दिसामाजी काहीतरी

प्रवर्ग: वैचारिक

जनाब फैजल शाह साहब

आदाब. शोमा खूब हास्तिद? मन खुबम.

बड़े दिन बाद अच्छा, कुछ खास सुनने मिला. जनाब फैजल शाह, जिन्होंने आय.ए.एस. में पिछले साल अव्वल नंबर लाया उनके कुछ अलफ़ाज़ मै यहाँ आपके सामने पेशे-ए-ख़िदमत करना चाहूँगा. आप वैसे तो कश्मिरसे है और पेशेसे डॉक्टर है. लेकिन आपने उर्दू लिटरेचर लेकर आय.ए.एस. में टॉप किया. एक मुसलमान और एक कश्मीरी होना बिलकुल इसके आड़े नहीं आया. जहा काबिलीयत और जुनून है वहा मंज़र तक पहुँचाना सिर्फ कुछ अर्से का सवाल है इसकी आप एक मिसाल हो. आप अल्लामा इकबालके बड़े कायल हो. जिस लताफ़त से इक़बाल के सुखन आपके ज़हनसे निकलकर जमुरियापर बरस पड़ते है उसे देखकर तो हमारे रोंगटे खड़े हो गए.

सितारों के आगे जहाँ और भी हैं अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं
तही ज़िन्दगी से नहीं ये फ़ज़ायें यहाँ सैकड़ों कारवाँ और भी हैं
क़ना’अत न कर आलम-ए-रंग-ओ-बू पर चमन और भी, आशियाँ और भी हैं
अगर खो गया एक नशेमन तो क्या ग़म मक़ामात-ए-आह-ओ-फ़ुग़ाँ और भी हैं
तू शाहीं है परवाज़ है काम तेरा तेरे सामने आसमाँ और भी हैं
इसी रोज़-ओ-शब में उलझ कर न रह जा के तेरे ज़मीन-ओ-मकाँ और भी हैं
गए दिन के तन्हा था मैं अंजुमन में यहाँ अब मेरे राज़दाँ और भी हैं

हाज़िर है उनके हर्फ़ उनिके आवाज में जो आपमे गालिबन नार-ए-ज़ज्बात पैदा करेंगे –

लातूरकरांचे अभिनंदन…

आत्ताच १२ वीचा निकाल लागला. या निकालातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘लातूर Pattern’  साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याची पहिल्या क्रमांकावरून झालेली उचलबांगडी आणि ती सुद्धा साधीसुधी नाही तर एकदम शेवटच्या स्थानावर. मागच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण होते ८५.५१ %  आणि ह्या वेळेस ते आहे ४४.८१ %….!! आता वर्षभरात विद्यार्थ्याची पातळी काही इतकी खालावत नाही. या साठी जबाबदार सर्वात मोठा घटक म्हणजे लातूरच्या आणि  महत्वाच्या नांदेडच्या जिल्लाधिकारी आणि करमचार्यानी घेतलेले ‘Tough Anti Exam Malpractices Measures ‘ बाकीच्या ७ बोर्डाचे निकाल ८० % च्या आसपास आहेत आणि फक्त लातूर चा ४४ %. यात लातूर बोर्ड गंडलेले आहे असे समजावे की बाकीच्यांना ‘Reality check ची गरज  आहे असं समजावे..?

इतर महाराष्ट्रात काही फार दिव्य परिस्थिती आहे असं वाटत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतो. आता लातूरकरांना कमी निकालाबद्दल फैलावर घेतलं जाते की इतरांना ठोस पावले न उचलण्याबद्दल हे पाहायला हवे. महाराष्ट्र बोर्डाने निकाल Online लावून फार मोठी सोय केली आहे, आणि त्यात सर्वात मस्त गोष्ट म्हणजे भरपूर Statistics उपलब्ध करून दिले आहेत. लातूरच्या या निकालावरून जरी आपल्या शिक्षण पद्धतीचे खरे स्वरूप बाहेर येऊन वाभाडे निघाले असतील तरी परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा पाउल म्हणता येईल. बाकीच्यांना सुद्धा असे करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात पास होण्यासठी अभ्यास करावा लागतो अशी भावना तरी निर्माण होईल.भविष्यासाठी आपले बोर्ड कुठल्या वाटेने जातात हे महत्वाचे ठरेल. ईश्वर त्यांना योग्य (कठीण असला तरी ) मार्गाने चालांयची सुबुद्धी देवो .

( ह्या पार्श्वभूमीवर ८ वी पर्यंत परीक्षा रद्द करण्याचा निर्णयाबद्दल विचार करतोय.. फारसे आशावादी चित्र दिसत नाहीये)
१२ वी results आणि Statistics इथे पाहू शकतात http://mahresult.nic.in/ येथे विभाग निहाय statistics पण उपलब्ध आहेत.

- स्मित गाडे

अथातो-ज्ञानजिज्ञासा

पूर्वी एकदा शिक्षण-पद्धतीवर लेख-मालिका सुरु करायचा प्रयत्न केला होता. सुरुवात केली. २ आर्टिकल्स लिहिले. शिक्षण? की विनोद?? आणि लॉजिक ते शिक्षण मार्गे झुरळ.. पण ती मालिका पूर्ण करायचे मनसुबे अजून तसेच हवेत आहेत. पण आत्ताच चंद्रशेखर यांच्या ब्लॉग वर त्याच विषयावर सुंदर विवेचन सापडले.  हे आर्टिकल त्यांच्या ‘अक्षरधूळ’ ब्लॉग वरून पूर्व-परवानगीने साभार. मूळ ब्लॉगला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा आणि मूळ ब्लॉग पोस्ट इथे वाचता येईल.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील छोट्या वयाच्या विद्यार्थीचमूसाठी एक(त्यांच्या मताने एक मोठी भेट) घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, सहा ते चौदा या वयोगटातील कोणत्याही विद्यार्थ्याला (अर्थातच विद्यार्थिनीलाही) परिक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपयश आले म्हणून आहे त्याच इयत्तेत ठेवण्यात येणार नाही. याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना परिक्षाच द्यावी लागणार नाही.त्यांना पूर्वी प्रमाणेच सर्व परिक्षा द्याव्या लागतील. मात्र जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत असे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांना विशेष शिकवणी देण्यात येईल व त्यांचा अभ्यास तयार करून घेण्यात येईल. सध्याच्या शालेय शिक्षणाबद्दल एक मोठा आक्षेप घेतला जातो की हे शिक्षण फक्त परीक्षार्थी बनले आहे व मला वाटते की हा आक्षेप बहुतांशी सत्यही आहे.शालेय शिक्षणातून परीक्षांना आलेले अवाजवी महत्व कमी होऊन ते जास्त प्रमाणात ज्ञानार्थी व्हावे या उद्देशासाठी म्हणून जर हे पाऊल उचलले गेले असले तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे असे मला वाटते.

मागच्या वर्षी, शालान्त परीक्षांच्या मध्यवर्ती मंडळाने (CBSE), हे मंडळ घेत असलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेमधे, गुण न दाखवता फक्त ग्रेड्स दर्शविल्या जातील अशी घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या एकूण गुणांमध्ये, एक, दोन किंवा अगदी पाच, दहा गुणांचा फरक असतो अशा सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमधे, तसे बघायला गेले तर काहीच फरक नसतो. परंतु आपल्याला दोन गुण कमी मिळाले या कल्पनेने या मुलांना अतिशय ताण तणावातून जावे लागते. शालेय शिक्षण हे त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून द्यायचे असते. तसे न होता, सध्या दिले जाणारे शालेय शिक्षण म्हणजे त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण मिळवून देणारे कारखाने बनले आहेत ही वस्तुस्थिती आहे यात शंकाच नाही. त्या दृष्टीने CBSE ने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे असेच मला म्हणावेसे वाटते.

परंतु वर निर्देश केलेले दोन्ही शासकीय निर्णय, प्रत्यक्षातील मूळ प्रश्नाला लावलेल्या तात्पुरत्या मलमपट्या आहेत असेच म्हणावेसे वाटते. हा मूळ प्रश्न काय आहे हे शोधण्यासाठी जरा खोलात जाऊन, शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. नव्या पिढीला जे ज्ञान आपण शिक्षण म्हणून देऊ इच्छितो ते ज्ञान आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी स्वानुभवांतून आणि विचारातून संग्रहित व संकलित केलेले आहे. पुढच्या पिढ्यांना चाकाचा शोध पुन्हा पुन्हा लावावा लागू नये यासाठी मागच्या पिढ्यांनी संग्रहित व संकलित केलेले हे ज्ञान, शिक्षण म्हणून पुढच्या पिढीला दिले जाते. संत रामदासांनी शिक्षणाचा हा मूल उद्देश “जे जे आपणांस ठावे। ते ते इतरां सांगावे! शहाणे करून सोडावेसकल जन ” या शब्दात मोठ्या समर्थपणे सांगितला आहे.

नव्या पिढीला शहाणे करून सोडावे हा जर शिक्षणाचा उद्देश असला तर मग सध्याच्या शिक्षणाची ही परिक्षार्थी वृत्ती उपटली तरी कोठून? असा प्रश्न साहजिकच मनासमोर येतो. प्राचीन भारतात, गुरुगृही राहून ज्ञान संपादन करण्याची प्रथा होती. असे गुरु विद्यार्थ्याची परिक्षा नक्कीच घेत असले पाहिजेत. पण एखादा विद्यार्थी ज्ञानी बनून गुरूगृहावरून जेंव्हा परत येत असे तेंव्हा जे काय ज्ञान प्राप्त करायचे ते त्याने प्राप्त केल्यामुळे तो स्वगृही परत येत असे. परिक्षा उत्तीर्ण झाला म्हणून नव्हे. नालंदा, तक्षशीला सारख्या विद्यापीठात एखादा विद्यार्थी जेंव्हा ज्ञानप्राप्तीसाठी जात असे तेंव्हा त्याने ज्ञान प्राप्त केले की नाही हे बघण्यासाठी त्याची परिक्षा इतर पंडित जरूर घेत. परंतु त्या विद्यापीठामधे दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा उद्देश, त्या विद्यार्थ्याने ज्ञानप्राप्ती करावी हा असे, त्याने कोणत्या तरी मार्गाने व कशीतरी परिक्षा उत्तीर्ण व्हावे हा नसे.

प्राचीन भारतामधल्या या शिक्षण पद्धतीमधे, आमुलाग्र बदल घडवून आणला एका इंग्रज अधिकार्‍याने. थॉमस बॅबिन्ग्टन मॅकले (1800-1859) हा एक कवी, इतिहासतज्ञ व राजकारणी असलेला ब्रिटिश अधिकारी . 1833 साली,जेंव्हा ब्रिटिश संसदेने ‘भारतीय शासन विधेयक 1833′ मंजूर केले तेंव्हा तो लॉर्ड ग्रे याच्या अध्यक्षपदाखाली असलेल्या नियामक मंडळाचा सचीव होता. या मॅकलेने दोन वेळा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेली वक्तव्ये ब्रिटिश संसदेसमोर केली. यापैकी पहिले वक्तव्य त्याने 1833 मधे केले होते. ब्रिटिश राजवटीच्या भारतातील प्राधान्यांपैकी भारतीयांना शिक्षण देणे हे एक महत्वाचे प्राधान्य असल्याचे मॅकलेने या वक्तव्यात सांगितले होते.मेकॅलेच्या विचारांप्रमाणे, भारतीयांना अडाणी व इंग्लंडवर कायम परावलंबी ठेवणे हे ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीने पुढे अत्यंत अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे युरोपियन संस्कृतीची जी मूल्ये आहेत ती भारतातील समाजात रुजवणे अतिशय आवश्यक आहे व यासाठी त्यांना योग्य शिक्षण देऊन स्वावलंबी करणे महत्वाचे आहे.

मॅकलेच्या या विचारांत काही फारसे आक्षेपार्ह आहे असे मला तरी वाटत नाही. त्याने या बाबतीत इंग्लंडचेच दिलेले उदाहरण अगदी योग्य वाटते. पंधराव्या किंवा सोळाव्या शतकामधे, जेंव्हा इंग्लंडमधे सॅक्सन व नॉर्मन यांच्यातील लढाया चालू होत्या त्या कालात, ग्रीक व रोमन तत्ववेत्यांच्या विचाराचा अभ्यास इंग्लंडमधे चालू झाला. मॅकलेच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटिश पंडितांनी इंग्लंडमधल्या जुन्या ग्रंथावरच फक्त लक्ष केंद्रित केले असते व ग्रीक किंवा रोमन तत्ववेत्यांचे विचार त्याज्य समजले असते तर इंग्लंडला सध्याच्या वैभवशाली परिस्थितीत येणे शक्यच झाले नसते.याच पद्धतीने भारताला पुढे समर्थ बनवायचे असले तर भारतीयांना सर्व आधुनिक शास्त्रे, तर्कशास्त्र, तत्वज्ञान यांचे ज्ञान प्राप्त करून दिले पाहिजे.

1835 मधे मॅकलेने ब्रिटिश संसदेसमोर एक छोटे वक्तव्य केले. या वक्तव्यात भारतावर अतिशय दूरगामी परिणाम होतील असे दोन महत्वाचे मुद्दे होते. त्यापैकी पहिला मुद्दा भारतात दिलेल्या शिक्षणाचे माध्यम कोणते असावे यासंबंधी आहे. हे माध्यम इंग्रजी भाषाच असले पाहिजे याबाबत मॅकले अतिशय आग्रही होता व त्याची कारणमीमांसा त्याने आपल्या भाषणात केली आहे. या भाषणातला दुसरा मुद्दा आपल्या प्रस्तुत लेखासाठी अतिशय महत्वाचा आहे.मेकॅले म्हणतो की ” आपल्या मर्यादित साधन संपत्तीत, इतक्या मोठ्या लोकसंख्येला शिकवणे आपल्याला अशक्य आहे. या कारणामुळेच आपण समाजामधे एक असा सुशिक्षित वर्ग तयार करण्याची गरज आहे की जो वर्ग आपण आणि आपण राज्य करीत असलेले कोट्यावधी लोक यांच्यामधे परस्पर संवाद साधू शकेल. समाजातील हा वर्ग पूर्णपणे भारतीय रक्ताचा व वर्णाचा असेल. परंतु त्याच्या आवडी-निवडी, मते, मॉरल्स, व बुद्धीमत्ता ही पूर्णपणे ब्रिटिश असतील. आपण नंतर या वर्गाकडे भारतातील भाषांमधे सुधारणा करणे, पाश्चिमात्य जगतातील शास्त्रीय कल्पनांनी त्या भाषा समृद्ध करणे व हळू हळू एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ज्ञान देऊ शकतील असा बदल त्यांच्यात घडवून आणणे ही कामे सोपवू शकतो. “

“ It is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.”

मेकॅलेच्या या भाषणावरून हे स्पष्ट होते की ब्रिटिश नोकरशाहीला मदत करतील असे लाचार व हांजीहांजी करणारे बाबू लोक फक्त तयार करेल अशी शिक्षण पद्धती निर्माण करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात कधीच नव्हती. परंतु सिंहाचा पुतळा करायला जावे व मांजर बनावे तसे इंग्रजांनी भारतात रूढ केलेल्या शिक्षण प्रणालीचे बहुदा शेवटी झाले असावे. मेकॅलेला अपेक्षित असा ब्राऊन साहेबांचा वर्ग समाजात निर्माण झाला खरा पण या वर्गाने समाजाचे अपेक्षित प्रबोधन न करता तो आत्मकेंद्री बनत गेला. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती नष्ट होऊन, मेकॅलेची ब्राऊन साहेब निर्माण करणारी शिक्षण पद्धती रूढ झाली. पण या पद्धतीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांचे, मेकॅलेला अपेक्षित होते तसे, समाजातील इतर घटकाशी नाते असे काही राहिलेच नाही व समाजाभिमुख न होता हे शिक्षण घेतलेले तरूण फक्त नोकरशाहीतील बाबू बनू लागले. या शिक्षण पद्धतीत ज्ञानप्राप्ती हा उद्देश न राहता सरकारी नोकरीची पात्रता त्या विद्यार्थ्याला मिळवून देणे हाच त्या शिक्षण पद्धतीचा एकमेव उद्देश बनला. ही सरकारी नोकरीची पात्रता या विद्यार्थ्याला आली आहे किंवा नाही हे त्याची एक परिक्षा घेतली की समजत असल्याने शालान्त परिक्षेची कल्पना निघाली व संपूर्ण शिक्षण पद्धतीचे ध्येय ज्ञानप्राप्ती हे न राहता शालान्त परिक्षेचे प्रशस्तिपत्रक प्राप्त करून देणे हे झाले.

लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर वगैरे सारख्या राष्ट्रप्रेमी तरूणांना, मेकॅलेच्या सरकारी शाळांच्या शिक्षण पद्धती मधील ही तृटी लक्षात आल्यावर न्यू इंग्लिश स्कूल सारख्या शाळा निघाल्या. या शाळांच्यातून बाहेर पडणार्‍या तरूण वर्गाच्या कल्पना जरी थोड्याफार भिन्न असल्या तरी शालान्त परिक्षेचे जू या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर तसेच राहिले. मी प्राथमिक शाळेत व माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले तो काळ पन्नासच्या दशकातला होता. स्वातंत्र्य मिळून थोडीच वर्षे झाली होती. त्यामुळे एकूण शिक्षण पद्धती बहुतेक इंग्रजांच्या कालातीलच होती. फार थोडे बदल झाले होते. तरीही सध्याच्या शिक्षण पद्धती बरोबर तुलना केली तर मला हे जाणवते की 11वीच्या वर्षात जाईपर्यंत परिक्षेचे ओझे आमच्या खांद्यावर कधीच नव्हते. शालेय वर्षात 4 परिक्षा होत असत. परीक्षेच्या आधी आठवडाभर आणि वार्षिक परीक्षेच्या आधी पंधरा दिवस जादा अभ्यास केला की पुरत असे. प्रत्येक परिक्षेत खूप यश मिळवलेच पाहिजे अशी बहुदा कोणत्याच पालकाची अपेक्षा नसल्याने, बर्‍यापैकी गुण मिळाले की भागत असे. त्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा, शाळेमधली वर्षे परीक्षेच्या ताणतणावांपासून मुक्त अशीच गेली. आमचे शास्त्र विषयाचे एक शिक्षक अतिशय रस घेऊन शिकवत. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे ते संपूर्ण निरसन करत. माझ्या आठवणीप्रमाणे या शिक्षकाच्या तासाची, शास्त्रासारखा नीरस विषय असूनही, आम्ही आतुरतेने वाट बघत असू. 11वीच्या वर्षात ज्या वेळेस, शास्त्रीय,भौगोलिक किंवा ऐतिहासिक कारणे द्या हे परिक्षेतले प्रश्न आमचा पीछा करू लागले त्या क्षणी या विषयांमधले आमचे कुतुहल संपल्यासारखे झाले.

कोणत्याही अर्भकाला आसमंतातील प्रत्येक गोष्टीबद्दल अपार कुतुहल किंवा जिज्ञासा असते. प्रथमत: ती गोष्ट हाताळून,त्याची चव घेऊन ते बालक त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या कल्पना ठरवते. याच पद्धतीचे कुतुहल शाळेत जाणार्‍या बालकालाही वाटत रहाते. या त्याच्या जिज्ञासेतूनच प्रत्यक्षात हे बालक ज्ञान प्राप्ती करत असते. त्या बालकाच्या नशीबाने त्याला एखादी चांगली शिक्षिका मिळाली तर अल्पावधीत ते बालक एवढे विपुल ज्ञान प्राप्त करू शकते की मन चकित होते. प्ले ग्रुप मधे शिकणार्‍या माझ्या नातीला मिस जून नावाची अशी एक शिक्षिका मागच्या वर्षी लाभली होती. त्या वर्षात तिचे सर्वसामान्य ज्ञान अक्षरश: मन स्तिमित करणार्‍या गतीने वाढलेले मला स्मरते.

शाळेत जाणार्‍या बालकांना परिक्षेचा गती रोधक एकदा लागला की त्यांची जिज्ञासा शिक्षक, पालक यांच्याकडून पद्धतशीर दाबली जाते. परिक्षेत विचारण्याची शक्यता आहे तेवढेच शिकणे. बाकीच्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या! हे तत्वज्ञान मुलाच्या डोक्यावर बसलेच की प्रथम त्याची जिज्ञासा व त्या नंतर त्यातून होणारी ज्ञानप्राप्ती याला काही महत्त्वच उरत नाही. पुण्यात शिकत असलेल्या माझ्या नातवंडांच्या सुदैवाने, इयत्ता 5वी पर्यंत त्यांना परिक्षा द्यावीच लागणार नाहीये. परंतु परिक्षेचे ओझे या छोट्या मुलांच्या खांद्यावरून उतरवून टाकणार्‍या अशा शाळा विरळाच आहेत. इतिहास किंवा भूगोल हे शाळेत बहुतेकांना अत्यंत अप्रिय वाटणारे विषय, प्रत्यक्षात किती रोचक आहेत हे जिज्ञासा दाबली गेलेल्या या मुलांना दुर्दैवाने कधी कळतच नाही.

मेकॅलेच्या बाबू तयार करणार्‍या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गेल्या पन्नास साठ वर्षात अनेक प्रयत्न करण्यात आले व चालू आहेत. परंतु प्रत्यक्षात असे दिसते की मुलांच्या डोक्यावरचे परिक्षांचे ओझे वाढतच चालले आहे. आमच्या वेळच्या चार परिक्षा सध्या आहेतच पण त्यात आता युनिट टेस्ट्स अधिक आल्या. प्रत्येक मुलाने परिक्षेत टोकाचे सुयश मिळवलेच पाहिजे या पालकांच्या दुराग्रहामुळे शाळेबरोबर शिकवण्या, क्लासेस सुरू झाले. या क्लासेसच्या परिक्षा सुरू झाल्या. त्या शिवाय शिष्यवृत्ती परिक्षा, जैन गणिताच्या परिक्षा, मुलांच्या डोक्यावरचे ओझे वाढतेच आहे.

शालान्त परिक्षेत गुण न देता फक्त ग्रेड देणे किंवा प्राथमिक शाळेतील मुलाला ते उत्तीर्ण कसे होईल हे बघणे या सारख्या सुधारणा नक्कीच स्वागतार्ह आहेत. परंतु या परिक्षांमुळे मुलांच्या ज्ञानजिज्ञासेचे जे खच्चीकरण होते आहे त्यात काहीतरी सुधारणा झाल्याशिवाय शालेय शिक्षणाचा मुलाच्या मनात ज्ञानाची एक बैठक निर्माण करण्याचा जो मूळ हेतू आहे तो कधीच साध्य होणार नाही असे मला वाटते. ही मूळ बैठकच जर मनात तयार नसली तर त्या बैठकीवरून आपली सृजनशीलता वापरून तो विद्यार्थी पुढचे उड्डाण करणार तरी कसा? आणि कधी?

महाराष्ट्र – रोमन कवी – चीनी म्हण

किती महाराष्ट्र गीते, किती अभिमान गीते, इतिहासाचे गोडवे आणि महानतेचे दाखले… काय काय अन काय काय…. आज काल तर ही सगळी सर्कसच वाटते. ज्युवेनाल नामक रोमन कवी होता.. घाबरू नका, त्याबद्दल लिहित नाहीये. पण त्याचे एक वाक्य जगात गाजेलेले आहे.. जसे की शेक्सपियर चे what is in the name…. तसे याचे, All people need is bread and circus… राजकारणी आणि सत्ताधारी हे जनतेला कसे नाचवतात त्याचे सगळ्यात नग्न आणि साधे वाक्य… खायला अन्न द्या आणि चर्चा करायला सर्कस द्या.. मग जनता काही विचारात नाही कोणाला.. बाकी सगळे रान सत्ताधाऱ्यांचे… आता तर खायची पण व्यवस्था होईल की नाही ते बघत नाहीत.. फक्त अस्मिता-अभिमान-इतिहास-परंपरा या सर्कसी जोरदार चालू आहेत… आणि आपल्याला पण भावनेने भारीत व्हायला आवडते.

ते ही जाऊ दे.. १ मेंच्या दिवशी तरी बरे बोलावे.. पण लेख मुळीच कोरडे ओढण्यावर नाहीये… ते तर आयुष्यभर आपण करीतच असतो. विचार करता करता एक गम्मत सापडली. समांतर. अजून एक समांतर सापडले. पण एकदम विचित्र. वर म्हटल्याप्रमाणे All people need is bread and circus. यात अन्न ही भौतिक गरज आहे आणि मन गुंतवायला सर्कसीची आवश्यकता.. पण ती सर्कस कोण प्रोव्हाईड करते? ज्यांना इतरेजांना इतरत्र गुंतवून आपले काम साधायचे असतात ते. म्हणजे सर्कसीच आवश्यकता तर तुम्हा-आम्हाला आहे. तमाशा पाहिजेच. कारण ती एक बेसिक गरज आहे. पण कोणी कोणत्या सर्कस मध्ये मन गुंतावावे, आयुष्य घालवावे हे ज्याने त्याने न ठरवता असे एनफोर्स्ड असते. पण जर प्रत्येकांनी आपली आपली आवडीनुसार निवड केली तर? तर मग एक चीनी म्हण आठवते. यात पण कृती तीच आहे पण दृष्टीकोन १८० अंशातून बदलेला आहे. अन्नाची गरज जगण्यासाठी आणि सर्कशीची गरज मन गुंतवण्यासाठी असे न ठेवता ती म्हण म्हणते – जर तुमच्याकडे २ पैसे असतील तर एका पैश्याचे अन्न आणा आणि एकाचे फूल.. अन्न तुम्हाला जगवेल आणि फूल तुम्हाला का जगायचे ते सांगेल… आहे की नाही ते फूल म्हणजे आपण आपल्यासाठी निवडलेली सर्कस?

महु-पुराण..!

काही माणसे, काही प्रसंग, काही ठिकाणे… उगीच कारण नसताना मनात घर करून असतात. त्यांच्या बाबतीत काही स्पेशल असते असे नाही, पण असतात. काही वेळा काही घटना घडल्या म्हणून तर काही वेळा का नाही घडल्या म्हणून…

एकदा मागे मध्ये-प्रदेश दौरा करून आलो होतो. आपण ज्याला ट्रीप म्हणतो ती ९९% वेळा अगदी तिऱ्हाईत, परदेशी, अनोळखी, अलिप्त व्यक्तीसारखी त्या प्रदेशाला दिलेली भेट असते. ना तिथले लोक कळतात ना तिथली संस्कृती. काचेच्या अलीकडून पाहिल्यासारखे अंगावर काही शिंतोडे ना उडवून देता जर त्या भागाला भेट दिली तर पोकळ समाधानच मिळते. ती सहल मग फोटो काढण्यासाठी आणि इतरांना ‘मी तिथे जाऊन आलो’ सांगून फुशारक्या मारण्यासाठी होऊन जाते. किंवा स्वतःलाच ‘मी जाऊन आलो बर का, आता छान वाटून घे’ असे समजावण्यासाठीची ती सहल. रोजच्या आयुष्यातून बदल आणि विरंगुळा म्हणून ठीक आहे पण त्याने तुम्ही त्या भागल खरी भेट देत नाही. स्वतःपासून पळण्यासाठी आपण कामात मग्न असतो आणि कामापासून पळण्यासाठी इतर लोकांमध्ये आणि अशा ट्रिप्स मध्ये. असो. उगीच फिलॉसॉफी देणे आपला धंदाच आहे.

तर ट्रीपला गेलो होतो. इंदौर, उज्जैन, मांडवगड, ओंकारेश्वर वगैरे बघून आलो. नवा प्रदेश होतं, नवे लोक होते आणि एकंदरीतच भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भूगोलाचे ज्ञान कमी असल्याने खूप नव्या गोष्टी कळल्या. सांदिपनी आश्रम असो नाहीतर मांडू… खूप भारी होते सगळे. नंतर वर्षभराने पुन्हा एकदा ‘बहा’ स्पर्धेच्या निमित्ताने पिथमपूर ला जाणे झाले. दोन्ही वेळेस महू नावाचे गाव लागले. ११-१२वी मध्ये एक मित्र होता त्याचे बाबा आर्मी मध्ये होते आणि तेव्हा महूला स्टेशंड होते. त्यामुळे महू म्हणजे भारतीय लष्कराचे एक ठाणे एवढीच ओळख… पण परवा गुगल करता करता महूची जी जी माहिती वाचली तसा अवाकच झालो… दोनदा महू ला टच करून आलो तरी हे माहित नव्हते म्हणून वाईट पण वाटले. महू हे एक अजब रसायन च आहे… म्हणजे पुण्यासारख्या शहराला जाज्वल्य अभिमान बाळगण्यासारखा ३००-४०० वर्षांचा इतिहास असणे यात नवे काही नाही.. पण ज्या गावाचे अस्तित्व इतके पिटुकले आहे त्याचा इतिहास पण असा भरलेला आहे की काय… वाचाच वाचा..

महू ची सुरुवात होते तीच ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात… त्यापूर्वी तिथे काय होते ते माहित नाही… कंपनी सरकारचा एक तगडा अधिकारी – सर जॉन माल्कम. याचे लहानपण गेले मद्रास ला. फार्सीचा सखोल अभ्यास आणि त्यामुळेच कॉर्नवालीसने त्याची नियुक्ती त्याच्याशी रिलेटेड पदावर केली होती. (हा माणूस इतिहासकर ही आहे बर का) सगळ्यात आधी हा प्रकाशझोतात आला ते म्हणजे इंग्रज विरुद्ध टिपू सुलतान + निझाम यांच्यात झालेल्या शेवटच्या लढाईत. तिथे जोरदार पराक्रम गाजवला भाऊंनी. मग इंग्लंड ला गेला. तिथे काहीतरी नेव्ही मध्ये पराक्रम गाजवला. एक मात्र आहे, की त्या १००-२०० वर्षांमध्ये जो जो भारी इंग्रज अधिकारी होऊन गेला त्याचं काही ना काही काही कर्तृत्व नेव्ही मध्ये असतेच.. तसेच याचे पण होते. परत मद्रास ला आला.. बऱ्याच मोठ्या मोठ्या पोस्ट्स वर चढत गेला.. मुलकी आणि लष्करी दोन्ही…. रादर तेव्हा असा फरक कंपनी सरकारात तरी जास्त होते नसे… एकाच अधिकाऱ्याकडे बऱ्याचदा दोन्ही पॉवर्स असायच्या.. नशीब म्हणजे काय असते एकेकाचे.. कोणाला कुठे कुठे फिरवून आणेल सांगता येत नाही. इराणच्या इंग्रजी राजदूताची हत्या झाली आणि याला तिथे पाठवले.. तिथे राजदरबारात हे फारच रमले… वारेमाप खर्च केला. बेधुंद झाले आणि मग सगळ्यांशी भांडण करून बसले. कंपनी सरकारने परत मुंबईला बोलावले. आता काळ येतो १८००-१८१५ चा… तेव्हाचा हिंदुस्थान लक्षात घ्या… कंपनी एकेक राज्य गिळत होती. ३ इंग्रज-मराठा युद्धे, इंग्रज-शीख युद्धे, दक्षिणेतली अनेक युद्धे… संपूर्ण भारत म्हणजे रणभूमी झाला होता.. मला वाटते भारतवर्षभर स्प्रेड असलेले युद्ध १-२ दशकाच्या कालावधीत.. नि ते पण एकाच शत्रूशी.. हे पहिलेच असावे इतिहासात… अफगानिस्तान-इराण पासून म्यानमार पर्यंत आणि काश्मीर पासून श्रीलंकेपर्यंत… सगळीकडेच युद्ध-सदृश परिस्थिती… अशा वेळी माल्कम महाराजांना भराभरा पदोन्नती मिळत गेल्या.. आधी इराणचा राजदूत मग मद्रास ला मोठे कोणते तरी पद नि मग डायरेक्ट गव्हर्नर ऑफ बॉम्बे… !! आता आले साल १८१७-१८१८… म्हणजे शेवटचे इंग्रज मराठा युद्ध. आणि माल्कम साहेब बॉम्बेचे गव्हर्नर आणि मोठ्या लष्करी हुद्द्यावर…

ब्रिटीश लोकांचा खरा राग येतो जेव्हा तुम्ही त्यांनी सगळा भारत कसा मिळवला ते नीट वाचले तर.. आणि मग त्यांची न्याय-प्रियता, तंत्रात प्रगती, त्यांची पार्लमेंट.. सगळे जाते गाढवाच्या ***. तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजे काय त्या म्हणीचा अर्थ अनुभवायचा असेल तर हा १०० वर्षांचा इतिहास वाचा, गाझेटीयर्स वाचा….. १९ डिसेंबर १८१७. मध्य भारत. होळकर विरुद्ध इंग्रज. आपल्यातला अजून एक सूर्याजी पिसाळ म्हणजे गफूर खान पिंडारी. याने या दिवशी ब्रिटीशांशी गुप्त तह केला, परत छावणीत आला आणि तुळशीबाईला खलास केले. दुसऱ्या दिवशी ब्रिटीश आले लढायला आणि आपले उरलेले सेनानी म्हणजे ११ वर्षांचा मल्हारराव आणि २० वर्षांचा हरीराव होळकर.. असेही नाही की तेव्हा आपण लै भारी होतो.. खूप डीग्रेड झालोच होतो अनेकदृष्ट्या.. त्यामुळे पराभवाचे खापर शत्रूवर फोडणे म्हणजे पलायनवाद होईल. औरंगझेबने गोवळकोन्ड्याला केलेली न-गीना बाग असो किंवा ब्रिटिशांनी केलेली ही महिद्पुरची कत्तल… कोणीना कोणी ‘क़्विसलिन्ग’ असल्याशिवाय हे होत नाही हे खरे… असो. तर दुसऱ्या दिवशी युद्ध सपाटून मार खाला आणि हरलो. आणि कंपनी सरकारच्या अखात्यारीखाली हा ‘मध्य भारत’ नावाचा प्रांत आला. या युद्धानंतर होळकर महेश्वर सोडून इंदौर ला आले… नर्मदेकडून क्षिप्रेकडे…तिथून महू आहे २०-३० किलोमीटर..परत कोणी इंदूर, उज्जैन ला उचल काहु नये या कारणासाठी किंवा भारताच्या मधोमध एक असावे म्हणून… अनेक कारणांनी इंग्रजांनी इथे एक मोठा लष्करी तळ उभारला – ज्याचे नाव आहे – महू.. मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वेस्टर्न इंडिया चे अक्रोनिम आहे हे. And this is how Mhow came into being… हुश.. ..

तरी पण भारताच्या इतिहासात महू चे महत्व काय फक्त या घटनेमुळे नाहीये.. या युद्धात जरी होळकर जिंकले असते तरी एकंदरीतच मराठे काही फायनल युद्ध जिंकायच्या स्थितीत नव्हते.. केव्हा ना केव्हा हरणारच होते.. त्यामुळे महुचे सगळ्यात मोठे योगदान कोणते? – बाबासाहेब आंबेडकर… त्यांचे वालीद लष्करात होते, महार रेजिमेंट मध्ये. आणि महार रेजिमेंट तेव्हा काही काल होती महू मध्ये. तिथे त्यांच्या वडिलांवर कबीराचे संस्कार झाले. आणि वडिलांचे संस्कार झाले बाबासाहेबांवर. कबीर-बुद्ध-फुले असे तीन बाबासाहेबांचे गुरु होते त्यातले पहिले कबीर.. अन बाबासाहेबांचा जन्म पण महूचाच… कोण सांगणार आम्हाला हे? उज्जैनचा कुंभमेळा माहित पण महुचे महात्म्य नाही…

आणि आपण भारतीय लढण्यात एकदम निष्णात.. शत्रूशी नाही… आयुधजीवी राज्ये केव्हाची गेली.. आपल्या-आपल्यात भांडण्यात माहीर… आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे अतिशय फालतू मुद्द्यांवरून… कोणाचे इगो कुठे कधी कसे ठेचले जातात तेच काळात नाही… जो तो उठतो तो ‘अस्मिता’ ‘अस्मिता’ करून भांडायला लागतो… इथे पण एक नामांतर वाद झाला. महू ला बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणायचे की नाही? औरंगाबाद ला खडकी किंवा संभाजी नगर म्हणायचे की नाही? जे नाव बदला म्हणणारे होते ते बाबासाहेबांचे तथाकथित अनुयायी असावेत.. मला ते कोण होते ते माहित नाही.. आणि नाव बदलू नका म्हणणारे जे होते ते महू य अनावाची इमोशनली आणि हिस्टोरीकली बांधलेले होते… पोरबंदर ला गांधीनगर किंवा अलाहाबाद ला नेहरू-नगर नाही म्हणत तर महुलाच का आंबेडकर नगर म्हणायचे… बघा किती इगो -  पहिला इगो अस्मितेचा… आंबेडकरांचे खरे अनुयायी असल्या वादात पडण्यापेक्षा खरे काहीतरी कामाचे काम करतील तर खरे.. बर, या वादात पडले ते पडले.. दुसरी बाजू पण तशीच… इतिहासाची गोचीडे अंगावर पाळत बसलेली… ज्यातून कधी बाहेर पडतील तर बदलेले जग बघतील…. आणि तिसरी चूक म्हणजे ‘तुलना’.. जे काही करायचे आहे ते केस-स्पेसिफिक नाही बोलणार.. उगीच अजून इतर ३-४ गोष्टी मध्ये घुसडून वादाला अजून मोठा वाद करणे तेवढे जमते… चुकून उद्या कोणी खरंच म्हटले की अलाहाबाद ला करा नेहरूनगर तर काय घ्या.. परत नवीनच लचांड सुरु व्हायचे… आणि या सगळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहिले बाजूला… ना ते मोठे-लहान होणार किंवा त्यांना कमी-जास्त मान मिळणार असेही नाही किंवा यामुळे इतर काही दृश्य फायदा तरी मला दिसत नाही… पण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ नाव बदलायला पण हरकत नाही.. कारण त्यांचे कर्तृत्व आहे तसे.. पण भांडणे कशाला? इथे इतिहासाचा दुरुपयोग दोन्ही बाजू करतात… त्यापेक्षा लोकांनी बुद्ध आणि हिज धम्म वाचले तर जास्त उपकार होतील या देशावर…

असो. आपण जरा आपल्याला मानवेल अशा विषयाकडे येऊ. सेलिना जेटली. बॉलीवूड मधली एक हिरोईन. लोकांना आता सर जॉन माल्कम माहित असायचे काहीच कारण नाही. त्याचे (अ)कर्तृत्व २०० वर्षांपूर्वीचे… पण सेलिना जेटलीला उभ्या भारतातल्या प्रत्येक घरातले लहान मूळ ओळखते… तर तिचा जन्म काही इथला नाहीये.. हिचा जन्म अफगानिस्तान मधला.. काय स्टोरी आहे बघा हीची.. वडील लष्करात, अफगाणिस्तानात होते. तेव्हा कोण एका अफगाण हिंदू बाईला यांनी पटवले… (अफगाण हिंदू हा काय प्रकार आहे मला खरंच माहित नाही, कोणाला माहित असल्यास कळवावे) ती होती तेव्हाची अफगाणी ब्युटी क्वीन… (अफगानिस्तान मध्ये ब्युटी क्वीनच्या स्पर्धा? मी वाचलेली माहिती नक्कीच चुकीची असणारे)  आणि या दाम्पत्याला झालेली मुलगी म्हणजे सेलिना जेटली… आता हे दाम्पत्य महू मध्ये राहते… एवढाच त्यांचा आणि महूचा संबंध…..:):)

असो. इति महुपुराण…

ता. क. – अफगाण हिंदू अशी कम्युनिटी खरंच अस्तित्वात आहे. इथे त्याबद्दल वाचायला मिळेल. त्यांचा एक ब्लॉग पण आहे… इंट्रेस्टिंग..

Follow

Get every new post delivered to your Inbox.