दुर्गाबाई भागवत
by Nikhil Sheth

नाव घेताच मनामध्ये वीज चमकते. ज्ञानाचा प्रकाश म्हणजे काय या शब्दाचा अर्थ कळण्यात एक पाउल पुढे पडते. आणि आपण नतमस्तक होतो. काही काही माणसे अशी जगून जातात की त्यांच्यामुळे जग कसे होते आणि आता किती बदलले आहे हे जाणवते. दुर्गाबाईंचे आयुष्य, त्यांची पुस्तके वाचली की हेच प्रथम जाणवते. आणि मला तर प्रत्यक्ष आजकाल कोणाला मी ‘मास्टर्स’ करत आहे हे पण सांगायला लाज वाटते. झुरळाचे आयुष्य जगतो की काय…
असंच काहीसं मनात आलं जेव्हा हे वाचत होते….
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=133999:2011-02-04-08-42-00&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
तेवढं ते मास्टर्सचं सोडून….
अनेक दिवसांच्या खंडानंतर आपली अनुदिनी वाचत आहे. पण आपला हा थोडक्यात लिहिलेला लेख पाहून मात्र निराशा वाटली. आपण दिलेला अशोक शहाणे यांचा लेख अप्रतिम आहे. धन्यवाद.
मंगेश नाबर