ब्लॉगबद्दल काही

असे लिहू का? की ’ब्लॉग चळवळ मला गटेनबर्गच्या छपाई यंत्राच्या शोधाचे एक्स्टेन्शनच वाटते.. सामन्य माणसाकडे ज्ञान-रुपी सत्ता जशी जशी येत गेली तशी तशी गेल्या ५०० वर्षात झालेले बदल ठळक आहेत. लातिन बायबल जर्मनमध्ये आणणे काय आणि गीतेची ज्ञानेश्वरी होणे काय.. आधी ज्ञान मुक्त झाले आणि मग ते पसरवायची शक्ती मिळाली. माहितीचे आदान-प्रदान-प्रसार करण्याची ताकद राज्यसत्ता उलथवण्यास, क्रांत्या घडवून आणण्यात इन्सट्रूमेंटल होती.’

किंवा असे चांगले वाटेल

‘ज्ञानेश्वर, समर्थ, तुकाराम, मोरोपंत, मर्ढेकर, दांडेकर, खांडेकर, शिरवाडकर… मराठी म्हणजे खरंच ‘अमृतातेही पैजासे जिंके…’ तुकाराम बावांनी सांगितले आहे ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…’

खरं तर काहीतरी लिहायची इच्छा आहे… पण काही नाही.. गप्पा मारायची हौस आहे. फुकट तत्वज्ञान देणे आणि चर्चा कारणे हा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यात अपार आनंद मिळतो. ब्लॉग रुपी अमोघ शस्त्राने साऱ्या जगाला सल्ले, मते देतो आहे आता तर…