इस्लाम पाठ सोडत नाही…
by Nikhil Sheth
इस्लाम बद्दल जाणून घ्यायची इच्छा अपार. लहानपणापासून वाचले त्याचे इम्प्रेशन मनावर असते आपल्या सगळ्यांच्या… मग ती पाठ्याशाळेतील पुस्तके असो की ऐतिहासिक कादंबऱ्या बखरा असोत. कुठून तरी वायव्येकडच्या वाळवंटातून उंटांचे काफिले प्रवास करत आहे.. बदायुनी लोक रात्री एकत्र बसून शेकोटीभवती गाणी गात आहेत. किंवा मग असंच हिरवा झेंडा घेऊन कोणता तरी घोड्यांचा काफिला आरडा-ओरडा करत आला… शेकडो लोक ,हातात नंग्या तलवारी आणि मुखात ‘दीन दीन’, ‘अल्ला हो अकबर’ चा नारा. अत्यंत क्रूरकर्मा असे हे लोक, जाळपोळ करत, लुटालूट, मारहाण करत आले, शहरे लुबाडली, मुडदे पडले, गायी मारल्या, मंदिरे पाडली, आया-बहिणींची अब्रू लुटली वगैरे वगैरे टिपिकल वर्णन वाचतो. मराठी मध्ये तर इस्लाम बद्दल नीट माहिती असणारे काहीच सापडत नाही.. (शेषराव मोऱ्यांचा अपवाद) आणि मग फाळणीची पार्श्वभूमी असतेच. तेव्हा झालेल्या कत्तली, मास मायग्रेशन, कश्मीरचा न सुटलेला प्रश्न…त्यातूनही कोणी जरा वाचणारा मराठी वाचक असेल तर लगेच तो पहिल्यांदा सावरकरांच्या ताब्यात सापडतो आणि बौद्ध धम्म वा अकबर हे कसे भारतविघातक होते असे पक्के मन बनते.. मग मोपल्यांचे बंड असो की मग होणारे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचेआधुनिक व्हर्जन असो. त्यातून इस्लामचा पर्सनल लॉ बोर्ड वेगळा का? त्यांना युनिफोर्म सिव्हील कोड का नाही? आर्टिकल ३७० का आहे? वक्फ बोर्ड हा काय प्रकार आहे? पाकिस्तानचे अस्तित्व आणि दहशतवादाचे नवे रूप आणि वर ९/११ आणि २६/११… आणि आता तर घरामागेच जर्मन बेकरी.
हे सगळे एकाकी वर्णन वाटले. खरंच काय प्रकार आहे? मग इतके लोक मुस्लीम का? इस्लामला त्याच्या जन्माच्या पहिल्या एका शतकातच इतकी समृद्धी का प्राप्त झाली? ते जर इतके अन्यायी आहेत तर मग तरी पण त्यांना इतिहासात इतके जय का मिळाले? इतका प्रसार का झाला? इतकी शतके त्यांनी राज्य कसे केले? गम्मतच आहे….
इतिहासाची आवड म्हणून जसा जसा वाचत गेलो तसे तसे लक्षात आले की मूळ कागद बघणे, मूळ तर्जुमा वाचणे आणि मूळ पुस्तक वाचणे याला फार महत्व आहे. त्याबद्दल इतरांची वक्तव्ये वाचून सत्य समजत नाही. पर्ड्यू मध्ये मध्यंतरी हिस्टरी डीपार्टमेंटच्या दक्षिण आशियाचा इतिहास या कोर्सला जाऊन बसायचो. शिकवायला शिक्षिका होत्या त्या होत्या बंगाली. टिपिकल आधुनिक शिक्षित बुद्धिवादी बंगाली डोळ्यासमोर आणा. पहिल्याच लेक्चरला त्या भारताची ओळख अमेरिकन मुलांना करून देताना म्हणाल्या की भारत म्हणजे राज्यांचे फेडरल नेशन आहे. काय घ्या… त्यांना वर्गात खूप बोलायची इच्छा झाली होती की भारत फेडरल नसून रिपब्लिक आहे. पण शांत राहिलो. ‘गर फिरदौस बर रु ए जमीं हस्त’ हा शेर माहित नसलेली व्यक्ती मुघलांचा इतिहास शिकवत होती. सोर्सेस होते बार्बरा मेटकाफ वगैरे.. त्यांना विचारले की तुम्ही इतिहासकार आहात, उर्दू फार्सी येते का? नाही म्हणाल्या.. मी कधी प्रयत्न पण नाही केला… मग कसला डोंबलाचा इतिहास शिकवणार मध्ययुगीन भारतीय उपखंडाचा? मूळ साधने वाचता येत नसतील तर कसले इतिहासकार? मोडी लावता न येणाऱ्या माणसाने शिवाजी महाराजांवर जर पुस्तक लिहिले तर ते किती युजलेस असेल याचा विचार करा..
म्हणून उर्दू शिकायला घेतली आणि ‘अलिफ बे पे’ करत वाचायला लागलो. पण भारतातल्या इस्लामला पारंपारिक सांस्कृतिक आकर्षण कशाचे असेल तर ते आहे पर्शियाचे. जसा जसा गालिब आणि इक्बालची शायरी वाचायला लागलो तसा तसा फार्सीकडे ओढा वाढू लागला… फार्सी व्याकरण शिकायचे २-३ प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान इस्लामबद्दल वाचन सुरु केले. इंग्रजी मध्ये मराठीच्या तुलनेत प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. मग कश्मीर आणि इस्राएल मधल्या साम्यांचा अभ्यास करायला लागलो तेव्हा जेरुसलेम बद्दल मनात एक अनाम प्रेम वाटायला लागले.. इतकी शतके, इतके धर्म, इतक्या लढाया, इतक्या अस्मिता… एकदम खास इतिहास आहे. तिथून थोडा दक्षिणेकडे उतरून मग मक्का-ए-शरीफ बद्दल माहिती वाचणे सुरु केले.. मुहम्मदाचे आयुष्य, वयाच्या ४०व्या वर्षी पैगंबर होणे.. मग पुढचे १ तप केलेला झगडा, हिज्र, बदायुन टोळ्यांवर मिळवलेली फतेह, पैगंबराच्या मृत्युनंतर अबू बक्र, उमर, उस्मान आणि अली हे राशुदिन, खलिफा, उमय्याद, खिलाफत ऑफ ग्रनाडा…वाचत जावे आणि तोंडात बोटे घालावीत.. मग मंगोल लोकांचे पर्शिया पर्यंत येणे आणि त्यातून संपर्ण इस्लामचा चेहेरा बदलून जाणे… पहिला मुघल बाबर हा चंगीज खान आणि तैमुर लंग यांचा वंशज होता.. म्हणजे एकदम रॉयल मंगोल आणि रॉयल मुस्लीम… वस्तुतः मुघल हा शब्दच मुळी मंगोल वरून आला आहे.. त्यांच्या काळातले त्यांचे युनानी मेडिसिन, आकाशविज्ञान, नेव्हीगेशन, व्यापार, गणित, आर्किटेक्चर, कलाकुसर, संगीत, पाककला यामध्ये अतिशय उच्च पातळीवर गेलेले इस्लाम कल्चर, त्यांच्या परंपरा आणि सण… आफ्रिकेमध्ये आणि भारतीय उपखंडात इस्लाम चा वाढता प्रभाव, त्यांचेही अनेक सबग्रुप्स जसे की शिया, सुन्नी, अहमदिया, सुफी, इबादी… मग तिथून हळू हळू युरोपातला रेनेसा आणि मग इस्लामचे आजच्या इस्लाम मध्ये झालेले रुपांतर वगैरे वगैरे बराच मोठा व्याप आहे. काय काय काय काय… फज्र, अस्र, इशा, मघ्रीब वगैरे नमाज, त्यांची भक्ती परंपरा, जकात, रमदान… कयामत वगैरे गोष्टी..इराण मधला फरहाद, पंजाबातील मिर्झा साहिबा यांच्या चटका लावून जाणाऱ्या गोष्टी. एकदा का माणूस अडकला की त्यातून बाहेर येणार नाही. आणि आपण काही रामकृष्ण परमहंस नाही एका आयुष्यात सगळे धर्म साध्य करायला. पण इस्लाम बद्दल जाणून घ्यायची इच्छा फार.
त्यासाठी बरेच उपद्व्याप केले. पुण्यामध्ये एका इराणी माणसाला पकडून त्याच्या मागे लागलो होतो की रे बाबा, फार्सी शिकव फार्सी शिकव. ते काही झाले नाही. आता इथे आलो आहे. इथे ३-४ पठाण लोकांशी गप्पा मारल्या. पण त्यातून पुढे काहीच नाही. इराणी लोकांना भेटलो. त्यांच्यात प्रयत्न करतो आहे कुठे कोणी चांगला माणूस भेटतो आहे का शोधतो आहे. आज एक लिबियाचा मुलगा भेटला. अहमद म्हणून. त्याला मग १-२ प्रश्न विचारले. तर मग तो एवढा खुश झाला की मग त्याने नंतर २ तास बडबड केली. मजा आली. फारशी उपयोगी माहिती मिळाली अशातला भाग नाही. पण इराण पलीकडचा इस्लाम जो भारतामध्ये फार कमी पाहायला मिळतो त्या लोकांचे विचार ऐकायला मिळाले. त्या २ तासात जबरदस्त काय काय मते सांगितली जी काही वेळा विरोधाभासाची होती तर काही वेळा मूर्खपणाची. पण त्याची त्यावर श्रद्धा होती. इस्लामबद्दल नवी माहिती मिळाली असे नाही म्हणणार पण एक नवीच इच्छा जागृत झाली. फार्सीचा टप्पा गाळावा आणि जमल्यास डायरेक्ट अरेबियाच शिकावी. आणि मुळातूनच कुराण वाचावे. बघू कधी हे स्वप्न प्रत्यक्षात येते ते…
सुंदर लेख, इथुन पुढे ही या विषयावर वाचायला आवडेल!
मराठीमधे कुराण वाचलंय मी. एकदा ताज ऑफिस जवळ भेंडीबझारला गेलो असता विकत घेतले होते. पण मूळ आणि हे अनुवादित , दोन्ही मधे किती फरक असेल ते सांगता येत नाही.
Gulf madhe asatana barech kahee vachaya milale classical islam baddal. Sadhya Islam vadhato ahe ka? Tyache akarshan kayam ahe ka? Ka vadhato ahe? ya goshtee jaree bajoola thevalya, taree itihas nakkeech ranjak va raktaranjit ahe – kalachee garaj va christi prasarala thambavane haa uddesh asava. Islam cha uday zala tevha arabia madhe dharmach navhata – kinva nisarga niyam haach dharma asava. Mhanoon patkan pasarala asava.
Anakhee kaay kaay sapadale ya abhyasat te jaroor lihave.
इस्लाम धर्माचा अभ्यास करायला काहीच हरकत नाही. आणि त्याचा सोबत त्यांची इतकी विकृत कृती नेहमी का करतात याचाही अभ्यास करा. बाकी सावरकरांच्या जाळ्यात कोणीच सापडलेले मी अजून कोणी पाहिलेलं नाही. कुठल्याही भाषेचा अभ्यास करा, चांगल आहे. पण मराठी आणि संस्कृतीला नावे ठेऊ नका हीच आपल्याकडे प्रार्थना.
हेमंत,
प्रतिक्रियेबद्दल आभार. मी कोणालाही नावे ठेवत नाहीये. कोणाचेही भले-बुरे चिंतीत नाही. आणि कोणताही हेतू अथवा आकस ठेवून लिखाण करत नाही. फक्त विचार करताना जे पटकन वाटले ते लिहिले. बहुतांशी विचार वैयक्तिक अनुभवातून आलेले आहेत.
आपण किंवा इतरही सावरकरांच्या किंवा अन्य कोणाच्या तावडीत सापडत नसून,,,,
रामदास स्वामींनी श्री मनाच्या श्लोकात सांगितले प्रमाणे, “जेणे भक्षिली मक्षिका जाणीवेची” आणि “बळे लागला काळ हा पाठीलागी” असेच आहे…
इस्लाम विषयी खोलात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मोरेंचे लेखन वाचले असेलच पण बाबासाहेबांचे “पाकिस्तान अथवा भारताची फाळणी” हे पुस्तक वाचा
तटस्थपणे त्यांनी लेखन केले आहे .इस्लाम मध्ये सकारात्मक परिवर्तन कसे घडू शकते यादृष्टीने लिहिलेला सावरकरांचा केमाल्पाषा वरचा लेख उत्कृष्ट आहे
पण आमच्या शहरातील जुन्या लोकांनी अनुभवलेला इस्लाम अधिक क्रूर अमानवी असाच आहे .
प्रतल, ब्लॉगवर आपले स्वागत.
वैयक्तिक किंवा स्थळ-काल संदर्भ लावले तर प्रत्येक गोष्ट केव्हा न केव्हा कुठे न कुठे वाईट असतेच. वैश्विक विधान करण्याच्या मागे मीही नाहीये. प्रयत्न फक्त एवढाच आहे की भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठी लोकांची मते, संदर्भ आणि इथला इतिहास याच्या पलीकडचा इस्लाम जाणूनघ्यावा.
नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या “जागर” या पुस्तकात इस्लाम, इस्लामच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती दिली आहे.
दीपक, प्रतिक्रियेबद्दल आभार. ‘जागर’ नक्की वाचून पहिले पाहिजे. कुरुन्द्कारांचे विचार स्वतंत्र आणि वेगळ्या धाटणीचे असतात त्यामुळे त्यांचे याविषयीचे विवेचन वाचायला नक्कीच आवडेल..
कुरुंदकरांच्याच ’शिवरात्र’ मध्ये सुद्धा काही चांगले लेख आहेत. ते सुद्धा नक्की बघा.
हमीद दलवाईंचे “राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान” हे सुद्धा पुस्तक वाचायला हवे असेच!
मलासुद्धा या विषयावरील आपले अनुभव पुढील ब्लॉगमध्ये वाचायला आवडेल. आपला हा ब्लॉग मी जाणीवपूर्वक माझे ज्येष्ठ स्नेही आणि लेखक श्री यशवंत कर्णिक तसेच इतरांना फोरवर्ड करत आहे. बघूया ते काय म्हणतात ते.
मंगेश नाबर
आभार. खरे सांगायचे तर मीही उत्सुक आहे जेवढे जमेल तेवढे जाणून घ्यायला. जसे जसे घडत जाईल तसे तसे लिहित जाईनच.
श्री.यशवंत कर्णिक यांची प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात :-
मुस्लिम मानसिकता अजून मध्ययुगीनच आहे. अल्लाहने प्रेषितास ज्या आयाती सांगितल्या असे ते मानतात त्या कधीच बदलता येणार नाहीत असे त्यांना वाटते. महम्मद पैगंबरांच्या वेळी जो झगडा होता तो मक्का व मदिना यांच्यात होता. त्याला अनुसरून ज्या सूचना पैगंबरांनी त्या काळात आपल्या अनुयायांना दिल्या त्या आजही प्रमाणित मानण्यात येतात. काळ १४०० वर्षांनी पुढे सरकलाय हे मुसलमान लोक लक्षातच घेत नाहीत. त्यावेळी पैगंबर त्यांच्या विरोधकांशी जेवढे कट्टर होते तेवढेच आजचे त्यांचे अनुयायी आपल्या विरोधकांशी कट्टर वागण्याचा प्रयत्न करतात. पण आजचे बिगर मुसलमान त्यांच्याहूनही बलाढ्य झाले आहेत हे ते लक्षातच घेत नाहीत. बुद्धीची वाढ मुसलमानांत कमी आहे. ज्ञान मर्यादित आहे. इतरांशी जुळवून घ्यायची मानसिकता नाही. अश्या परिस्थितीत निदान ह्या सहस्त्रकात तरी मला इस्लामचे भवितव्य फारसे उज्ज्वल आहे असे वाटत नाही.
भाई.
मलाही इस्लाम बद्दल फार कुतूहल आहे. मुळात इस्राएल मध्ये अगदी जवळ जवळ च्या कालखंडात दोन मोठे धर्म कसे उदयाला आले अशी उत्सुकता आहे. की ख्रिश्चन्स व इस्लाम पूर्वी एकच होते व कालौघात विभागले गेले? काही संदर्भ( उदा मेंढपाळ लोक, भटके काफिले, प्रेषित ही संकल्पना) तर अगदी सेम आहेत.
महंमद पैगंबर तर वेडा होता व वेडाच्या झटक्यात त्याला म्हणे काही ’संकेत’ मिळत जी पुढे इस्लामची मूलतत्वे मानली गेली.. असे कुठेसे वाचले.
पण खरेच व्याप्ती मोठी आहे. प्लीज अजून काही लेख लिहा.
आपल्या हिंदू धर्मापेक्षा बराच मोठा भाग इस्लाम ने व्यापला होता-आहे. म्हणून काही तर मेख असेलच ना?
Kuthlyahi dharmachya baddal zanun ghyayachi ichcha asel tar tya dharmachya lokanna pahanya aiwaji tya dharmache granth vachun tyacha shikwani samjun ghetlya pahijet nantarach aaple mat kayam kele pahije.Hyachya sathi aapan je prayatna karit ahat tyaci kharokharach dad dyayala hawi “Islamic Marathi Publications Trust” 4,Hamid Bldg,96, Hafiz ali Bahadur khan Marg,Mominpura,Mumbai 400011.ya prakashnane Islam baddal kahi marathi pustake tasech kuraanche marathi bhashantarhi prakashit kele aahe.Hya prakashnane “Islam dharma” hya nawache Abulaala Maududi hya lekhakache islam baddal sankshipt mahitiche aek pustak prakashit kele aahe te aapan wachawe hi aapnas kalkalichi vinanti.Islamcha dharmic grantha kuraan mul arabi bhashet aahe, zar arbi bhasha shikun kuraan aani tyacya shikwani samaznyacha prayatna kele tar sarwat uttam, aani anuwad barobar aahe ki chukicha hi shanka hi rahnar nahi.Aapla lekh sundar aahe ,pudhe hi aaple vichar wachnyas miltil ashi apekshya.
Same thing is happening with me….. I searched for marathi quran and I got a site http://www.islamdarshan.org/ where I can read Quran in marathi. but I want transliteration in marathi of arabic also, so still m searching it. Actually Quran transliteration available in English also, but its really give me headache. I’ve some muslim friends… so trying to learn from them and I’ve also downloaded some Surah… so listening them and write them.
And it is really a true that even I could not find much information about Quran in Marathi. But Against Quran and Muslims you’ll find a lots of things….. Sad but True.
Quran marathi translation is available in the form of Divya Quran book. More scientific information about islam can be obtained from Peace tv channel which comes in English as well as Urdu. This free channel is broadcasted by many cable operators. Mr Zakir Naik is the anchor role of this channel. Mr Naik is a MBBS Doctor who has left his profession and looking after the Islamic Research Foundation at Dongri Mumbai. Personal discussion facility with scholars is available in the IRF library at Dongri. It is said, look at the Islam, not the muslims around you. The principles of Islam are meant for all human beings.
Chaan lihilay tumhi. Lay bhari! Pathya pustake an marathi itihas vishayak pustake vachun islam baddal barech gairsamaj hote. Tyat hindutva vadyanchya pracharachi bhar… Pan yavarshi IIM madhye aalyanantar vastusthiti cha abhyas kela, emotions bajula thevun statistics an facts chya aadharavar mat tapasun pahili an mag matanmadhla foal pana jaanwla. Facts sangtat, madhyayugat jevdhi mandire islami aakramakani padli tyahun kiti tari pat adhik mandirancha vidhwansa hinduni kelay. An aaplya naalanda an takshshile hun kiti tari adhyayavat vidyapithe an kala kendre islami rajvatitt baharli hoti. Shalet astana Nepolean vachtana tyacha islam baddal cha prem baghun ashchary vatlela pan aaj tyachi kaarana samjtat..
Ya vishayavar aankhi liha..
sir, tumacha lekh avadla mala. tumchyashi islam var bharpur bolaycha ahe……barech prashana ahet ya sandarbhat ,ani mi sadhya arebian shikteyislam la javloon janun ghenyasathy ………………so i’m reqest u plzzzzzz guide mi.