(संस्कृती संस्कृती म्हणतात ते काय असते रे भाऊ?’ विचारून आणि क्रमश क्रमश करत निखीलने संस्कृतीपुराण पूर्ण केले. त्याच पुराणात अजून एक नवीन अध्याय – स्मित गाडे)
संस्कृती .भाषा,खाद्य,पोशाख,सण,उत्सव… या सर्व धाग्यांचे मिळून संस्कृती बनते. आपल्या आसपास जे काही असते आणि जे काही घडते ती आपली संस्कृती. ह्याचाच महत्वाचा एक भाग म्हणजे आपली वस्र संस्कृती. जरा आजूबाजूला पहा. जीन्स,टी-शर्ट,फोर्मलस दिसतात चहुबाजूला. कुणी धोतर धारक दिसतंय की पहा बर. कुणी पारंपारिक मराठी धोतर घाला या साठी आंदोलन करताना दिसत नाही बुवा मला तरी. (बहुराष्ट्रीय कार्यालयांमध्ये दर बुधवारी पारंपारिक धोतर आणि बंडी सक्तीची झालीच पाहिजे.
. असो विषयांतर होतंय ). का?आपण आपली संस्कृती रसातळाला जाऊ देतो आहोत का? आपण आपला मराठीपणा विकला आहे का? आपण पाश्चिमात्यांच्या आहारी गेलो आहोत का? आपण जरा मागे वळून पाहूयात..
सुरुवातीला भारतवर्षात वस्र हा प्रकार नेसणे ह्या प्रकारात मोडत असे. शिवण काम केलेले वस्र नव्हते. हळू हळू शिवण काम असलेले वस्र आले. मुख्य प्रभाव पडले ते ग्रीक,कुशान , मुस्लीम आक्रमकांकडून. त्यानंतर महत्वाचा बदला घडतो तो इंग्रजांचे स्वामित्व प्रस्थापित झाल्यानंतर. आपल्याकडचे लोक सुटाबुटात फिरू लागतात. आणि हळूहळू आपण वेस्टर्न कपड्यांकडे रोजचे वापरण्याचे महणून पाहू लागतो. आता तर आपण इतके रुळलो आहोत की पारंपारिक कपडे फक्त पाडवा, दिवाळी आणि कॉलेज मधल्या सांस्कृतिक दिन (traditional day) इथेच घालण्यासही असतात अशी आपली ठाम समजूत झाली आहे.
आता ह्या बदलांची कारणमीमांसा दोन प्रकारे करता येईल -
१) सत्ताधीशांची मर्जी राखण्यासाठी किवा संपादन करण्यासाठी.बरयाच लोकांची समजूत असते की सत्ताधीशांचे अनुकरण केले की आ पणही त्यातला काही भाग मिळवू शकतो. मग त्यासाठी लोक आपोआप तिकडे ओढले गेले.आणि सगळे जण मग त्या भोवर्यात खेचले गेले. (आ ता मुख्य बदल झाला तो स्वातंत्र्यनंतर, तेव्हा आर्थिक वर्चस्वाने राजकीय वर्चस्वाची जागा घेतली ).
२) वेस्टर्न क्लोथ्स जास्त सोयीस्कर आहेत.
माझ्या मते दुसरे कारण जास्त महत्वाचे आहे.मग माझा विचार जरा पुढे जातो . जर आपल्या संस्कृतीचे महत्वाचे एक अंग असलेले वस्र आपण जर इतक्या सहजपणे, प्रतिकार न करता बदलतो तर संस्कृतीच्या इतर अंगांबद्दल इतके आग्रही का? बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. मग आपण मराठी भाषेबद्दल इतके आग्रही का?
मग मी विचार करतो की ह्या प्रश्नाचे उत्तर काय.. मराठी भाषेबद्दल आग्रह सोडावा? मध्ये राज ठाकरेंचे आंदोलन जोरात सुरु असताना वि.ग.कानिटकरांना भेटायला गेलो होतो.मराठीचा एवढा मोठा लेखक पण त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले ‘मराठी भाषा उपयोगिता असेल तर टिकेल नाही तर काळाच्या ओघात वाहून जाइल.’ पहिले जरा वाईट वाटले पण मग हळू हळू सगळे कोडे सुटू लागले …
संस्कृती आपल्या अंगात भिनलेली असते. आणि जर माणसावर प्रभुत्व मिळवायचे असेल तर त्याचावर वैचारिक प्रभुत्व मिळवणं महत्वाचे असते. आणि ह्या मानसिक लढाईत संस्कृती महत्वाची भूमिका बजावते.आपल्या भाषेवर जर त्यांचे वर्चस्व तर माझ्या संस्कृतीवर आणि पर्यायाने माझ्या समाजावर नकळत त्याचंचे वर्चस्व येते. वर्चस्व म्हणजे मी त्यांची भाषा बोलणे नव्हे , वर्चस्व म्हणजे मला माझी भाषा कमी प्रतीची वाटणे. याच कारणासाठी मला माझ्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे आहे. संस्कृतीसाठी संस्कृती नाही तर माझ्या समाजाच्या स्वत्वासाठी संस्कृती.त्याच्या उन्नतीसाठी संस्कृती. जर आपण हि आपल्या मनात गोष्ट ठेवली आणि आपल्या मनात हि जाण निर्माण झाली तर मग वस्र बदलले तसे सोय महणून भाषा बदलली आणि इतर गोष्टी बदलल्या तरी समाजाची संस्कृती शाबूत राहील.मराठी लोक ताठ मानेने चालणे हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.
(आता संस्कृतीत अनेक abstract गोष्टी येतात उदाहरणार्थ मुल्ये. आता ह्या गोष्टी भाषा,वस्र अश्या संस्कृतीच्या दर्शनी गोष्टींवर किती अवलंबून आहेत आणि जर दर्शनी गोष्टी बदलल्या तर त्या किती बदलतील हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. माझे तरी मत आहे की फार फरक पडत नाही. पण प्रत्येकाचे ह्या abstrat गोष्टींबद्दल मत भिन्न असू शकत.( जरा पुरुषप्रधान लेख झाला खरा.साडी हा प्रकार अजुनही रूढ आहे.पण नऊ जाऊन सहावारी आलीच ना. काष्टा शहरात कोण मारता आज काल?? ))(बरेच कंस आणि त्याही कंसातले कंस झालेत. असो .)
Like this:
Be the first to like this post.
वस्त्र आणि संस्कृतीचा संबंध जोडणे हे मला तरी पटत नाही. आपण धोतर सदरा न वापरता शर्ट, पँट वापरतो ते सोयीस्कर आहे म्हणून. कोणी जबरदस्ती करतंय म्हणून नाही. अगदी तेच उदाहरण लागू होतं मराठीच्या बाबतीत. मी मराठीत बोलतो/लिहितो ते मला हवं म्हणून, मला आवडतं म्हणून. राज ठाकरे म्हणतो म्हणून नव्हे. या सगळ्या आवडी निवडीच्या, अस्मितेच्या, अभिमानाच्या गोष्टी आहेत. त्यांची संस्कृतीशी तुलना करून आपण कुठेतरी गल्लत करता आहात असं मला वाटतं.
आपण म्हंटल की आपण मराठी बोलतो कारण ती आवडते.आता भाषेची उपयुक्तता या सदरात आवड हि गोष्ट येऊ शकते.
माझ्या मते भाषा हे संवादाचे साधन आहे ,साध्य नाही. साधन शुचिता ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. निखिलने लिहिल्याप्रमाणे आपण जर एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगत असू तर भाषेचा प्रश्न येत नाही. त्यामुळे साधन हेच साध्य वाटायला लागले तर मूळ साध्याकडे दुर्लक्ष्य होण्याच संभव आहे.आता इंग्लिश माद्यमातून शिकलेल्या मुलाला पण शिवाजीमहाराजांचा तितकाच अभिमान वाटतो.भाषा त्याच्या आड येत नाही. परत अभिमान वाटणे महत्वाचा आहे कोणत्या भाषेत वाटते ते नाही. आणि मला तरी संस्कृतीत पोशाख हा महत्वाचा वाटतो कारण संस्कृतीचा सर्वात दर्शनी भाग वस्र आहे.
भाषा ही आईच्या दर्जाची असते. सोयीचे आहे म्हणून आईला वा-यावर सोडून लोक एकटे राहत नाहीत. तसेच भाषेला आपल्याला वा-यावर सोडता येत नाही. आई आजारी आहे “तिची प्रतिकार शक्ती असेल तर वाचेल नाही तर मरेल” असे आपण म्हणतो का? तिने जगावं म्हणून हर त-हेचे प्रयत्न करतो ना आपण? मग भाषेसाठी कच का खायची? कोण एक “महान लेखक” म्हणाले ते पटतं तुम्हाला, पण कोणी राजकारणी ते सांगतो आहे तर पटत नाही?
माझा आक्षेप भाषेला आई मानण्यावर आहे. भाषा हे संवादाचे साधन आहे, मराठीस फक्त भाषा म्हणून महत्व नाही . हा, जर इतर गोष्टी त्याच्याशी जोडल्या गेल्या उदा. राजकारण तर महत्व जरूर आहे.
उदाहरणार्थ मराठी शाळाच नसतील तर काय जे शिरवाडकर कानेटकर आगरकर तुकोबा ह्यांच्या साहित्याला अग्नी दिल्यासारखं आहे . त्यातून पुन्हा शिवाजी महाराजांबद्दल माहिती असणे ह्या निकषावर किती टक्के इंग्रजी माध्यमातली मुले खरी उतरतील ? शिवाजी हा त्यांच्यासाठी हेरो आहे सिनेमातला .. मी शिवाजीराजे बोलतोय मधला…
कानिटकरांना त्यांच्या लिखाणाबद्दल खात्री नसेल कदाचित पण म्हणून बाकीच्यांच्या लिखाणाला मर्त्य समजण्याचा त्यांचा अधिकार नाही. मराठी संस्कृतीतला साहित्य ही घटक आहेच कि. अजूनही दलितांना गाण्यातून “भीम” कळतो. तीच गाणी इंग्रजीतून वाजू लागली तर?
पुन्हा मराठी मरत आहे ह्या मुद्दा पुण्या-मुंबईकडे चर्चा करायला चांगला आहे. बाकी कडे अजूनही तशी परिस्थिती नाही.
कॉलेज मधून आपल्या जवाबदारीची जाणीव असणारी पोर बाहेर काढायची कि orgy करणारी ? संस्कार/संस्कृती मारतीये तर आपण टाल्या वाजवत बसायचा कि जे चांगला वाटता ते टिकाव म्हणून प्रयत्न करायचे?
आर तुझ्या उत्तराने स्मित गारठला… प्रत्युत्तर देतच नाहीये. बुद्धिभेद केलास की रे लेका…
I think, what Mr Smit is telling is quite intuitive and logical. But in all, it seems to lack experience in life. Maza mat ase ahe ki tyanni hach lekh punha ekda 10 warshanni wachawa. Tewha tyanche wichar khup wegale astil yachi mi khatri deto…
uttar lhito…sagalyana …fakt jara velechi kamatarta ahe…officemadhe kam padaly..1-2 divasat nakkki savistar reaply deto