पुन्हा केव्हा तरी प्रायःश्चित्त घेऊ..

by Nikhil Sheth

गेले दोन दिवस घरी तांदूळ नाहीये. परवा रविराजने त्याच्या घराचा तांदूळ अर्धा लिटरच्या प्लास्टिक च्या बाटलीत भरून आणला त्याचाच भात करून खाल्ला. काल संध्याकाळी दुकानात गेलो. खर तर किराणा आणायला सगळे रूममेट्स जातो पण काल एकटाच तिथेच होतो तर म्हटले आणूया तांदूळ… पण मग नवा कोणता तरी बासमती दिसला तो उचलून आणला… घरी येऊन बघतो तर ‘मेड इन पाकिस्तान’..!!! आता खाऊ की टाकून देऊ असे झाले आहे… प्रत्येक वेळी नीट बघून निक्षून एकही पाकिस्तानी गोष्ट खरेदी करणे टाळतो. काळ चुकून घरी येऊन पडला आहे.. खर तर परत जाऊन देता येऊ शकतो… पण जाऊ दे आता… पुन्हा केव्हा तरी प्रायःश्चित्त घेऊ..