ला मिझराब्ल
by Nikhil Sheth
ला मिजाराब्ल… एक नितांतसुंदर कादंबरी आहे. असे म्हणतात की एकोणीसाव्या शतकातील जगातल्या सगळ्या भाषांमधली उच्चतम कादंबरी… असेलही नसेलही. पण उच्च असेल हे नक्की. नेपोलियनचा पाडाव झाल्यानंतरच्या काळातील फ्रान्सची पार्श्वभूमी. मनुष्या-मनुष्यातल्या संबंधावर आधारित. पण पश्चिमी देशातले लोक मानवी मनाच्या भावना आणि गुंतागुंत दाखवण्यात अग्रणी आहेतच. त्यांची ही अग्रणी. त्याला सामाजिक आशय असतोच. आर्थिक, तात्त्विक सगळे परिमाण असतातच. पण भावना ज्या तीव्रतेने प्रतीत करतात त्याला तोड नाही. War and Peace च्या लेवलचेच रसायन दिसते आहे.
याच पुस्तकावर एक नाट्यसंगीत टाईप कार्यक्रम आला होता. त्याला केव्हातरी १० वर्षे पण झाली त्याच्या निमित्त झालेल्या प्रयोगाचे हे व्हिडियो पाहण्यात आले. शब्द वाचा, चाल ऐका, गायकाच्या चेहेर्यावरचे भाव बघा, अस्वस्थ व्हा…. उत्कृष्ट नमुना आहे हे गाणे तर….
सगळीच गाणी पहिली तरी आवडतील खूपच. पण सगळ्यात जास्त गाजलेले गाणे म्हणजे ‘आय ड्रीम ऑफ ड्रीम’. सुसन बॉयल नावाची एक ४८ वर्षांची बाई. ब्रिटीश आयडॉल सारखी एक खूप प्रेस्टीजीयस टीव्ही मालिका. त्यावर तिला गायची संधी मिळाली. गाणे सुरु करण्यापूर्वी तिची सगळ्यांनी खिल्ली उडवली की ही बाई काय गाणार म्हणून. आणि तिने प्रत्येक प्रश्नाला अतिशय आत्मविश्वासाने उत्तर दिले. त्या उत्तरांना लोक हसत होते. तिला परीक्षकांनी विचारले कोणते गाणे गाणार? उत्तर : ’आय ड्रीम ऑफ ड्रीम’.. आता परीक्षकपण हसायला लागले. मात्र तिने जेव्हा गाणे सुरु केले तेव्हा सगळे सभागृह एक क्षणभर स्तब्ध झाले. कोणाला कळलेच नाही की काय होते आहे ते. आणि मग जसं एकेक जण भानावर आला तासा उभा राहून टाळ्याच वाजवत राहिला….
(तिचे गाणे इथे ऐकायला मिळेल - http://www.youtube.com/watch?v=wnmbJzH93NU)
आणि हे ओरिजिनल गाणे -
आता ला मिसराब्ल चा इंग्रजी अनुवाद वाचायला सुरुवात करतो आहे. बघू कसे कधी पूर्ण होते ते…