यांना रिडीझाइन करता जेणेकरून त्या एक दशांश आकाराच्या होतील, आणि वीसपट दुध देतील. मग त्यांच्या छोट्या छोट्या तसबिरी आणि प्रतिकृती बनवून जगभर विकता…

चीनी अर्थकारण – तुमच्याकडे २ गायी आहेत. ३०० लोक त्यांच्यावर उपजीविका करत आहेत. आणि तुम्ही संपूर्ण रोजगार असल्याची घोषणा करता. खरं आकडा कुणी सांगायचा प्रयत्न केला तर त्याला गजाआड करता.

रशियन अर्थकारण – तुमच्याकडे २ गायी आहेत. तुम्ही त्यांना मोजायला जाता तर त्या ५ निघतात. परत मोजता तर ४२ असतात. परत एकदा प्रयत्न करता तर १७ होतात. मग शेवटी कंटाळून व्होडकाची दुसरी बाटली रिचवायला निघून जाता…

(Source – Old newspaper cutting)

उ. अमजद अली खानांचे ख्रिसमसि तुकडे

याला काय म्हणायचे? ख्रिसमस जिंगल्स आणि अमजद अली खान साहेब? नाट्य संगीत स्टेजवर गायला लागले तेव्हा लोकांनी काय गोंधळ केला होता…आणि ही तर कमालच आहे बुवा…मला तर त्या आयोजकांची कशी फजिती झाली असेल याचा विचार करवत नाही… अमजद अली खानांना बोलावले आणि काय…तर इंग्रजी पोएम. बदल पाहिजे, नाविन्याचे वारे पाहिजेत सगळे ठीक आहे हो…पण हे मानवणे खरंच अवघड आहे….

(पूर्ण व्हिडियो इथे पाहायला मिळेल – http://video.webindia123.com/music/ustadamjadalikhan/index.htm)

Follow

Get every new post delivered to your Inbox.