दिसामाजी काहीतरी

Month: फेब्रुवारी, 2010

पांडुरंग पांडुरंग

का काही काहीसु काहीसुच काहीसुचत काहीसुचतना काहीसुचतनाही काहीसुचतनाहिये…….

सुज्ञ वाचकांनी बरोबर ओळखले असेलच की ही तर कोसला स्टाईल… बरोबर ओळखले.कोसला सगळ्यांनी वाचली आहे. पांडुरंग सांगवीकर सगळ्यांनी एकदा कधीतरी जगलेला आहे. त्याची कहाणी म्हणजे ‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन’ अशा उर्मीपासून ते ‘लायी हयात आये..’ पर्यंत जगण्याची अपरिहार्यता दाखवणाऱ्या प्रवासाची झलकच जणू. कबीराच्या ‘दुई पाटन के बीचमें साबूत बचा ना कोई’ चा साक्षात मूर्तिमंत अवतार. मनुष्याच्या क्षुद्रतेची एक साधी वानगी. मला पांडुरंग आठवला की ‘रंग दे बसंती’ मधला अमीर खानच लगेच डोळ्यासमोर येतो. ‘कॉलेज की इस पार हम दुनिया को नचाते है, तो कॉलेज के उस पार दुनिया हमे नचाती है, टीम लख लख दे टीम लख लख…’

सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी

विक्रमांचा महामेरू | बहुत रनांसी आधारू |

अखंड खेळाचा निर्धारु | श्रीमंत सचिन ||१||
सचिनचे कैसे चालणे | सचिनचे कैसे खेळणे ||
सचिनचे प्रेरणा देणे | कैसी असे ||२||
रनपती तो जगती | करा किती उचापती |
डाळ न शिजे पुरती | कोणाचीही ||३||
सचिनचे आठवावे शॉट | पहावा BATTING चा थाट |
पळे BALL पटापट |  ग्राउंड बाहेरी ||४||
स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेची होतसे |
बदले CHANNEL मी जैसे | येथ आलो पहा कसा ||५||
सामना चालीला कैसा | शॉट अखंड चालती |
खेळला देव देवांचा | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||६||
आनेक  BALL ते येती | मात्रा पै नच चालली |
सचिन कर्ता सचिन भोक्ता | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||७||
बुडाली आफ्रिका पापी(?!) | चेंडू संहार जाहला |
उदंड जाहल्या धावा |  रमा रेकॉर्डसंगमे||८||
योर्करू तो जरी आला | सीमा ती पार  केलीसे\
कळेना काय रे होते |  ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||९||
चौके चौके किती छक्के | गणना करवे नच |
ऑफ  ऑन चहूलोकी | चेंडू तो भिरकाविला ||१०||
येकला लढला योद्धा | अन्ये गम्मत पाहती|
रनांचा डोंगरु झाला | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||११||
हे धरा अकरा श्लोकी | लाभली शोभली बरी|
दृढ bat निसंदेहो | सचिन तो सर्व काळीचा ||
.                                                    – निखिल बेल्लारीकर

उ. अमजद अली खानांचे ख्रिसमसि तुकडे

याला काय म्हणायचे? ख्रिसमस जिंगल्स आणि अमजद अली खान साहेब? नाट्य संगीत स्टेजवर गायला लागले तेव्हा लोकांनी काय गोंधळ केला होता…आणि ही तर कमालच आहे बुवा…मला तर त्या आयोजकांची कशी फजिती झाली असेल याचा विचार करवत नाही… अमजद अली खानांना बोलावले आणि काय…तर इंग्रजी पोएम. बदल पाहिजे, नाविन्याचे वारे पाहिजेत सगळे ठीक आहे हो…पण हे मानवणे खरंच अवघड आहे….

(पूर्ण व्हिडियो इथे पाहायला मिळेल – http://video.webindia123.com/music/ustadamjadalikhan/index.htm)

अमेरिकन शिक्षक…?

अमेरिकेत शिकायला यायच्या आधी इथल्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल बरेच ऐकले, वाचले, सर्फले, गुगले होते. की इथले वर्ग कसे असता, व्हिडियो लेक्चर्स, वेबसाईट वरून गृहपाठ, वर्गात खाणारी-पिणारी (कॉफी) मुले, वर्गात laptop वर नोट्स काढणारी किंवा गेम्स खेळणारी मुले वगैरे वगैरे….आश्चर्य च वाटायचे की वर्गात मास्तर जीव तोडून शिकवत असता कोणी कॉफी कसे पिऊ शकते…ते पण ठीके एकवेळ पण एक कानाने त्याचे बोलणे ऐकताना laptop वर दुसरेच काम करणे म्हणजे त्याचा अपमानच नाही का? असले ‘काय सांगू वाटे, काहीचिया बाही’ रेग्युलर आणि नैसर्गिक वाटायला लागले….तोच हा व्हिडियो पहिला. ओक्लाहोमा युनी.चा. चला, एक तरी असा प्रोफ आहे ज्याला वाटते की मुलांनी त्याच्या लेक्चर ला असली उपकरणे वापरू नयेत, वापरू नयेत काय, वर्गात आणू ही नाहीयेत….अन नुसते त्याला वाटत नाही तर तो प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड स्ट्रीक्ट दिसतो आहे त्याबाबतीत…मुलांनी घाबरावे, आपले ऐकावे म्हणून अपाल्याकडे कान पिरगळणे, कोंबडा करायला लावणे, छडी मारणे, वर्गाबाहेर किंवा बाकावर उभे करणे अशा शिक्षा आहेत. पण हा प्रोफ काय करतोय? खरंच ‘काहीच्या बाही’च आहे. त्याचा मुद्दा मुलांना नीट कळावा आणि एकदम नीट कळावा म्हणून याने काय केले? याच्या वर्गात मुलांनी laptops अनु नयेत अशी याची इच्छा आहे. म्हणून याने पहिल्या लेक्चर ला एक laptop घेतला, लिक्विड नायट्रोजन घेतले, laptop त्यामध्ये बुडवला, आणि मग म्हणाला, “This is just liquid nitrogen, so it alone won’t hurt the computer. But this will.” आता हे ‘this’ म्हणजे काय ते या व्हिडियो मध्येच पाहा. हे पाहून पोरांच्या कपाळात गेल्या नसतील तरच आश्चर्य आहे. कोण हिम्मत करेल वर्गात परत laptop आणायची किंवा मोबाईलशी खेळायची?

Follow

Get every new post delivered to your Inbox.