तूफां कर रहा था…
by Nikhil Sheth
हजार योजने प्रवास…. स्थलकालाचा, मनोविश्वाचा.. आणखी फक्त दिडेक महिना आणि या Land of Freedom and Beacon of Hope ला कायमचा रामराम. जननी जन्मभूमीकडे प्रयाण. कालच एक दोनेकशे वर्ष जुनी पाण्यावर चालणारी चक्की, शेतीची साधने आणि इतर यांत्रिक अवजारे पहायला एका ठिकाणी गेलो होतो. येताना मित्राने शेर ऐकवला… कधी कधी गोष्टी घडून जातात आणि मग सार्थकता जाणवते. घरी आल्यावर शेर मनात घोळत राहिला आणि आज तर नुसता छळून राहिला…. अर्ज है -
तूफां कर रहा था मेरे अज्म की तवाफ़, दुनियावालोंको लगा की कश्ती तूफां में है…!