दिसामाजी काहीतरी

Month: मे, 2010

लातूरकरांचे अभिनंदन…

आत्ताच १२ वीचा निकाल लागला. या निकालातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘लातूर Pattern’  साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याची पहिल्या क्रमांकावरून झालेली उचलबांगडी आणि ती सुद्धा साधीसुधी नाही तर एकदम शेवटच्या स्थानावर. मागच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण होते ८५.५१ %  आणि ह्या वेळेस ते आहे ४४.८१ %….!! आता वर्षभरात विद्यार्थ्याची पातळी काही इतकी खालावत नाही. या साठी जबाबदार सर्वात मोठा घटक म्हणजे लातूरच्या आणि  महत्वाच्या नांदेडच्या जिल्लाधिकारी आणि करमचार्यानी घेतलेले ‘Tough Anti Exam Malpractices Measures ‘ बाकीच्या ७ बोर्डाचे निकाल ८० % च्या आसपास आहेत आणि फक्त लातूर चा ४४ %. यात लातूर बोर्ड गंडलेले आहे असे समजावे की बाकीच्यांना ‘Reality check ची गरज  आहे असं समजावे..?

इतर महाराष्ट्रात काही फार दिव्य परिस्थिती आहे असं वाटत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतो. आता लातूरकरांना कमी निकालाबद्दल फैलावर घेतलं जाते की इतरांना ठोस पावले न उचलण्याबद्दल हे पाहायला हवे. महाराष्ट्र बोर्डाने निकाल Online लावून फार मोठी सोय केली आहे, आणि त्यात सर्वात मस्त गोष्ट म्हणजे भरपूर Statistics उपलब्ध करून दिले आहेत. लातूरच्या या निकालावरून जरी आपल्या शिक्षण पद्धतीचे खरे स्वरूप बाहेर येऊन वाभाडे निघाले असतील तरी परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा पाउल म्हणता येईल. बाकीच्यांना सुद्धा असे करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात पास होण्यासठी अभ्यास करावा लागतो अशी भावना तरी निर्माण होईल.भविष्यासाठी आपले बोर्ड कुठल्या वाटेने जातात हे महत्वाचे ठरेल. ईश्वर त्यांना योग्य (कठीण असला तरी ) मार्गाने चालांयची सुबुद्धी देवो .

( ह्या पार्श्वभूमीवर ८ वी पर्यंत परीक्षा रद्द करण्याचा निर्णयाबद्दल विचार करतोय.. फारसे आशावादी चित्र दिसत नाहीये)
१२ वी results आणि Statistics इथे पाहू शकतात http://mahresult.nic.in/ येथे विभाग निहाय statistics पण उपलब्ध आहेत.

- स्मित गाडे

कैफियत

एक एक फिक्सेशन असते. काही वेळा येते, तेव्हा डोक्यात असे ठाण मांडून बसते की निघता निघत नाही. सध्या उर्दू फिक्सेशन चालू आहे. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी खानाला जसे संताजी धनाजी दिसायचे तशी मला उर्दू दिसते आहे पण शत्रू म्हणून नोहे. उलट ‘ये ग ये ग विठाबाई’ च्या आवेशाने मिळेल तसे वाचत सुटलो आहे. पण राहता राहून असे वाटते आहे की ब्लोग्वाचकांवर उर्दूचा अकारण जरा जास्तच भडीमार होतो आहे. तेव्हा उर्दू वर लिखाण चालू ठेवावे की त्याव्यतिरिक्त इतर लिहावे कळेना झालंय. इतर विषय सुचत नाहीत असे नव्हे पण उर्दू-प्रेमामुळे त्यांच्यावर अन्याय करतो आहे. तेव्हा मनातले द्वंद्व मनात न ठेवता वाचकांवर सोडून देतो. तेव्हा बा वाचका, कोमेंट्स मध्ये कृपया सांग की तुला उर्दू विषयाविषयी या परते अजून वाचायला आवडेल की त्याची वारंवारता कमी करून पूर्वीच्या अनुषंगाने कीबोर्ड बडवलेला आवडेल? Ultimate choice is yours, fella….

(भरभरून आपली मते द्या. जीमेल अकौंट धारक असा वा इतर कोणते, सगळ्यांसाठी एकच प्रोसिजर आहे. बिएसेनेल धारकांनी इथे फोन लावा, एयरटेल धारकांनी हा नंबर डायल करा असले झंझट नाही आणि वर फ्री आहे, एसेमेस सारखे पैसे पण नाही पडणार, तेव्हा कृपया भरभरून प्रतिसाद द्या)

Anti-climax..

रावणाला मारायला राम आला होता. म्हणजे रावणाची योग्यता इतकी होती, शक्ती इतकी होती, आराधना, भक्ती इतकी होती की त्याच्या बरोबरीचा शत्रू म्हणजे राम. यात रावणाचे महानत्व येते. (काही लोक उलटे पाहतात की रावणासारख्या शत्रूला मारले म्हणून राम जास्त मोठा.. म्हणजे रावणाच्या पात्रतेवरून रामाची योग्यता मोजतात) ते काही असो. तुम्ही खूप कष्ट करता, प्रयत्न करता, रिझल्ट्स मिळवता, प्रेझेंट करता आणि ऐन वेळी काहीतरी फालतू म्हणजे अतिशय फालतू गोष्टीमुळे पचका होतो. आणि सगळ्याच गोष्टी अचानकपणे फोल वाटू लागतात. जर प्रोफेसरने काही मोठा कन्सेप्चुअल प्रश्न विचारला असता आणि उत्तर आले नसते तर किमान त्या प्रश्नाच्या क्लिष्टपणामुळे वाईट वाटले नसते. अतिशय भंकस चूक केली, चुकीची लाईन काढली ग्राफमध्ये आणि प्रोफेसरने नेमके ते पोईंट आउट केले. इतके वाईट वाटले म्हणून सांगू. या गोष्टीमुळे फक्त प्रोजेक्टच्या बाबतीतचा हलगर्जीपणा, आळस आणि बेफिकीर वृत्ती दिसून येते. कितीही नाही म्हणालो तर तसेच पोर्ट्रे होते ते. काय करणार.. आणि त्याहीपुढे तुमच्या ग्रुप मेम्बर्सचा विश्वासघात केल्यासारखे असते कारण तुमच्या चुकीमुळे त्यांच्या पण ग्रेड्सवर परिणाम होणार असतो. एवढे सगळे करून, अयोध्येहून निघून विजनवास स्वीकारून, संपूर्ण भारतवर्ष चालत चालत पार करून, वानरांची सेना जमवून, समुद्राला पार करून शेवटी तो क्षण येतो. युद्धाचा… रणांगणामध्ये उभे ठाकल्यावर समोर रावण असताना लढून मरण्यापेक्षा भोवळ येऊन खाली पडल्यास त्याला काय म्हणणार?

नक़श फ़रयादी

पहिल्या वेदाची सुरुवात ’ॐ अग्निमीळे पुरोहितम् ॥ यज्ञस्य देवमृत्विजं ॥’  अशी आहे तर जुन्या करारात म्हणतात - In the beginning God created the heaven and the earth. तर नव्या करारात मथ्यू च्या गोस्पेल मध्ये The book of the generation of Jesus Christ, the son of David, the son of Abraham…. तर त्याही नंतर आलेल्या कुरअनच्या पहिल्या चाप्टर ज्याचे नाव आहे ‘अल फ़तिआह’ त्यात तर सेम श्रीगणेशाय नमःच आहे - ’बिस्मिल्लाहिर्रहमानइर्रहीम अलहमदूलील्लाही रब्बीइलाहमिना’  गीतेमध्ये सुरुवात होते ती ’धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ने तर ज्ञानेश्वरी म्हणते ‘नमोजी आद्या’… काहीही असो… आम्ही मात्र दिवान-ए-गालिब ने सुरुवात करतो….. अर्थांच्या छटांची अल्टीमेट सर्कस…

نقش فریادی ہے کس کی شوخیِ تحریر کا
کاغذی ہے پیرہن ہر پیکرِ تصویر کا

नक़श फ़रयादी है किस की शोख़ी-ए तहरीर का
काग़ज़ी है पैरहन हर पैकर-ए तसवीर का

आता ‘ब्लॉग’च्या बाबतीत हे म्हणणे शब्दशः घेता येत नाही म्हणा… कागद गेले. पण पैकर-ए-तस्वीर ची किंमत मात्र तशीच आहे अजून.. मर्त्य वस्तूवर उठलेले तरंगच जणू. मग ती तहरीर शोखियोंसे भरलेली असो वा नसो. पण नक़श फ़रयादी मात्र कायम असतात. बाकी जुन्या करारातले वाक्य गीतेला लागू पडत नाही आणि कुरआन मधले वाक्य ऋग्वेदात लावता येत नाही.. पण हे वाक्य मात्र सगळ्यांना तसेच लागू पडते.. (अर्थात वेद अपौरुषेय मानत असाल आणि इतर ही धर्मग्रंथ हे God/اللہ प्रेरित आहेत असे मानणे असेल तर विषयच संपला)

इस्कुल के टेम पे, आना गोरी डेम पे….

इस्कुल के टेम पे, आना गोरी डेम पे…. अनेक गाणी अशी असतात. काहीच मटेरीअल नसते पण कितीतरी वेळा पाहून हसत बसतो. कधीकाळी गाजलेली सुट्टा, एक्स.एल. कि लडकिया वगैरे गाणी असोत किंवा द्राविडी हिरोंच्या चित्रपटातल्या करामती. त्यातलेच अजून एक हे इस्कुल के टेम पे… क्लासिक क्लासिक म्हणतात ते हेच. यासमोर हेलन-मधुबाला-झीनत अमान-करीना पण झक मारतील. कोण तो देव आनंद, शशी कपूर, जीन्तेंद्र, जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी आणि बाकी सगळे चोकलेट हिरो याच्यासमोर हात जोडून उभे राहतील… ‘तौफा मांगा तौफा दुंगा, जान मांगा जान दुंगा’ …. अहाहा काय ते शब्द. अगदी माणकासारखे. स्वानंद किरकिरे आणि प्रसून जोशी झक मारतील, राजीव मेनन आणि संतोष सिवन आपापले कॅमेरे बंद करतील… एस डी पण चक्रावून जाईल आणि लता पण आपले गाणे सोडून शांतपणे याचा आस्वाद घेईल….

Follow

Get every new post delivered to your Inbox.